Mumbai trans harbour sea link | शिवडी-न्हावा शेवा हा भारतातील सर्वात मोठा सागरी ब्रिज बनून तयार आहे. या ब्रिजच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 12 जानेवारीला मुंबईत येणार आहेत. मुंबईत बांधण्यात आलेला हा ट्रान्स हार्बर लिंकचा ब्रिज पाहून तुम्हाला लंडन ब्रिजचा विसर पडेल. या ट्रान्स हार्बर लिंकमुळे काही तासांचा प्रवास काही मिनिटांवर येणार आहे. पण भारतातील या सर्वात मोठ्या पुलावरुन सगळ्याच गाडया धावू शकणार नाही. काही गाड्यांनाच या ब्रिजवरुन परवानगी असेल. हा पूल 22 किमी लांबीचा असून मुंबई ते नवी मुंबई अंतर पार करण्यासाठी आता फक्त 20 मिनिट लागतील. या ट्रान्स हार्बर लिंकच्या सर्व डिटेल्स जाणून घ्या.
मुंबई पोलिसांनुसार, या ट्रान्स हार्बर लिंक MTHL वर चार चाकी वाहनांचा मॅक्सिमम स्पीड 100 किमी प्रती तास असेल. हा MTHL ब्रिज माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने अटल सेतू म्हणून ओळखला जाईल. 12 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या भव्य पुलाच उद्घाटन होणार आहे.
स्पीड लिमिट किती हवं?
एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या ट्रान्स हार्बर लिंकवर कार, टॅक्सी, हलकी वाहने, मिनीबस आणि टू-एक्सल बसच स्पीड लिमिट 100 किलोमीटर प्रतितास असेल. पुल चढताना आणि उतरताना गाडीचा वेग 40 किमी प्रतितास असेल.
किती हजार कोटी खर्च आला?
18,000 कोटी रुपये खर्चून हा मुंबई ट्रान्स हार्बर लिंक ब्रिज बांधण्यात आला आहे. मुंबईच्या शिवडी येथून हा ब्रिज सुरु होईल. रायगड जिल्ह्याच्या उरण तालुक्यात हा ब्रिज समाप्त होईल.
A night-time video of the Mumbai Trans harbour link. Connectivity & Commerce will be enhanced through the Commitment of hard-working, talented engineers.
Can’t wait to drive down this ‘golden ribbon.’Ack: @rajtoday pic.twitter.com/7vZ88jzGU8
— anand mahindra (@anandmahindra) January 10, 2024
मुंबईतून कुठल्या वाहनांना ईस्टर्न फ्री वेवर प्रवेश मिळणार नाही?
मुंबईकडून मल्टी-एक्सल अवजड वाहन, ट्रक आणि बसेसना ईस्टर्न फ्री वेवर प्रवेश मिळणार नाही. या वाहनांना मुंबई पोर्ट-शिवडी निकास (निकास 1 सी) चा उपयोग करावा लागेल. दुचाकी, मोपेड, तीन चाकी वाहन, ऑटो, ट्रॅक्टर, बैलगाडी आणि धीम्या गतीने धावणाऱ्या वाहनांना या ब्रिजवर प्रवेश नसेल. एमटीएचएल एक 6 पदरी समुद्री लिंक आहे. हा ब्रिज समुद्रामध्ये 16.50 किलोमीटर आणि जमिनीवर 5.5 किलोमीटर पर्यंत आहे. या ब्रिजमुळे मुंबई ते नवी मुंबई हे अंतर फक्त 20 मिनिटात गाठता येईल. आधी या प्रवासाला दोन तास लागायचे.