मुंबई | दि. 5 मार्च 2024 : आमदार कपिल पाटील यांनी नीतीश कुमार यांच्या भाजपसोबत जाण्याचा निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे जनता दल युनायटेडचे राष्ट्रीय महासचिव म्हणून त्यांनी राजीनामा देत नवीन पक्ष स्थापन केला. महाराष्ट्र जेडीयूचे नेते आणि आमदार कपिल पाटील यांनी पक्षाला दोन दिवसांपूर्वीच रामराम ठोकला. त्यानंतर त्यांनी नव्या पक्षाची घोषणा केली. त्यांच्या नव्या समाजवादी गणराज्य पक्षाने महाविकास आघाडीला पाठिंबा दिला. पक्ष स्थापन होऊन दोन दिवस झाले असताना कपिल पाटील यांचे विश्वासू शिक्षक भारतीचे सरचिटणीस जालिंदर सरोदे यांनी त्यांची साथ सोडली. सरोदे आज शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करत आहेत.
कपिल पाटील यांच्या नव्या पक्षाने महाविकास आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतला. महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना उबाठाकडून कपिल पाटील यांना धक्का दिला आहे. शिक्षक भारतीचे सरचिटणीस आणि कपिल पाटील यांचे जवळचे व्यक्ती जालिंदर सरोदे शिवसेना ठाकरे गटात दाखल होत आहे. जालिंदर सरोदे आपल्या समर्थक शिक्षक भारतीचे शिक्षक आणि पदाधिकाऱ्यांसोबत शिवसेना ठाकरे प्रवेश करत असल्यामुळे नीतीश कुमार यांना धक्का देणाऱ्या कपिल पाटील यांनाच धक्का बसला आहे.
शिक्षक भारतीमधील अंतर्गत नाराजी समोर आली आहे. मुंबई शिक्षक मतदार संघाची उमेदवारी डावल्याने जालिंदर सरोदे हे नाराज होते. त्यामुळेच शिक्षक भरती सोडून शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करत असल्याचे सांगितले जात आहे. जालिंदर सरोदे हे मागील 18 वर्षापासून शिक्षक भारतीच्या स्थापनेपासून कपिल पाटील यांच्यासोबत होते. ते कपिल पाटील यांचे विश्वासू समजले जातात.
शिवसेना ठाकरे गटात शिवसेना शिक्षक सेनेची त्यांना मोठी जबाबदारी दिली जाणार असल्याची माहिती आहे. शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी जेडीला रामराम केल्यानंतर आणि समाजवादी गणराज्य पक्ष या नव्या पक्षाची स्थापना केल्यानंतर आणि महाविकास आघाडीला पाठिंबा दिल्यानंतर देखील आपलेच सहकारी हे शिवसेना ठाकरे गटासोबत जात आहेत.