मुंबई: महाराष्ट्र राज्य को-ऑप बँक घोटाळा प्रकरणात ईडीने गुरुवारी मोठी कारवाई केली. सातारा येथील जरेंडेश्वर सहकारी साखर कारखान्याची जागा, इमारत आणि इतर बांधकाम जप्त केलं आहे. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात ही कारवाई करण्यात आली असून या सहकारी साखर करखान्याशी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचा संबंध असल्याचं ईडीच्या अधिकाऱ्यांच म्हणणं आहे. (MSCB scam: ED attaches sugar mill worth Rs 65 cr linked to Ajit Pawar)
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत सुमारे 25 हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाला होता. याबाबत मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने 22 ऑगस्ट 2019 रोजी हा गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा भा द वी च्या 120 बी,420, 467 , 468, 471 कलमा नुसार दाखल करण्यात आला होता.त्याच प्रमाणे लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या 13(1)(ब) , 13(1)(क) कलम ही लावण्यात आली होतीत.याच गुन्ह्याच्या आधारावर ईडीने आपला गुन्हा दाखल केला करून तपास सुरू केला होता. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
जरेंडेश्वर सहकारी साखर कारखाना हा सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील चिमणगाव येथे आहे. सध्याच्या मालकांनी हा कारखाना 2010 सालात 65 कोटी 75 लाख रुपयांना खरेदी केला होता.हा कारखाना सध्या मेसर्स गुरू कमोडिटी सर्विसेस प्रा. ली यांच्या मालकीचा आहे.हा कारखाना मेसर्स जरेंडेश्वर शुगर मिल प्रा लिमिटेडला भाड्याने देण्यात आला आहे. मेसर्स जरडेश्वर प्रा लिमिटेड कंपनीत मेसर्स सपार्किंग सोईल प्रा लिमिटेड कंपनी ही भागीदार कंपनी आहे. ईडीने केलेल्या तपासात मेसर्स स्पार्कलिंग कंपनी ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांची पत्नी सुनेत्रा पवार यांच्याशी संबंधित आहे.
तपासात जरांडेश्वर सहकारी साखर कारखान्याची 2010 सालात विक्री करण्यात आली होती. वेळी तो मूळ किमतीच्या कमी किंमतीत विकण्यात आला होता. त्याचप्रमाणे त्याची योग्य कार्यपद्धतीने पाळण्यात आली नव्हती.याच काळात अजित पवार हे महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या संचालक मंडळावर होते.याच काळात हा कारखाना मेसर्स गुरू कमोडिटी सर्विसेस प्रा.लिमिटेडला विकण्यात आला. नंतर तात्काळ हा कारखाना जरंडेश्वर शुगर मिल प्रा ली ला भाडे तत्वावर देण्यात आला. जरंडेश्वर शुगर मिल्स प्रा ली मध्ये मोठ्या प्रमाणात स्पार्कलिंग सोईल प्रा ली. कंपनीचा हिस्सा आहे.
ही कंपनी अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांच्या मालकीची आहे. जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना हा प्रथम मेसर्स गुरू कमोडीटी प्रा ली कंपनीने विकत घेतला होता.मात्र, ही गुरू कमोडिटी कंपनी बनावट असल्याचा ईडीच्या अधिकाऱ्यांना संशय आहे.जरंडेश्वर शुगर मिल प्रा ली ने पुणे जिल्हा कॉ ऑप बँकेकडून सुमारे 700 कोटी रुपये कर्ज घेतलं आहे. हे कर्ज 2010 पासून पुढील काळात घेतलं आहे.
संबंधित बातम्या:
ED ची कारवाई सुरु, अजित पवारांच्या मामाचा साखर कारखाना जप्त
आधी व्हीप, आता थेट कॉल, महाविकास आघाडीच्या आमदारांशी संपर्क, अधिवेशनापूर्वी हालचाली वाढल्या
जरंडेश्वर साखर कारखाना ईडीकडून सील, ED ची कारवाई नेमकी कुणावर? अजित पवारांनी काय सांगितलं?
(MSCB scam: ED attaches sugar mill worth Rs 65 cr linked to Ajit Pawar)