मुंबई : केंद्र सरकारप्रमाणे राज्य सरकारही शेतकऱ्यांना महासन्मान निधी देणार आहे. मंत्रिमंडळच्या बैठकीत मंगळवारी यासंदर्भात निर्णय घेण्यात आला. केंद्र सरकारचे 6 हजार रुपये आणि राज्याचे 6 हजार रुपये, याप्रमाणे शेतकऱ्यांना वर्षाला 12 हजार रुपये मिळणार आहे, अशी महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. शेतकऱ्यांना एका रुपयात पीक विमा मिळणारआहे. राज्याला माहिती तंत्रज्ञानात देशात आघाडीवर नेण्यासाठी नवीन सेवा धोरणास मान्यता दिली आहे. यामुळे राज्यात ९५ हजार कोटींची गुंतवणूक येणार आहे.
राज्याकडून शेतकरी महासन्मान निधी
अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचा अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला होता. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी पंतप्रधानांच्या संकल्पनेतून पीएम किसान सन्मान निधी योजना राबवली जात आहे. त्याला जोडूनच आता राज्य सरकारही शेतकरी महासन्मान निधी योजना राबवणार असल्याचे फडणवीस यांनी जाहीर केले होते.
शेतकऱ्यांना मिळणार १२ हजार
पीएम किसान सन्मान निधी योजनेत शेतकऱ्यांना हेक्टरी वार्षिक 6 हजार रुपये दिले जातात. आता त्यात राज्य सरकारकडूनही आणखी 6 हजार रुपये, अशा पद्धतीने शेतकऱ्यांना वार्षिक एकूण 12 हजार रुपयांचा निधी दिला जाणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले होते. त्यानुसार मंगळवारी राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला.
एक रुपयात पीक विमा
केवळ एक रुपयात पीक विमा योजनेचा लाभ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्याचा फायदा राज्यातील लाखो शेतकऱ्यांना होणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. राज्याला माहिती तंत्रज्ञानात देशात आघाडीवर नेण्यासाठी नवीन सेवा धोरणास मान्यता दिली आहे. यामुळे राज्यात ९५ हजार कोटींची गुंतवणूक येणार आहे.
राज्य मंत्रिमंडळाचे निर्णय