मुंबई: मराठवाड्यातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी कंबर कसली आहे. मराठवाड्यातील पाण्याची तीव्र अडचण भासत असणाऱ्या जिल्ह्यांचा, तालुक्यांचा व भागांचा अभ्यास करा. तसेच या भागांना पाणी देण्यासाठीचे पर्याय शोधा, असे निर्देश जयंत पाटील यांनी आज संबधित अधिकाऱ्यांना दिले. (jayant patil take review meeting on water shortage in marathwada)
सिल्लोड तालुक्यातील जलसंपदा विभागाच्या विविध प्रश्नांबाबत आज महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या समवेत मंत्रालय येथे बैठक पार पडली. या बैठकीत भराडी बृहत लघु पाटबंधारेसंदर्भात सर्वेक्षण करण्याबाबत चर्चा झाली. त्याचे सर्वेक्षणाचे काम लवकर पूर्ण करावे, असे निर्देशही मंत्री जयंत पाटील यांनी दिले. या भागातील अजिंठा, अंधारी मध्यम प्रकल्प, सोयगाव लघु प्रकल्पातील अतिरिक्त वाहून जाणारे पाणी, सिल्लोड व सोयगाव तालुक्यातील प्रकल्पांच्या देखभाल दुरुस्तीबाबत, खेळणा मध्यम प्रकल्पाची उंची वाढविणे, व या तालुक्यातील नविन सिंचन प्रकल्पाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. पाणी उपलब्धतेनुसार नवीन सिंचन प्रकल्पासाठी सर्वेक्षण करण्यात यावे. तसेच सिल्लोड विश्रामगृह, खेळणा विश्रामगृह व सिल्लोड कार्यालय दुरुस्ती करणेबाबत कार्यवाही करण्यात यावी, अशी चर्चाही बैठकीत करण्यात आली.
दरम्यान सिल्लोड तालुक्यात पाण्याची मोठी टंचाई असल्याचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे या भागात पाणी पोहोचवण्यासाठी शासन प्रयत्नशील राहील, असे आश्वासन पाटील यांनी दिले.
दरम्यान, ठाणे जिल्ह्याच्या मुरबाड तालुक्यातील काळू नदीच्या प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांबाबत आज मंत्रालय येथे बैठक झाली. यावेळी पाटील यांनी प्रकल्पग्रस्तांचे म्हणणे ऐकून घेतले. तसेच तालुक्यातील इतर प्रश्नांवरही चर्चा झाली. यावेळी स्थानिक आमदार किसनराव कथोरे, जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते. (jayant patil take review meeting on water shortage in marathwada)
सिल्लोड तालुक्यातील जलसंपदा विभागाच्या विविध प्रश्नांबाबत आज राज्यमंत्री @AbdulSattar_99 यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी तालुक्यातील सिंचनाच्या प्रश्नांवर गहन चर्चा झाली. तसेच हे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी तात्काळ प्रयत्न सुरू करावेत अशा सुचना अधिकाऱ्यांना दिल्या. pic.twitter.com/lxXdgOYj79
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) July 20, 2021
संबंधित बातम्या:
चिखल आणि खड्ड्यांचं साम्राज्य, ठाणे-नाशिक मार्गावर सहा किलोमीटरच्या रांगा; प्रवाशांचे प्रचंड हाल
देवगडचा प्रामाणिक मच्छिमार, व्हेल माशाची 5 कोटींची उलटी वन विभागाला सुपूर्द
(jayant patil take review meeting on water shortage in marathwada)