मुंबई: गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आज मुंबईतील ना. म. जोशी मार्ग येथील चाळीतील रहिवाशांची भेट घेतली. यावेळी त्यांनी चाळींच्या विकासासंदर्भात नागरिकांशी चर्चा केली. मी इथे असाच आलो नाही, शरद पवार आणि मुख्यमंत्री यांच्याशी बोलूनच इथे आलो आहे. चाळीच्या विकासासंदर्भात 1996 च्या पुराव्याची गरज लागणार नाही, असं ते म्हणाले. (Jitendra Awhad visit bdd chawl for problems discuss problems of residents)
रहिवाशांना 10 वर्षानंतरही परवडणार नाही, अस आम्ही करणार नाही. मी बाहेर राहत असलो तरी तुमचा खिसा किती मोठा आहे, याची मला कल्पना आहे, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. चाळींच्या विकासासाठी आम्ही प्रत्येक घर मालकाचं अॅग्रिमेंट करून घर सोडायला लावू, अॅग्रिमेंटवर बायकोची सही असायलाच हवी. 25 हजार रुपये भाडं देऊ असं देखी ते म्हणाले. पार्किंग संदर्भत आर्किटेक्टशी बोलून बघू असंही त्यांनी यावेळी सांगितलं. पुन्हा येताना शासननिर्णय जाहीर झाल्याशिवाय मी तुम्हाला भेटायला येणार नाही, असं देखील ते म्हणले.
काँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे देखील यावेळी तिथे उपस्थित होते. त्यांनी आमचा प्रकल्पाला विरोध नाही. मात्र,आमच्या काही मागण्या आहेत त्या मान्य कराव्यात. आमच्या मागण्या गेल्या 4 वर्षापासून ज्या आहेत त्याच आता आहेत, आमच्या मागण्या ऐकाव्या आणि मार्ग काढावा, असं राजू वाघमारे म्हणाले.
1. आधी करार नंतर पुर्नविकास ( झोपडपट्टी वासियांना कायमस्वरूपी करार दिला जातो तो करार बीडीडी मध्ये देण्यात यावा )
2. तीन वर्षांपूर्वी ज्या लोकांना अपात्र केल आहे त्यांना अजून पात्र केल गेल नाही. यामध्ये नायगाव,वरळी,ना.म.जोशी मार्ग येथील रहिवाशी आहेत.
3. PWD ने सर्वेक्षन करावं ही मागणी गेल्या 7 वर्षापासून प्रलंबित आहे. मात्र PWD ला सर्वेक्षण करू देण्यास परवानगी देण्यात आली नाही.
4. 10 वर्षाचा मेन्टेंस आम्हाला माफ करण्यात आला पाहीजे.
बी.डी.डी चाळींचा विकास हे महा विकास आघाडीचे स्वप्न आहे
आता कामाला सुरवात
उद्या N.M.Joshi मार्गा वरील चाळींना भेट देणार सोबत म्हाडा चे सर्वच अधिकारी असतील गृहनिर्माण विभागाचे सचिव हे देखील सामील होतील
सगळ्यांना न्याय देणार
उद्या संध्याकाळी 5 वाजता— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) June 14, 2021
संबंधित बातम्या:
महाविकास आघाडी सरकारकडून अखेर राज्य मागासवर्ग आयोगावर 9 सदस्यांची नियुक्ती, कुणाचा समावेश?
पहिल्या पावसात मुंबईची तुंबई झाली, पालिकेने काय काम केले ? पुढचे नियोजन काय ?
(Jitendra Awhad visit bdd chawl for problems discuss problems of residents)