जगात भारी कल्याणकर: कासम शेख यांना आयटीतील आंतरराष्ट्रीय पातळीवरचा MVP पुरस्कार; महाराष्ट्रातून शेख एकमेव

| Updated on: Feb 04, 2022 | 4:11 PM

आयटी क्षेत्रातील मानाचा समजला जाणारा आंतरराष्ट्रीय (International) पातळीवरील आणि मायक्रोसॉफ्ट (Microsoft) कंपनीकडून दिला जाणारा एमव्हीपी (Most Valuable Professional in Artificial Intelligence) पुरस्कार (Award) कल्याण शहरातील कासम शेख यांना मिळाला आहे.

जगात भारी कल्याणकर: कासम शेख यांना आयटीतील आंतरराष्ट्रीय पातळीवरचा MVP पुरस्कार; महाराष्ट्रातून शेख एकमेव
kasam shaikh
Follow us on

महादेव कांबळे, ठाणे: आयटी क्षेत्रातील मानाचा समजला जाणारा आंतरराष्ट्रीय (International) पातळीवरील आणि मायक्रोसॉफ्ट (Microsoft) कंपनीकडून दिला जाणारा एमव्हीपी (Most Valuable Professional in Artificial Intelligence) पुरस्कार (Award) कल्याण शहरातील कासम शेख यांना मिळाला आहे. आयटी क्षेत्रात या पुरस्काराल मानाचे स्थान असून भारतातील ते पाचवे तर महाराष्ट्रातील ते एकमेव व्यक्ती आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर कासम शेख यांची दखल घेतल्याबद्दल शेख यांची प्रेरणा अनेकांना मिळणार आहे. जगातील निवडक माणसानाच हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. कासम शेख आयटी कंपनीमध्ये एका वरिष्ठ पदावर काम करत असले तरी त्यांनी सामजिक कार्यालाही वाहून घेतल आहे.

मायक्रोसॉफ्ट कंपनीकडून आजपर्यंत जगभरातील 142 व्यक्तीना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. तर महाराष्ट्रातून कासम शेख हे एकमेव आहेत, ज्यांना पुरस्कार मिळाला आहे.
कासम शेख हे अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या कॅपजेमिनी या आयटी कंपनीत वरिष्ठ पदावर कार्यरत आहेत. आयटी क्षेत्रात काम करत असतानाही त्यांनी आपले सामाजिक क्षेत्रामध्येही काम चालू ठेवले आहे. या कामाबरोबरच त्यांनी या क्षेत्रात येणाऱ्यांसाठी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील संधी आणि मार्गदर्शनही करत असतात.

युवकांसाठी मार्गदर्शन

आज जगभरात आर्टीफिशियल इंटेलिजन्समधील आणि त्यामध्ये मायक्रोसॉफ्टचे क्लाऊड प्रोडक्ट असलेल्या AZURE टेक्नॉलॉजी सर्वत्र वापरली जाते. त्यामुळे आयटी क्षेत्रात काम करु बघणारे अनेक जण या टेक्नॉलॉजीकडे आकर्षित झाले आहेत. या पुरस्कारासाठी महाराष्ट्रातून त्यांची एकमेव अशी निवड झाल्याने अनेकांसाठी हा पुरस्कार म्हणजे प्रेरणादायी असणार आहे. जगभरातून काही निवडक माणसांनीच या पुरस्कारावर मोहोर उमटवली आहे. मानाचा समजला जाणारा हा पुरस्कार महाराष्ट्रातील कासम शेख यांना मिळाल्याबद्दल आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या महाराष्ट्रातील अनेक युवकांना हा पुरस्कार म्हणजे प्रेरणा देणारा आहे. सध्या राज्यातील अनेक तरुण आयटी क्षेत्रात विविध पदावर काम करत असले तरी कासम शेख यांना मिळालेला हा पुरस्कार महाराष्ट्राला हा मानाचा तुरा आहे.

संबंधित बातम्या

VIDEO: मी फडणवीसांची बायको आहे हे तुम्ही विसरून जा, सामान्य स्त्री म्हणून ट्विट करते: अमृता फडणवीस

मुंबई-ठाणेकरांनो सावधान! 72 तासांचा मेगाब्लॉक आजपासून, साडे तीनशे लोकल रद्द, कोकणावरही परिणाम

Yashomati Thakur : महिला धोरणाच्या मसुद्याबाबत विद्यापीठांच्या कुलगुरूंसोबत सकारात्मक चर्चा, यशोमती ठाकूर यांची माहिती