रोड इन्स्टॉलमेंटवर रोड तयार करण्याची कल्पना कशी सूचली?, ठाणे-भिवंडी बायपास रोड कसा बनवला?; गडकरींचा अफलातून किस्सा

| Updated on: Dec 17, 2021 | 3:44 PM

इन्स्टॉलमेंटवर टीव्ही घेणारा कदाचित मी पहिलाच मंत्री असेल असं सांगतानाच टीव्ही इन्स्टॉलमेंटवर मिळू शकतो तर रोड का इन्स्टॉलमेंटवर करता येऊ शकत नाही? असा प्रश्न मला पडला अन् त्यातूनच ठाणे-भिवंडी बायपास रोड तयार झाला, असं केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं.

रोड इन्स्टॉलमेंटवर रोड तयार करण्याची कल्पना कशी सूचली?, ठाणे-भिवंडी बायपास रोड कसा बनवला?; गडकरींचा अफलातून किस्सा
नितीन गडकरी
Follow us on

मुंबई: बांधकाम मंत्री असताना मी पुण्यात इन्स्टॉलमेंटवर टीव्ही घेण्यासाठी गेलो होतो. इन्स्टॉलमेंटवर टीव्ही घेणारा कदाचित मी पहिलाच मंत्री असेल असं सांगतानाच टीव्ही इन्स्टॉलमेंटवर मिळू शकतो तर रोड का इन्स्टॉलमेंटवर करता येऊ शकत नाही? असा प्रश्न मला पडला अन् त्यातूनच ठाणे-भिवंडी बायपास रोड तयार झाला, असं केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं.

मुंबईत एका कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी यांनी हा किस्सा सांगितला. 1995मध्ये आम्ही गुंतवणूकदारांकडे जात होतो. मात्र आता गुंतवणूकदार आमच्याकडे येत आहेत. 1994 जेव्हा मी नवीन मंत्री झालो होतो. तेव्हा माझ्याकडे नवीन टीव्ही आला होता. मी पुण्यात एका दुकानात गेलो होतो आणि दुकानदाराला म्हणालो मला इन्स्टॉलमेंटवर टीव्ही द्या. त्यावेळी मी सार्वजनिक बांधकाम मंत्री होतो. इन्स्टॉलमेंटवर टीव्ही घेणारा मी कदाचित पहिलाच मंत्री असेन. त्या दुकानदाराला समजले तेव्हा तो म्हणाला साहेब मी तुम्हाला नवीन पीस आला की देतो. पण तो टीव्ही काही मला मिळाला नाही, असं सांगतानाच त्यावेळी मी विचार केला जर टीव्ही इन्स्टॉलमेंटवर मिळू शकतो तर रोड का नाही मिळत? त्यावर मी विचार केला आणि पहिला ठाणे-भिवंडी बायपास बनवला, असं गडकरी यांनी सांगितलं.

दिल्लीला 12 तासात जाता येणार

देशात दोन गोष्टीवर फार प्रयत्न करावा लागत नाही. एक जनसंख्या आणि दुसरी ऑटो मोबाईल ग्रोथ. वरळी-वांद्रे हा प्रोजेक्ट 420 कोटींचा होता. नंतर तो प्रोजेक्ट साडे आठशे करोडवर गेला, असं त्यांनी सांगितलं. गुंतवणूकदारांची व्याप्ती आम्ही येत्या काळात वाढवत आहोत. यामुळे अनेक प्रोजेक्टची पूर्तता देखील लवकर होण्यास मदत होईल. आता 12 तासात रोडमार्गे मुंबई आणि दिल्ली जाता येईल, असंही त्यांनी सांगितलं.

अनेक प्रकल्प मार्गी लावता येतील

अगरबत्तीच्या काड्या आधी चीनमधून आयात व्हायच्या. मात्र त्रिपुरातून नागपूरमध्ये अगरबत्तीच्या काड्या आणल्या. त्यामुळे कॉस्ट खर्चही वाचला. हे फक्त उदाहरण आहे. असे प्रकल्प मार्गी लावता येतील, असंही त्यांनी सांगितलं.

पर्यायी इंधन देणार

दोन वर्षात इलेक्ट्रिक कारची किंमत पेट्रोल-डिझेल कारच्या किमती एवढी होईल. त्यामुळे सर्वसामान्यांना खूप मोठा दिलासा मिळेल. येत्या काळात आम्ही सर्व सामान्य लोकांना पर्यायी इंधन वापरण्याच्या संधी देत आहोत. त्यामुळे आटोमोबाईल क्षेत्रात भारत अग्रगण्य होणार आहे. रोजगाराच्या संधी देखील वाढणार आहेत. त्यामुळे गुंतवणूक वाढणार आहे. येत्या काळात नवीन गाड्यांची किंमत 35 टक्क्यांनी कमी होईल आणि जुन्या गाड्या भंगारात काढल्या नंतर प्रदूषणही कमी होईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

 

संबंधित बातम्या:

Elections: 106 नगर पंचायती आणि दोन जिल्हा परिषदेच्या स्थगित निवडणुका, अखेर पुढच्या वर्षीचा मुहूर्त

OBC Reservation: इम्पिरिकल डेटा येईपर्यंत निवडणुका घेऊ नका; पंकजा मुंडे यांची निवडणूक आयोगाकडे मागणी

TET Exam : तुकाराम सुपे, सावरीकर, देशमुखनं कोट्यवधी घेतले, आणखी आरोपींचा सहभाग, लिंक वाढणार: अमिताभ गुप्ता