मुंबईः पवई साकी विहार परिसरातील हुंडाई ऑटो सेंटरला भीषण आग लागली आहे. अद्याप कोणतीही दुखापत किंवा जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही मात्र आग मोठी आहे. अनेक महागड्या गाड्या शोरूममध्ये आहेत. अग्निशमन दलाच्या किमान 4 गाड्या घटनास्थळी असून आग विझवण्याचे काम सुरू आहे. अग्निशमन दलाच्या आधिक गाड्या घटनास्थळी पोहोचत आहेत. घटनास्थळी मोठा जनसमुदाय जमला आहे आणि गोंधळ पाहायला मिळतोय. आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही.
या घटनेचा व्हिडिओ एका रहिवाशाने शेअर केला आहे.
A fire broke out in Powai area of Mumbai, a fire broke out in the garage of Honda Company on Saki Vihar Road in Powai. #Mumbai pic.twitter.com/edc0T6SJNJ
— Rahul Deo Kumar (@RahulDeoKumar) November 18, 2021
ही प्राथमिक माहिती आहे. ही बातमी अपडेट केली जाईल.
इतर बातम्या-