मुंबई : अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीच्या मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल चहल (Iqbal Chahal )यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहे. ईडीच्या या आदेशावर आता भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांची प्रतिक्रिया आली आहे. हिशाब तो देना पडेगा, असे वक्तव्य त्यांनी केले. ईडीने चहल यांना येत्या सोमवारी 16 जानेवारीला सकाळी ११ वाजता चौकशीसाठी बोलवले आहे. त्यामुळे चहल यांच्या अडचणी वाढणार आहे. चहल यांना आलेल्या ईडीच्या समन्ससंदर्भात किरीट सोमय्या यांनी एक ट्विट केले आहे. त्यात त्यांनी चहल यांनी कोणत्याही तपास यंत्रणांना आतापर्यंत सहकार्य केले नाही, असा दावा केला आहे. आता चहल यांना हिशोब द्यावे लागणार आहे. चहल हे मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आहे की मातोश्रीचे? असा सवाल सोमय्या यांनी टीव्ही ९ शी बोलतांना व्यक्त केला.
#SanjayRaut ke Partner #SujeetPatker ka
हे सुद्धा वाचाBMC COVID Center Ghotala
BMC Commissioner Iqbal Chahal had refused to give documents to
Police
Income Tax
ED
CAG
Corporate Affairs Ministry
Now Called by ED & ……….
HISAB to Dena hi Hoga @BJP4India @Dev_Fadnavis
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) January 14, 2023
सोमय्या यांनी म्हटले की, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर (Sujit Patkar) यांना कोरोना काळात कॉन्ट्रक दिले गेले. सुजीत पाटकर यांनी हजारो कोव्हीड रुग्णांच्या जिवाशी खेळ केला. त्यांना उद्धव ठाकरे यांनी पाच-पाच कॉन्ट्रक दिले. शंभर कोटींचे कॉन्ट्रक दिले आहे. चहल यांनी कोणत्याही तपास संस्थांना कागदपत्रे दिले नाही. आता त्यांना आयकर विभागाने नोटीस दिली आहे. कंपनी मंत्रालयाने कागदपत्रांची चौकशी केली आहे. सोमवारी ईडीसमोर हजर व्हावे लागणार आहे. यामुळे मुंबई मनपातील कोव्हीड घोटाळा जनतेसमोर येणार आहे.
नेमकं प्रकरण काय?
भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याकडून कोरोना काळात मुंबई महापालिकेकडून काढण्यात आलेल्या वेगवगेळ्या कामांच्या टेंडरमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला होता. किरीट सोमय्या यांनी गेल्यावर्षी आझाद मैदानात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. यामध्ये शिवसेना खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर यांचंदेखील नाव होतं.संबंधित प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास सुरु होता. त्यानंतर आता याच प्रकरणाचा समांतर तपास आता ईडीकडूनही केला जातोय. त्यामुळे या प्रकरणी आता पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांची देखील चौकशी ईडीकडून केली जाणार आहे.