मुंबई : ईशा अंबानी (Isha Ambani ) पुन्हा एकदा चर्चेत आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड जर्मन कंपनी मेट्रो कॅश अँड कॅरी इंडिया लिमिटेड कंपनीचे अधिग्रहण करणार आहे. रिलायन्स रिटेलचे प्रमुख मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी हिने 2850 कोटींमध्ये ही डील केली आहे. ईशा अंबानीच्या लग्नात अंबानी कुटुंबाने मोठा खर्च केला होता. एकदम रॉयल पद्धतीने ईशाचं लग्न झालं होतं. या विवाह सोहळ्याला अनेक दिग्गज लोकांनी हजेरी लावली होती.
ईशा अंबानीच्या लग्नाची जगभरात चर्चा झाली होती. करोडो रुपये तिच्या लग्नावर खर्च करण्यात आले होते. तिच्या या लग्नाला परदेशातील दिग्गज मंडळींनी देखील हजेरी लावली होती.
अंबानी कुटुंबाने आपल्या मुलीसाठी कोणतीच कसर सोडली नव्हती. प्रत्येक गोष्टीची विशेष काळजी घेण्यात आली होती. पण सर्वात चर्चेत राहिला तो ईशाचा लेहंगा. भारतातील प्रसिद्ध डिझायनर अबू जानी-संदीप खोसला यांनी तिचा ड्रेस डिझाईन केला होता. यावर विशेष नक्षीकाम देखील करण्यात आलं होतं.
ईशा अंबानीच्या लेहंगावर तिने जी ओढणी घेतली होती. ती खास होती. कारण ती ओढणी निता अंबानी यांच्या लग्नाच्या साडीपासून बनवण्यात आली होती. रिसेप्शनमध्ये देखील ईशा अंबानी स्टनिंग लूकमध्ये दिसत होती. रिसेप्सनसाठी तयार करण्यात आलेला लेहंगा इटालिनय फॅशन हाऊस वेलेंटिनोने तयार केला होता. ज्यामध्ये गोल्ड आणि सिल्वरचं काम करण्यात आलं होतं.
ईशा अंबानी आणि आनंद पिरामल यांचा विवाह शाही पद्धतीने झाला होता. त्यांच्या लग्नाच्या आयोजनाचं काम सेवन स्टेप्स कंपनीला देण्यात आलं होतं. २०१८ मधील हा सर्वात मोठा विवाह होता. पण त्याचं आयोजन ज्या प्रकारे करण्यात आलं होतं. त्यामुळे त्याची चर्चा अनेक वर्ष होत राहिल यात शंका नाही.