New year celebration : 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर मुंबईत महापौरांकडून झाडाझडती, मॉलला दिली अचानक भेट

| Updated on: Dec 31, 2021 | 7:29 PM

आज राज्यात तब्बल 8 हजार 26 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. त्यातले 5 हजार 428 रुग्ण एकट्या मुंबईतील आहेत. त्यामुळे पालिका प्रसासन अलर्ट मोडवर आहे. नववर्षाच्या पूर्वसंध्येला गर्दी होऊ नये यासाठी पालिका प्रशासन आणि महापौरांना कंबर कसली आहे.

New year celebration : 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर मुंबईत महापौरांकडून झाडाझडती, मॉलला दिली अचानक भेट
Follow us on

मुंबई : आज गर्दी टाळण्यासाठी मुंबई महापालिकेची यंत्रणा तर कामाला लागली आहेच, मात्र मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर याही फिल्डवर उतरल्या आहेत. मुंबईत महापौराकडून सध्या अनेक ठिकाणी पाहणी सुरू आहे. मुंबई आणि महाराष्ट्रावर सध्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची टांगती तलवार कायम आहे. आज राज्यात तब्बल 8 हजार 26 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. त्यातले 5 हजार 428 रुग्ण एकट्या मुंबईतील आहेत. त्यामुळे पालिका प्रसासन अलर्ट मोडवर आहे. नववर्षाच्या पूर्वसंध्येला गर्दी होऊ नये यासाठी पालिका प्रशासन आणि महापौरांना कंबर कसली आहे.

महापौरांची मॉलला अचानक भेट

संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता मुंबईत कडक निर्बंध लावण्यात आल्याचं बघायला मिळत आहे. मॉल्स धारकांकडून कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन होतंय की नाही? यासंदर्भात मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडून पाहाणी करण्यात आली. मुंबईतील ओबेरॉय मॉल, ग्रोव्हल मॉल आणि अंधेरीच्या इन्फिनिटी मॉलमध्ये महापौर किशोरी पेडणेकरांनी अचानक भेट दिली.

मॉलमध्ये आवश्यक उपाययोजना

नागरिक मॉलमध्ये नियमांचे पालन करताना बघायला मिळत आहे. मॉल्सच्या आतमध्ये सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन व्हावे यासाठी स्वतंत्र्य कर्मचाऱ्यारी नेमणूक करण्यात आली आहे. सोबतच सॅनिटायझेशन आणि मॉलमध्ये आत येणाऱ्या नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे की नाही? सोबतच तापमान देखील चेक करण्यात येत आहे. त्यामुळे तुर्तास तरी नियमांचे पालन होताना दिसून येत आहे. नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येत आहे. राज्यात मागील काही दिवसात कोरोना रुग्ण कमी झाल्याने थोडा दिलासा मिळाला होता, निर्बंध थोडे शिथिल झाले होते, मात्र पुन्हा राज्यातला कोरोना रुग्णांचा आकडा 8 हजारांच्या पुढे गेल्याने निर्बंध आणखी कडक होण्याची शक्यता आहे.

भिर्रर्रर्र… सशर्त परवानगीनंतर सांगलीत रंगणार बैलगाडा शर्यत, मावळ आणि आंबेगाव तालुक्यातील बक्षीसही जाणून घ्या

डॉ. कारभारी काळे यांची ‘बाटु’च्या कुलगुरुपदी नियुक्ती,  निवड समितीची काळेंना पसंती

Tadoba tiger | सरत्या वर्षाने घेतला देशात 126 वाघांचा बळी; ताडोबात वाघोबाला पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी