मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची अलिबाग आणि दादर येथील संपत्ती ईडीकडून (ED) जप्त करण्यात आली आहे. माध्यमांमध्ये या बातम्या प्रसिद्ध होताच किरीट सोमय्यांनी (Kirit Somaiya) पत्रकार परिषदेला सुरुवात केली. संजय राऊत आणि प्रविण राऊत यांच्या पत्नीचे व्यवहार पुढे आले आहेत.अलिबाग येथील काही जमीनी, संपत्ती आणि दादर येथील फ्लॅट जप्त करण्यात आला आहे. संजय राऊतला अगोदरच लक्षात आलं होतं. त्यामुळं 10 महिन्यापूर्वी ईडी कार्यालयात 55 लाख रुपये परत केले होते. ईडीची चौकशी सुरु होती. गेले दोन महिने संजय राऊत यांची धडपड सुरु होती. पत्र लिहिणं, ईडीवर आरोप करणं, किरीट सोमय्या आणि नील सोमय्यांवर आरोप करणं त्यांची मी अवस्था समजत होतो. नरेंद्र मोदींनी 12 पानी पत्र लिहावं आणि राज्यसभा अध्यक्षांना पत्र लिहिलं. किरीट सोमय्यांवर आरोप केले. संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांना वाटतं की पोलिसांचा माफियाप्रमाणं वापर करुन ईडी, सीबीआय, आयटी अधिकारी यांची तोंडं बंद करु शकतो. मात्र, संजय राऊत यांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. 1038 कोटी रुपयांचा घोटाळा याचा प्रविण राऊत मुख्य आरोपी होते. त्यांच्या खात्यातून वर्षा राऊत यांच्या खात्यात पैसे गेले. त्या पैशातून अलिबाग आणि दादरला जमीन खरेदी करण्यात आली. कारवाईच्या भीतीनं संजय राऊत यांनी 55 लाख परत केले, असं किरीट सोमय्या म्हणाले.
संजय राऊत यांची नौटकी सुरु होती. 55 लाख रुपये 8 महिन्यापूर्वी देऊन संजय राऊत यांनी त्यांच्या चोरीची कबुली दिली होती. उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांना जाब विचारायला हवा होता. 55 लाख रुपये परत दिल्याबद्दल दिलीप वळसे पाटील यांनी संजय राऊत यांची चौकशी करायला हवी होती. मात्र, किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांना जेल मध्ये टाका असं म्हणतात. गृहमंत्री भाषण करतात, ईडीच्या विरोधात एसआयटी करतोय. ही घटना कुणी लिहिलीय. मुख्यमंत्री उद्ध ठाकरे घटना लिहिणार आहेत का? बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली घटना आहे, असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.
2009 साली आमच्या कष्टातून घेतलेली जमीन आणि घर यासंदर्भातील कोणतीही चौकशी न करता जप्त करण्यात आली आहे. मनी लाँड्रिंग म्हणतात 1 रुपया खात्यात आला असेल आणि तसं झालं असेल तर आम्ही सगळी संपत्ती भाजपला दान करायला तयार आहोत. 2009 ची संपत्ती म्हणता एक एकर देखील जमीन नाही. पत्नीच्या आणि नात्यातील व्यक्तींच्या अधिकृत पैशातून घेतलेल्या जमीनी जप्त करण्यात आल्या आहेत. दादर मधील घर जप्त करण्यात आलं आहे. भाजपचे नेते नाच करत आहेत. यातून लढण्याची प्रेरणा मिळते, असं संजय राऊत म्हणाले.
इतर बातम्या: