वडिलांचे कार्यक्रम काहीही असोत, पण मुलगा चांगला आहे; महापौरांचा सोमय्यांना टोला

| Updated on: Jan 31, 2021 | 5:16 PM

महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना किरीट सोमय्या यांना टोले लगावले. (kishori pednekar reaction on neil somaiya extortion case)

वडिलांचे कार्यक्रम काहीही असोत, पण मुलगा चांगला आहे; महापौरांचा सोमय्यांना टोला
Follow us on

मुंबई: वडिलांचे कार्यक्रम काहीही असोत पण मुलगा चांगला आहे, अशा शब्दांत महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर टीका केली आहे. नील सोमय्या प्रकरणात पोलीस तपासातूनच सत्य बाहेर येईल, असंही महापौरांनी सांगितलं. (kishori pednekar reaction on neil somaiya extortion case)

महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना किरीट सोमय्या यांना टोले लगावले. किरीट सोमय्या नेहमी इतरांवर आरोप करत असतात. बेलगाम आरोप करणाऱ्या सोमय्यांचे कार्यक्रम काहीही असो पण त्यांचा मुलगा चांगला आहे. अर्थात खाई त्याला खवखवे म्हणायला हवं. बाकी उलट आरोप करणाऱ्यांना कावीळ झाली की त्यांना संपूर्ण जग पिवळं दिसतं, असा चिमटाही त्यांनी काढला. नील सोमय्या प्रकरणात पोलीस तपासातूनच सर्व काही स्पष्ट होईल, असंही त्या म्हणाल्या.

उद्यापासून मुंबईत लोकल सुरू करण्यात येणार आहे. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. कोरोनाच्या वाईट स्थितीतून आपण सावरत आहोत. पण मला वाटतं 80 टक्के लोक ठरवून दिलेल्या पाळतील. लोकांनी प्रशासनाने लोकलबाबत घालून दिलेले नियम काटेकोरपणे पाळावेत. प्रशासनाला साथ द्यावी, असं आवाहनही त्यांनी केलं.

महापालिका दिवाळखोरीत म्हणणं चुकीचं

मुंबई महापालिका दिवाळखोरीत असल्याचं वक्तव्य भाजप नेते आशिष शेलार यांनी केलं होतं. त्याचाही महापौरांनी समाचार घेतला. कोरोनामुळे भलेभले दिवाळखोरीत निघालेत. मुंबई महापालिकेलाही आर्थिक अडचणी आहेत. नाही असं नाही. पण महापालिका दिवाळखोरीत आहे, असं म्हणणं चुकीचं आहे. आरोप करणाऱ्यांना करू द्या. आम्ही मात्र महापालिकेची आर्थिक स्थिती मजबूत करू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

चार तास चौकशी

दरम्यान, भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांचे पूत्र नील सोमय्या याची एका जुन्या वादातून पोलीस चौकशी करण्यात आली आहे. पोलिसांनी काल शनिवारी नील सोमय्या यांना पोलीस ठाण्यात बोलावले होते. मुलूंड पोलीस ठाण्यात नील सोमय्या यांची तब्बल चार तास कसून चौकशी झाली. (kishori pednekar reaction on neil somaiya extortion case)

 

संबंधित बातम्या:

किरीट सोमय्यांनी पुन्हा वात पेटवली; ठाकरे सरकारच्या तीन कथित घोटाळ्यांची कागदपत्रे जाहीर

ठाकरे कुटुंबाचे 40 पैकी 30 जमिनींचे व्यवहार अन्वय नाईक यांच्याशी कसे?; सोमय्यांचा सवाल

मोठी बातमी: किरीट सोमय्यांच्या मुलाची जुन्या वादातून कसून चौकशी

(kishori pednekar reaction on neil somaiya extortion case)