मुंबई: पॉप सिंगर रिहानाने दिल्लीतील शेतकरी आंदोलनावर प्रतिक्रिया व्यक्त केल्यानंतर त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. भाजपसह सेलिब्रिटी आणि क्रिकेटपटूंनीही विदेशींनी भारतात ढवळाढवळ करू नये, असं म्हटलं आहे. त्याचा राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी समाचार घेतला आहे. ‘अब की बार ट्रम्प सरकार’ असं बोंबलत अमेरिकेत का गेला होतात? ती अमेरिकेच्या अंतर्गत गोष्टीत ढवळाढवळ नव्हती का? अशा प्रतिक्रिया सोशल मीडियातून उमटत असून या स्वाभाविक प्रतिक्रिया असल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. (jitendra awhad taunts bjp over rihanna tweet)
जितेंद्र आव्हाड यांनी एका पोस्टद्वारे हा सवाल केला आहे. दिल्ली, हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांचं आंदोलन चिरडण्यासाठी केंद्र सरकारने इंटरनेट सेवा बंद ठेवली होती. त्यावर अमेरिकेच्या ‘सीएनएन’ या वृत्तसंस्थेने एक सविस्तर बातमी दिली. ही बातमी पाहून आपण यावर का बोलत नाही? असा सवाल रिहानाने केला. तिच्या या ट्विटनंतर भारतातील सोशल मीडियावर रान उठवलं गेलं. दोन महिन्यांहून अधिक काळ सुरू असलेल्या या आंदोलनात, ज्यात सुमारे ६० शेतकरी अद्यापपर्यंत मरण पावले आहेत, त्यावर भारतातील तमाम सेलिब्रिटी तोंडात मिठाची गुळणी धरून बसले असताना, अमेरिकेतली एक प्रख्यात गायिका आवाज उठवते, हे विलक्षण आहे. नव्हे, कित्येकांच्या तोंडात मारणारं आहे, असं आव्हाड यांनी म्हटलं आहे.
भक्तांची गोची
रिहानाच्या या ट्विटमुळे भक्तांची तर पार गोची झाली आहे. तिला देशद्रोही म्हणता येत नाही की नक्षलवादी आणि पाकिस्तानात जा म्हणूनही सांगता येत नाही. ‘तू आमच्या अंतर्गत बाबीत कशाला ढवळाढवळ करतेस.’ असा दुबळा प्रतिकार काहींनी केला. त्यावर, ‘अबकी बार ट्रम्प सरकार’ बोंबलत आपले नेते तिथे कशासाठी गेले होते? ती अमेरिकेच्या अंतर्गत प्रश्नात ढवळाढवळ नव्हती का? अशा तीव्र प्रतिक्रिया स्वाभाविकपणे आल्या आहेत, असं आव्हाड म्हणाले.
हा वैश्विकीकरणाचा जमाना
सध्या वैश्विकीकरणाचा जमाना आहे. मानवतेशी निगडीत घटनांचे पडसाद आता त्या देशापुरते मर्यादित रहात नाहीत. ते जगभर उमटतात. जॉर्ज फ्लॉईड या काळ्या माणसाची अमेरिकेत पोलिसाकडून हत्या झाल्यानंतर अख्ख्या जगाने गुडघा टेकवून त्याला श्रद्धांजली वाहिली होती. त्यात जो बायडन होते तसेच मैदानावरचे क्रिकेटपटू सुद्धा होते, याकडेही आव्हाड यांनी लक्ष वेधले आहे. (jitendra awhad taunts bjp over rihanna tweet)
मुस्कटदाबीत भारत पहिला
या नव्या जगात इंटरनेट बंद ठेवणं हा मुस्कटदाबीचाच एक अवतार आहे. दुर्दैवाने भारत आज यात जगात पहिल्या क्रमांकावर आहे. (आणि आपण ‘डिजिटल इंडिया’ करणार म्हणे). तुम्ही ही मुस्कटदाबी केलीत तरी जगात कुठे ना कुठे तरी आवाज उठणार आणि तुमची नाचक्की होणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. आपला आवाज सुमधूर असला तरी त्याला धार सुद्धा आहे, हे रिहानाने दाखवून दिलं आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे. (jitendra awhad taunts bjp over rihanna tweet)
LIVE | महत्त्वाच्या घडामोडी https://t.co/EZp35P2cuO
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 3, 2021
संबंधित बातम्या:
LIVE | …तर शिवसेनेला बाळासाहेबांचं नाव घेण्याचाही अधिकार नाही, संदीप देशपांडेंचे डोळे पाणावले
अमिबालाही लाज वाटेल अशी शिवसेना दिशाहीन: आशिष शेलार
कंगना रोहित शर्माच्या ट्विटवर म्हणाली, हे सर्व क्रिकेटर्स म्हणजे धोबी का कुत्ता, घर का ना घाट का
(jitendra awhad taunts bjp over rihanna tweet)