मुंबई- टाटा समुहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री (Cyrus Mistry)यांच्या मृत्यूनंतर अपघात, रस्त्यांवरील प्रवास, वाहतूक, उपाययोजना, कार चालवताना घ्यायची काळजी, असे मुद्दे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. सीट बेल्टबाबत (Seat belt)पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे. जर सायरस मिस्त्री यांनी सीट बेल्ट लावला असता, तर त्यांचा प्राण वाचले असते असे सांगण्यात येते आहे. अपघात होण्यापूर्वी त्यांची गाडी अतिशय वेगाने धावत होती. सायरस मिस्त्री हे मागच्या सीटवर बसले होते, त्यांनी सीट बेल्ट लावलेला नव्हता. त्यामुळे डिव्हायडरवर गाडी आदळल्यानंतर त्यांना जबर दुखापत झाली आणि त्यांचा मृत्यू झाला असे सांगण्यात येते आहे. आता या अपघातानंतर प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रांनी (Anand Mahindra)ट्विट करत, एक शपथ घेतली आहे.
I resolve to always wear my seat belt even when in the rear seat of the car. And I urge all of you to take that pledge too. We all owe it to our families. https://t.co/4jpeZtlsw0
हे सुद्धा वाचा— anand mahindra (@anandmahindra) September 5, 2022
सायरस मिस्त्री यांच्या मृत्यमुळे आनंद महिंद्रा यांचा मोठा धक्का बसला आहे. त्यांनी ट्विट करुन सायरस मिस्त्री यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. तसेच त्यांनी ट्विटमध्ये मागे बसलेलो असे तरी यापुढे सीट बेल्ट बांधीन, अशी शपथच घेतली आहे. तसेच त्यांनी सगळ्यांनाच सीट बेल्ट नक्की लावा, असे आवाहनही केले आहे.
प्रवासात नेहमी सीट बेल्ट हा सुरक्षेचा उपाय सांगण्यात येतो. ज्यावेळी अपघात होतो, त्यावेळी सीट बेल्टमुळे प्रवाशाचा जीव वाचू शकतो. यापूर्वीही अनेकदा सीट बेल्टमुळे अनेकांचे प्राण वाचलेले आहेत. ज्यावेळी गाडीला अपघात होतो, तेव्हा गाडी समोर जोरात आदळते. सीट बेल्ट लावलेला असेल तर प्रवाशी जोरात पुढे किंवा मागच्या बाजूला सरकतात. सीट बेल्ट अशावेळी प्रवाशांना वाचवू शकतो. तसेच जर अपघात झाला त्यावेळी सीट बेल्ट लावलेले असतील तर एयर बॅग लेगच उघडते. त्यामुळे पुढे आदळण्यापासून प्रवाशाचा जीव वाचू शकतो.
फेब्रुवारी 2022 मध्ये याच संबंधात केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मोठी घोषणा केली होती. त्यात सर्व वाहननिर्मिती कंपन्यांना थ्री पाँइंट सीट बेल्ट ठेवणे हे बंधनकारक करण्यात आले होते. या आदेशान्वये वाहनांची निर्मिती करतानाच, मागे बसलेल्या आणि मध्ये बसलेल्या प्रवाशांसाठीही सीट बेल्ट बंधनकारक करण्यात आलेत. त्यावेळी गडकरींनी सांगितले होते की, देशात प्रत्येक वर्षी सुमारे 5 लाख दुर्घटना होतात. त्यात सुमारे 1.5 लाख लोकांचा मृत्यू होतो. पहिल्यांदा 8 प्रवासी असलेल्या वाहनात 2 सेफ्टी एयर बॅग बंधनकारक होत्या. आता त्या 4 ने वाढवण्यात येत आहेत.