इंटर्नशीप करणाऱ्या डॉक्टरांना मिळणार कोरोना काळातील सेवेचा अतिरिक्त भत्ता

| Updated on: Dec 22, 2020 | 7:58 PM

कोरोना काळात सेवा देणाऱ्या इंटर्नशीप करणाऱ्या डॉक्टरांना अतिरिक्त भत्ता देण्यात येणार आहे. (internship doctors will get additional allowance for corona period works)

इंटर्नशीप करणाऱ्या डॉक्टरांना मिळणार कोरोना काळातील सेवेचा अतिरिक्त भत्ता
Follow us on

मुंबई: कोरोना काळात सेवा देणाऱ्या इंटर्नशीप करणाऱ्या डॉक्टरांना अतिरिक्त भत्ता देण्यात येणार आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डॉक्टरांना अतिरिक्त भत्ता देण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे राज्यातील या इंटर्नशीप करणाऱ्या डॉक्टरांना मोठा दिलासा मिळाला आहे. (internship doctors will get additional allowance for corona period works)

कोरोना काळात सेवा केल्यामुळे पुण्यातील इंटर्नशीप करणाऱ्या डॉक्टरांना कोरोना भत्ता देण्यात आला होता. त्यामुळे राज्यातील इंटर्नशीप करणाऱ्या डॉक्टरांनीही त्यांनाही अतिरिक्त भत्ता मिळावा म्हणून राज्य सरकारकडे मागणी केली होती. या डॉक्टरांना हा भत्ता मिळावा म्हणून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता आणि आज त्यासाठी एक बैठक सुद्धा आयोजित करण्यात आली.

आभासी पद्धतीने झालेल्या या बैठकीत फडणवीस हे त्यांच्या निवासस्थानाहून सहभागी झाले होते. यासंदर्भातील सूचना डिसेंबर अधिवेशनात विनियोजन विधेयकाच्या वेळी फडणवीस यांनी विधानसभेत दिली होती आणि त्यानुषंगाने आज ही बैठक झाली. मुंबई आणि पुण्यातील इंटर्नशीप करणार्‍या डॉक्टरांना 39,000 रूपये आणि 30 हजार रूपये अनुक्रमे याप्रमाणे विशेष भत्ता दिला जात होता. मात्र अन्य शहरांमध्ये तो केवळ 11 हजार रूपये इतकाच होता. कोरोनाच्या काळात राज्यातील सर्वच जिल्ह्यात डॉक्टर्स आपले योगदान देत आहेत. त्यामुळे केवळ मुंबई, पुण्याला एक न्याय आणि अन्य जिल्ह्यांना दुसरा असे करता येणार नाही. त्यामुळे सर्वच जिल्ह्यांसाठी एकच निकष लावण्यात यावा, अशी मागणी फडणवीस यांनी केली. त्यांची ही मागणी अजित पवार यांनी तत्काळ मान्य केली आणि वित्त विभागाने प्रतिकूल अभिप्राय दिला असला तरी आपण त्यावर आदेश जारी करू, असे आश्वासन त्यांनी दिले. (internship doctors will get additional allowance for corona period works)

 

संबंधित बातम्या:

2050 मध्येही मुख्यमंत्री म्हणून उद्घाटनाला येईन: उद्धव ठाकरे

वारंवार सांगूनही फेरीवाले हटेना, आता केडीएमसीचा मोबिलीटी प्लान, आयुक्त विजय सुर्यवंशी ऑन अ‍ॅक्शन मोड

अभिजित बांगरांचा दणका, वाशी रुग्णालयातील 17 डॉक्टरांवर वेतन कपातीची कारवाई

(internship doctors will get additional allowance for corona period works)