मुंबई: भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी आज पुन्हा एकदा ठाकरे-पवारांवर टीका केली आहे. अमृता फडणवीसांवर नवाब मलिक यांनी आरोप केले आहेत. एवढ्या खालच्या पातळीवरचे आरोप केवळ ठाकरे-पवारच करू शकतात. ती नवाब मलिकांची कॅपेसिटी नाही, असा दावा किरीट सोमय्या यांनी केला.
किरीट सोमय्या यांनी आज पत्रकार परिषद घेऊन हा आरोप केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक हजार कोटींपेक्षा अधिक रक्कम नातेवाईकांच्या खात्यात वर्ग केली आहे. आम्ही तसा आरोप केला होता. मात्र, ईडी आणि आयकर विभागाच्या धाडीतून हे सिद्ध झालं आहे. त्यावरून लक्ष विचलीत करण्यासाठीच समीर वानखेडे आणि अमृता फडणवीस यांच्यावर टीका केली जात आहे. समीर वानखेडे आणि अमृता फडणवीस इतकं गलिच्छ राजकारण केवळ शरद पवार आणि उद्धव ठाकरेच करू शकतात. नवाब मलिकची एवढी कॅपेसिटी नाही, असं सांगतानाच केवळ लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी हे नाटक सुरू आहे. 19 दिवस ईडीची धाड सुरू आहे हे अजित पवारांनी सांगांवं, असं सोमय्या म्हणाले.
नवाब मलिक गेल्या 12 दिवसांपासून वानखेडेंवर आरोप करत आहेत. वानखेडे यांनी 2006मध्ये लग्न केलं. त्या आधी शेड्यूल कास्ट म्हणून ते नोकरीला लागले. तेव्हा तुमची अक्कल कुठे गेली होती? 2007मध्ये आयएएस, आयआरएस म्हणून ते सिलेक्ट झाले. तेव्हा का गप्प बसला? 2015-16मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर तुम्ही का गप्प बसला होता? कधी वानखेडेचं नाव काढायचं… कधी अमृता फडणवीसांवर टीका करायची… ही काय नौटंकी आहे? का ही पेड पब्लिसीटी? असा हल्ला त्यांनी चढवला.
अजित पवारांनी एक हजार 50 कोटीची बेनामी संपत्ती कशी जमवली? पवार कुटुंबांच्या जावयाच्या खात्यात पैसे कुठून आले आणि कसे गेले? याचं उत्तर ठाकरे पवारांना द्यावे लागेल. या सहा फटक्यांपैकी पहिला फटका मी फोडला आहे. हिंमत असेल तर ठाकरे पवारांनी यावर उत्तर द्यावं, असंही ते म्हणाले.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 1992-93मध्ये दंगलीच्या काळात भाषणं केली होती. त्यांची भाषणं ऐकली असती तर त्यांना कळलं असतं दाऊद आणि पवारांचे संबंध काय आहेत? असा टोलाही त्यांनी लगावला.
SuperFast News | सुपरफास्ट 50 गाव 50 बातम्या | 1 November 2021 https://t.co/21U0Dwt9M3 #News #Bulletin
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 1, 2021
संबंधित बातम्या:
Nawab Malik | ड्रग पेडलर जयदीप राणाशी फडणवीसांचे घनिष्ठ संबंध, नवाब मलिकांनी बॉम्ब फोडला
नवाब मलिकांच्या सनसनाटी आरोपांनंतर अमृता फडणवीसांचं ट्विट, म्हणाल्या…
(kirit somaiya slams sharad pawar and cm uddhav thackeray)