‘त्या’ घोटाळ्याचा पाठपुरावा करण्यासाठी येणार असल्याचं कळवताच कोर्लईत गावबंदी; सोमय्यांचा आरोप

| Updated on: Jun 06, 2021 | 1:46 PM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी मंत्री रवींद्र वायकर यांच्या अलिबागमधील कोर्लई गावातील बंगल्यांच्या घोटाळ्याचा पाठपुरावा करण्यासाठी मी जाणार होतो. (Kirit Somaiya slams administration on 100% lockdown in korlai village, alibaug)

त्या घोटाळ्याचा पाठपुरावा करण्यासाठी येणार असल्याचं कळवताच कोर्लईत गावबंदी; सोमय्यांचा आरोप
Kirit Somaiya
Follow us on

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी मंत्री रवींद्र वायकर यांच्या अलिबागमधील कोर्लई गावातील बंगल्यांच्या घोटाळ्याचा पाठपुरावा करण्यासाठी मी जाणार होतो. तसे प्रशासनाला कळवलंही होतं. पण मी येणार म्हणताच कोर्लई गावात गावबंदी आणि घरबंदी जाहीर करण्यात आली. मला गावात येण्यापासून रोखण्यासाठीच कोरोनाचं कारण देऊन ही गावबंदी करण्यात आली आहे, असा आरोप करतानाच रायगड, महाराष्ट्रासह देशात अशाप्रकारची गावबंदी कुठे आहे?, कोर्लईतच गावबंदी का?, असा सवाल भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. (Kirit Somaiya slams administration on 100% lockdown in korlai village, alibaug)

किरीट सोमय्या यांनी मीडियाशी संवाद साधताना हा आरोप केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी मंत्री रवींद्र वायकर यांच्या 19 बंगल्यांच्या घोटाळ्याचा पाठपुरावा करण्यासाठी मी येत आहे, असं मी 1 जून रोजी कोर्लई ग्रामपंचायत, तहसीलदार आणि अधिकाऱ्यांना कळवलं होतं. त्यावर मला प्रशासनाने 4 जून रोजी गावबंदी आणि घरबंदीचा काढण्यात आलेला आदेश मला पाठवण्यात आला. त्यात कोर्लई गावातून बाहेर पडण्यास तसेच इतर गावातून कोर्लईत येण्यास प्रतिबंध लादला गेला आहे. तसेच गावातील शेवटचा कोरोना रुग्ण बरा झाल्यानंतरही 28 दिवसापर्यंत हा लॉकडाऊन, गावबंदी कायम राहील, असं अलिबाग प्रशासनाने या आदेशात म्हटलं आहे. 3 जूनला रोजीच हा आदेश काढण्यात आला आहे, असं सोमय्या यांनी सांगितलं.

अधिकार कोणत्या कायद्यांतर्गत?

या आदेशानुसार कोर्लई गावात 100 दिवसांची घरबंदी, गावबंदी राहणार आहे. गाव कोरोनामुक्त झाल्यानंतरही 28 दिवस गावबंदी करण्याचा अधिकार प्रशासनाला कोणत्या कायद्यांतर्गत मिळाला आहे? रायगड सोडा महाराष्ट्र आणि देशात अशा प्रकारची गावबंदी कुठे घालण्यात आली आहे? हे मला दाखवून द्या, असं सांगतानाच ही गावबंदी बेकायदेशीर आहे, असं ते म्हणाले.

अनिश्चित लॉकडाऊन फक्त कोर्लाईसाठीच का?

मी ठाकरे, वायकर परिवाराच्या 19 बंगल्यांच्या घोटाळ्याचा पाठपुरावा करण्यासाठी येत असल्याने प्रशासनाने आदेश काढला, असे मला म्हणायचे नाही. परंतु गावकऱ्यांवर अशा प्रकारचा अत्याचार, सत्येचा राक्षसी उपयोग कोणत्या कायद्याखाली केला? हा माझा ठाकरे सरकारला प्रश्न आहे, असं ते म्हणाले. कोरोना उपचाराला प्राधान्य देणं ही आमचीही जबाबदारी आहे. परंतु, कोर्लईत सत्तेचा राक्षसी दुरुपयोग करण्यात आला असून त्याचा पुनर्विचार व्हावा. लोकडाऊन 7-7 दिवसाचे असतात असे अनिश्चित लॉकडाऊन फक्त कोर्लाईसाठीच आहेत का?, असा सवालही त्यांनी केला. (Kirit Somaiya slams administration on 100% lockdown in korlai village, alibaug)

 

संबंधित बातम्या:

आधी सरकारने भूमिका जाहीर करावी, मग आरक्षण आंदोलनाचं नेतृत्व कुणी करायचं ते ठरवू: उदयनराजे भोसले

स्पुतनिक लसीच्या वितरकांशी चर्चा, जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात मोठा साठा उपलब्ध होणार : राजेश टोपे

मुंबईत अल्पवयीन तरुणीवर तीन ठिकाणी गँगरेप, सहा इन्स्टाग्राम फ्रेण्ड्सना अटक

(Kirit Somaiya slams administration on 100% lockdown in korlai village, alibaug)