Indian Railway : देशातील सर्वात मोठा रेल्वे प्रवास अन् सर्वात छोटा प्रवास कोणता?

| Updated on: Jun 16, 2023 | 2:40 PM

Indian Railway : भारतील रेल्वेत हजारो कर्मचारी काम करतात. रेल्वेतून रोज लाखो जण प्रवास करत असतात. देशातील अनेक भागांना जोडण्याचे काम रेल्वेने केले आहे. मग देशातील सर्वात लांब प्रवास कोणत्या रेल्वेचा आहे...

Indian Railway : देशातील सर्वात मोठा रेल्वे प्रवास अन् सर्वात छोटा प्रवास कोणता?
Follow us on

मुंबई : लाखो प्रवाशांसाठी भारतीय रेल्वे महत्वाचे प्रवाशाचे साधन आहे. भारतीय रेल्वेचे जाळे काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत पसरलेले आहे. रेल्वेशी संबंधित असे रोचक माहिती आहे. ही माहिती अनेकांना नाही. देशातील सर्वात लांब आणि सर्वात लहान रेल्वे प्रवास कोणत्या रेल्वेचा आहे? कदाचित तुम्ही त्या रेल्वेतून प्रवाससुद्धा केला असणार. त्यातून सर्वात कमी प्रवास असणारी ट्रेनचे दोन्ही स्टेशन महाराष्ट्रातच आहे.

सर्वात लांब प्रवास कोणता

भारतीय रेल्वेचा सर्वात मोठा रेल्वे प्रवास पूर्ण करण्यासाठी तीन दिवस लागतात. ही ट्रेन चार हजार किलोमीटरहून अधिक अंतर कापते. 9 राज्यांमधून ती रेल्वे जातो. विवेक एक्सप्रेस असे या गाडीचे नाव आहे. सर्वात लांब मार्गावर धावणारी विवेक एक्सप्रेस 2011-12 मध्ये सुरु झाली. स्वामी विवेकानंद यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त ही ट्रेन सुरू करण्यात आली. ही ट्रेन आसाममधील दिब्रुगड ते तामिळनाडूमधील कन्याकुमारीपर्यंत धावते. या ट्रेनला डिब्रूगड ते कन्याकुमारी दरम्यानचे ४१८९ किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी ३ दिवस लागतात. प्रवासादरम्यान ट्रेन 59 स्थानकांवर थांबते.

किती वेळ लागतो

दिब्रुगढ-कन्याकुमारी विवेक एक्सप्रेसला हा प्रवास पूर्ण करण्यासाठी 74 तास 35 मिनिटे लागतात. ही ट्रेन आठवड्यातून फक्त दोन दिवस धावते. दिब्रुगढ येथून संध्याकाळी 7.25 वाजता निघते आणि सुमारे 74.35 तासांनी दुपारी 22.00 वाजता कन्याकुमारी स्थानकावर पोहोचते.

हे सुद्धा वाचा

सर्वात लहान प्रवास कोणता

सर्वात लांब पल्ल्याच्या ट्रेननंतर, सर्वात लहान रेल्वे कोणता आहे? सर्वात लहान रेल्वे मार्गाचे अंतर फक्त 3 किमी आहे. हे अंतर कापण्यासाठी ट्रेनला चार ते पाच काही मिनिटे लागतात. महाराष्ट्रातील नागपूर ते अजनी दरम्यान सर्वात लहान रेल्वे मार्ग आहे. या मार्गावर 4 ते 5 गाड्या धावतात. विदर्भ एक्सप्रेस, नागपूर-पुणे गरीब रथ आणि नागपूर-पुणे एक्सप्रेस हे अंतर चार ते पाच मिनिटांत कापतात.

भारतीय रेल्वेत बदल

भारतीय रेल्वे कात टाकत आहे. भारतीय रेल्वेत अनेक बदल होत आहे. आता वंदे भारत एक्स्प्रेस सुरु झाली आहे. देशभरात ही ट्रेन नव्या युगाची ट्रेन मानली जात असून तिला ‘मेक इन इंडिया’ मोहिमेंतर्गत तयार करण्यात आले आहे. विशेष म्हणजे तिची प्रवासी वाहण्याची क्षमता ही ‘शताब्दी एक्स्प्रेस’ पेक्षा अधिक आहे. पहिली वंदेभारत वाराणसी ते दिल्ली, दुसरी दिल्ली ते काटरा, तिसरी मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, चौथी दिल्ली ते चंदीगड, पाचवी चेन्नई ते म्हैसूर तर सहावी बिलासपूर ते नागपूर दरम्यान सुरू करण्यात आली आहे.