मुंबई: पीएमसी बँकेप्रकरणातील आर्थिक व्यवहाराप्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस बजावली आहे. त्यामुळे संजय राऊत अडचणीत आलेले असतानाच भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आता राऊत कुटुंबाच्याच चौकशीची मागणी केली आहे. राऊत कुटुंबातील काही सदस्यांच्या एचडीआयएलशी झालेल्या आर्थिक व्यवहाराची ‘मनी ट्रेल, कॅश ट्रेल’ चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे. (kirit somaiya demand ed should investigate raut family relation with hdil)
किरीट सोमय्या यांनी ट्विट करून ही मागणी केली आहे. “एचडीआयएलने पीएमसी बँकेचे 5400 कोटी रुपये ढापले आहेत. एचडीआयल आणि प्रवीण राऊत कुटुंबाचे कोट्यवधीचे आर्थिक संबंध आणि व्यवहार आहेत. तसेच प्रवीण राऊत आणि संजय राऊतांच्या कुटुंबाचेही आर्थिक संबंध आहेत. या दोन्ही राऊत कुटुंबांकडे कोट्यवधी रुपयांची संपत्ती आहे. मग हा पैसा आला कुठून? या दोन्ही कुटुंबांच्या ‘मनी ट्रेल, कॅश ट्रेल’ची चौकशी झाली पाहिजे. पीएमसी बँकेचा पैसा एचडीआयएल मार्गे कुठून कसा गेला? याचीही चौकशी झाली पाहिजे,” असं सोमय्या म्हणाले. सोमय्या यांनी या ट्विटमधून माधुरी प्रवीण राऊत, वर्षा संजय राऊत, प्रवीण राऊत यांच्या एचडीआयएलशी झालेल्या आर्थिक व्यवहाराची, ‘मनी ट्रेल, कॅश ट्रेल’ची चौकशी करण्याची मागणीही केली आहे.
दरम्यान, वर्षा राऊत यांनी ईडीसमोर हजर राहण्यासाठी दोन दिवसांचा वेळ मागवून घेतला आहे. संजय राऊत यांनी त्याला दुजोराही दिला आहे. वर्षा राऊत यांना पंजाब महाराष्ट्र सहकारी बँक खात्यातून संजय राऊतांच्या सहकाऱ्यासोबत केलेल्या 55 लाखांच्या व्यवहाराप्रकरणी ईडीने नोटीस पाठवली होती. बँकेतील खात्याशी संबंधित कागदपत्रं घेऊन कार्यालयात येण्यास नोटिशीत सांगण्यात आले होते.
“राऊत परिवार” माधुरी प्रवीण राऊत, वर्षा संजय राऊत, प्रवीण राऊत यांचे HDIL शी झालेल्या आर्थिक व्यवहाराची ‘ मनी ट्रेल, कॅश ट्रेल’ चौकशी झालीच पाहिजे
एचडीआयएल आणि ग्रुप कंपन्यांकडून त्यांना किती रक्कम मिळाली?
एचडीआयएलने पीएमसी बँकेचे ₹ 5400 कोटी चोरले आहे
PMC साठी हे महत्वाचे आहे pic.twitter.com/eY8rgMhVme— Kirit Somaiya (@KiritSomaiya) December 29, 2020
यापूर्वी शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांनीही ईडीच्या चौकशीला हजर राहण्यापूर्वी अशाप्रकारे वेळ मागून घेतली होती. त्यावेळी प्रताप सरनाईक यांनी आपण बाहेरगावहून आल्यामुळे क्वारंटाईन असल्याचे कारण पुढे केले होते. क्वारंटाईनचा कालावधी संपल्यावर आपण चौकशीसाठी येऊ, असे सरनाईक यांनी म्हटले होते. ईडीने त्यांची ही विनंती मान्य करत त्यांना तीन दिवसांचा अवधी देऊ केला होता. त्यामुळे वर्षा राऊत यांनाही ईडीकडून वेळ वाढवून मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (kirit somaiya demand ed should investigate raut family relation with hdil)
This is 3rd Summons of ED. Sanjay Raut Family not appearing before ED
Why Sanjay Raut Family running away?
ED Investigating Crores of Rupees Transactions between PMC Bank, HDIL, Pravin Raut Family & Sanjay Raut Family
What is Special Relations of Sanjay Raut Pravin Raut Family
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) December 29, 2020
संबंधित बातम्या:
Varsha Sanjay Raut | वर्षा संजय राऊत यांची ईडी चौकशी का? वाचा सविस्तर
23 लाखाचे दागिने, पालघर, अलिबागमध्ये जमिनी, PNB मध्ये 5 खाती, वर्षा राऊतांची प्रॉपर्टी किती?
मोठी बातमी: वर्षा संजय राऊत यांचे ईडीला पत्र, हजेरीसाठी अधिक वेळ देण्याची मागणी
(kirit somaiya demand ed should investigate raut family relation with hdil)