‘किरीट सोमय्यांच्या आरोपांना सडेतोड उत्तर देणार’, किशोरी पेडणेकर पत्रकार परिषद घेऊन मांडणार रोखठोक भूमिका

| Updated on: Dec 14, 2022 | 11:56 PM

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या नेत्या आणि मुंबई महापालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

किरीट सोमय्यांच्या आरोपांना सडेतोड उत्तर देणार, किशोरी पेडणेकर पत्रकार परिषद घेऊन मांडणार रोखठोक भूमिका
Follow us on

मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या नेत्या आणि मुंबई महापालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. “किशोरी पेडणेकर यांनी SRA वरळी येथे राहते असं सांगितलं. मुंबई महापालिकेन चौकशी केली. त्यातून महापालिकेनं अहवाल दिला आहे की, पेडणेकर यांनी घुसखोरी करून ताबा घेतला आहे”, असा गंभीर आरोप किरीट सोमय्या यांनी केला. त्यांच्या आरोपांना आपण उद्या पत्रकार परिषद घेऊन उत्तर देऊ, असं किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं आहे.

“दोन वर्षांपूर्वी तक्रार केली होती. आता त्यांना 48 तासांत गाळा रिकामा करावा लागणार आहे. पेडणेकर यांनी अनेक गाळे ढापले आहेत, त्यांनी कोरोना काळातही पैसे कमावले आहेत”, असादेखील गंभीर आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.

“आम्ही मुंबई उच्च न्यायालयात याचिका केलीय. तसेच मुंबई पोलिसांत तक्रार केलीय. हा आदेश निघालाय. त्याच आधारावर मी मुंबई पोलिसांकडे पुन्हा पाठपुरावा करणार की किशोरी पेडणेकरांच्या विरोधात गुन्हा दाखल व्हावा”, अशी प्रतिक्रिया किरीट सोमय्या यांनी दिली.

हे सुद्धा वाचा

किरीट सोमय्या यांच्या आरोपांवर किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली.

“मी ट्विटरवर विनास्वाक्षरी एक ऑर्डर व्हायरल होताना पाहिलंय. सत्तेची मस्ती कशी असते ही मी आता पाहतेय. मी उद्या यावर स्पष्टीकर देते. याच्या तळ्याशी जा. खोटे आरोप करायचे आणि बदनाम करण्याचे हे षडयंत्र आहे. त्याला मी उद्या पत्रकार परिषदेतून उत्तर देईन”, अशी प्रतिक्रिया किशोरी पेडणेकर यांनी दिलीय.