Mumbai University : मुंबई विद्यापीठातील पदवी प्रवेशाचं वेळापत्रक जाहीर, संपूर्ण प्रवेश प्रक्रिया एका क्लिकवर…
मुंबई विद्यापीठात पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबई विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणी प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे.
mumbai university
Follow us on
मुंबई : मुंबई विद्यापीठात पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबई विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणी प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. आजपासून (5 ऑगस्ट) ऑनलाईन प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणीला सुरुवात झालीय. त्यामुळे इच्छूक विद्यार्थ्यांनी तातडीने आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी विद्यापीठाने ठरवून दिलेल्या प्रक्रियेप्रमाणे प्रवेश घेण्याची लगबग सुरू केलीय.
प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेचे वेळापत्रक
ऑनलाईन अर्ज विक्री 5 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट, 2021 (दुपारी 1 वाजेपर्यंत)
प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया 5 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट, 2021 (दुपारी 1 वाजेपर्यंत)
ऑनलाईन फॉर्म सादर करण्याची तारीख 6 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट, 2021 (प्रवेशपूर्व नोंदणी फॉर्म आवश्यक) इन हाऊस अॅडमिशन आणि अल्पसंख्याक कोटा प्रवेश या कालावधीत करता येईल.
प्रवेशासाठी पहिली मेरिट लिस्ट कधी लागणार?
पहिली मेरीट लिस्ट 17 ऑगस्ट, 2021 ( सकाळी 11 वाजता)
ऑनलाईन कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरणे (हमीपत्र फॉर्मसह) 18 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट, 2021 (सायं. 3 वाजेपर्यंत )
प्रवेशासाठी दुसरी मेरिट लिस्ट कधी लागणार?
द्वितीय मेरीट लिस्ट 25 ऑगस्ट, 2021 ( सायंकाळी 7 वाजेपर्यंत)
ऑनलाईन कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरणे (हमीपत्र फॉर्मसह) 26 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट, 2021 ( दुपारी 3 वाजेपर्यंत)