मुंबई: गुरु माँ साध्वी कांचन गिरी या मुंबईत आल्या आहेत. त्यांनी हिंदुराष्ट्राच्या स्थापनेचं अभियान त्यांनी हातात घेतलं आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. यापूर्वी त्यांनी जम्मू-काश्मीरच्या लाल चौकात तिरंगा फडकवण्याची घोषणा केली आहे. आता त्या हिंदुराष्ट्र स्थापनेच्या संकल्पनेसाठी लढत आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्या चर्चेत आल्या असून त्यांच्या जीवनकार्यावर टाकलेला हा प्रकाश.
गुरु माँ कांचन गिरी या जुना आखाड्याशी संबंधित आहेत. त्या महिला संत म्हणून प्रसिद्ध आहेत. त्या दिल्लीच्या सेक्टर-5 मधील वैशाली येथे राहतात. त्यांनी मधल्या काळात देश बचाओ आंदोलन सुरू केलं होतं.
काही महिन्यांपूर्वी गुरु माँ कांचन गिरी यांना फोनवरून धमक्या येत होत्या. त्यांच्याशी फोनवरून अश्लील भाषेत बोललं जात होतं. तसेच त्यांच्यावर अॅसिड हल्ला करण्यासह जीवे मारण्याची धमकीही येत होती. याप्रकरणी त्यांनी गाझियाबादच्या इंदिरापूरम पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला होता.
हिंदू राष्ट्र व्हावं म्हणून त्यांनी देशभर दौरे सुरू केले आहेत. महाकाल मानव सेवा समितीच्या बॅनरखाली त्यांनी हे अभियान सुरू केलं आहे. त्यांनी देशातील अनेक भागात हिंदूराष्ट्र स्थापन्याचे बॅनर्स आणि पोस्टर्स लावले आहेत. हिंदुराष्ट्राची संकल्पना प्रत्यक्षात उतरावी म्हणून त्यांनी महाराष्ट्र, मध्यप्रदेशासह विविध राज्यातील नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत.
आधी महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशात जाईन. त्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये जाऊन काश्मीरच्या लाल चौकात तिरंगा फडकवणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. या दौऱ्यात त्या संत समाजाशीही चर्चा करणार आहेत.
हिंदुराष्ट्र उभारणीच्या संकल्पाला बळ मिळावं म्हणून त्यांनी देशभरातील विविध नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्या आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना भेटण्यासाठी कृष्णकुंजवर आल्या होत्या. तब्बल तासभर त्यांनी राज ठाकरेंशी चर्चा केली. हिंदुराष्ट्र उभारणीच्या अभियानात सहभागी होण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. तसेच राज ठाकरे यांना अयोध्येला येण्याचं निमंत्रणही दिलं आहे.
परप्रांतियांचा मुद्दा अज्ञानातून कांचनगिरी मां यांनी काल उत्तर भारतीयांच्या मुद्द्यांवरून राज यांच्यावर टीका केली होती. राज ठाकरे यांनी ती भूमिका अज्ञानातून घेतल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे आजच्या भेटीकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.
1991 पासून त्यांनी युरोपीय देशात भारतीय सनातन हिंदू धर्माचा प्रचार करत आहेत. त्या गेल्या 20 वर्षांपासून त्या इंग्लंड आणि अमेरिकेसारख्या देशातही हिंदू धर्माचा प्रचार करत आहेत.
महाकाल मानव सेवान समितीच्या माध्यमातून त्या पर्यावरणाची जागृती करतात
महिलांच्या प्रश्नांवरही त्या काम करत आहेत
महिलांच्या चुकीच्या साक्षीमुळे ज्या पुरुषांना फसवले गेले आहेत. त्या पुरुषांना न्याय देण्याचं कामही त्या करतात
त्या आगामी काळात धर्म ध्वज यात्रा सुरू करणार आहेत.
आत्महत्या करणाऱ्यांना या मार्गावरून न जाण्यासाठीही त्या प्रयत्न करत असतात.
संबंधित बातम्या:
Chhagan Bhujbal | …म्हणून अजिबात भीती बाळगण्याचं कारण नाही, हे सरकार मजबूत राहणार : छगन भुजबळ
Kirit Somaiya | अजित पवारांनी स्वत:चा कारखाना विकत घेतला, माझ्याकडे घोटाळ्याचे सगळे पुरावे
Nitesh Rane | गांज्यावर इतकं प्रेम बरं नाही, सामनावरून नितेश राणेंची संजय राऊतांवर टीका
(know about Sadhvi Kanchan giri)