kalyan crime news: दिवाळीचा उत्सव सुरु असताना कल्याण पूर्वेमध्ये दोन गटात तुफान राडा झाला. कल्याण पूर्वेतील कचोरे गावात फटाक्याच्या किरकोळ वादावरून हाणामारी झाली. दोन्ही गटांकडून भर रस्त्यात झालेल्या तुंबळ हाणामारीत पाच जण जखमी झाले आहेत. दरम्यान या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे. मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. टिळक नगर पोलिसांनी दोन्ही गटाच्या 30 ते 40 जणांवर गुन्हा दाखल केला. त्यातील सहा जणांना ताब्यात घेतले आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकीचे वातावरण आहे. त्यामुळे सर्वत्र पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. त्यातच दिवाळी सणही आला आहे. यामुळे पोलिसांकडून सर्वत्र कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती सांभाळण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्टा केली जात आहे. परंतु कल्याणपूर्व भागात फटके फोडण्यावरुन वाद झाला. त्या वादाचे रुपातंर हाणामारीत झाले. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहचत परिस्थितीवर नियंत्रण आणले. सध्या कल्यामधील कचोरे गावात तणावपूर्ण शांतता आहे. सर्वत्र पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
कल्याण पूर्व येथील कचोरे गावात गुरुवारी रात्रीच्या सुमारास फटाक्यावरुन दोन गटात वाद निर्माण झाला. त्यावेळी काही काळ बाचावाची झाली. त्यानंतर दोन गटांमध्ये तुफान राडा झाला. या वादात भर चौकात तुंबळ हाणामारी झाली. ज्यात पाच जण जखमी झाले आहेत. हाणामारीची संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या प्रकरणामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच टिळक नगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दोन्ही गटातील 30 ते 40 जणांवर गुन्हा दाखल केला. यामध्ये सहा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. सध्या पोलिसांनी या परिसरात मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात केला आहे परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.