सही केली तर याद राखा, एक महिन्यात आमचं सरकार येणार; आदित्य ठाकरेंचा इशारा

| Updated on: Oct 12, 2024 | 7:38 PM

मुंबईत आज शिवसेना ठाकरे गटाचा आणि शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा होत आहे. शिवतिर्थावर बोलताना आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारवर जोरदार टीका केली. सरकारने अनेक घोटाळा केल्याचे आरोप त्यांनी केले आहेत.

सही केली तर याद राखा, एक महिन्यात आमचं सरकार येणार; आदित्य ठाकरेंचा इशारा
aaditya thackeray
Follow us on

आदित्य ठाकरे यांनी आज दसरा मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केलीये. ते म्हणाले की, अदानीच्या घशात मुंबई घालयाची की नाही हे ठरवायचे आहे. शिंदे सरकार हे राज्य विकायला निघालं आहे. आपल्याला एकत्र यावं लागेल, एकजूट दाखवावी लागणार आहे. एकनाथ शिंदेंनी मिंधे सरकारने जेवढा हा महाराष्ट्र भ्रष्टाचार करून महाराष्ट्र लुटला आहे. ए टू झेड भ्रष्टाचार केला आहे. मुंबईचंच म्हणायचं झालं. तर रस्त्याचे दोन मोठे घोटाळे केले. मागच्या वर्षी मी रस्त्याचा घोटाळा उघड केला. त्यावेळी मी पंतप्रधानांना सांगितलं तुमचं नाव बदनाम होणार आहे. तुमच्या हातून उद्घाटन करून घेत आहेत, ही कामे कधी पूर्ण होणार नाही. हा घोटाळा झाला. महापालिकेला मान्य करावं लागलं. त्यामुळे एक हजार कोटी वाचले.’

‘आताही सहा हजार कोटीचा घोटाळा झाला आहे. आयुक्तांना सांगतो याद राखा सही केली तर. तुम्ही सही केली, कंत्राटदारा पैसा दिला तर बघा. एक महिन्यात आमचं सरकार येणार आहे. मग ठरवा आत राहायचं की बाहेर.’

‘अनेक घोटाळे केले. मी वाट पाहत आहे. सरकार आल्यावर प्रत्येकाची फाईल काढणार आहे. मग तुम्ही मंत्री असाल की अन्य कुणी असाल. ही लूट आम्ही थांबवणार आहे. तुम्ही माझी साथ आणि सोबत देणार की नाही? आम्ही महाराष्ट्राला वाचावणार आहोत.’

‘छत्रपतींचा पुतळाही सोडला नाही. तिथेही भ्रष्टाचार झाला. यातून काही चांगलं निघेल असं मंत्री म्हणाला. काय चांगलं निघेल. कोट्यवधीचं टेंडर काढलं. या राज्यातील जनता ही घटना विसरणार नाही. तुम्हाला माफ करणार नाही.’

‘हे सर्व काही गुजरातला नेत आहे. अनेक प्रकल्प तिकडे नेत आहे. चुकून यांचं सरकार आपल्या डोक्यावर बसलं तर हे लोक मंत्रालय गुजरातला नेतील. आमचं सरकार आलं तर तीन गोष्टींना प्राधान्य देऊ. त्या म्हणजे, नोकऱ्या, नोकऱ्या आणि नोकऱ्या.’