मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडे विविध संघटनांच्या प्रतिनिधी मागण्यांसाठी कृष्णकुंजवर दाखल होत आहे. आज मंगळवार (11 नोव्हेंबर) कोळी बांधव, बँडवाले आणि वारकरी आपल्या विविध मागण्या घेऊन कृष्णकुंजवर जाणार आहे. यावेळी ते राज ठाकरेंसमोर मागण्यांचं गाऱ्हाण मांडणार आहे. (Koli, Musician and Warkari Various delegation Meet Raj Thackeray today)
नुकतंच मुंबईतील कोळी बांधवांनी राज ठाकरेंची भेट घेतली. यावेळी त्यांनी राज ठाकरेंसमोर विविध मागण्यांचं गाऱ्हाण मांडलं. या मागण्या ऐकल्यानंतर राज ठाकरेंनी मी सरकारशी याबाबत बोलेन असे आश्वासन दिले.
आज महाराष्ट्र वारकरी संप्रदाय पायिक संघाच्या महाराजांचे शिष्टमंडळ राज ठाकरेंची भेट घेणार आहेत. त्यावेळी वारकीय संप्रदायाला कार्तिकी वारीसाठी परवनगी द्या, अशी मागणी करण्यात येण्याची शक्यता आहे. चार महिन्यांपूर्वी पार पडलेल्या आषाढी यात्रा कालावधीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक निर्बंध शासनाकडून लादण्यात आले होते.
त्यावेळी वारकरी संप्रदायाकडून सामाजिक भान राखत वारी करण्यात आली होती. मात्र आता अनलॉक अतंर्गत कार्तिक वारीला परवानगी द्यावी, अशी मागणी वारकऱ्यांकडून केली जात आहे. याच मागणीसाठी वारकऱ्यांचं शिष्टमंडळ राज ठाकरेंची भेट घेणार आहे.
त्याशिवाय बँड, घोडे, रथ आणि लग्नसमारंभासंबंधी इतर व्यवसाय सुरु करावा, या मागणीसाठी मुंबई ठाणे ब्रास बॅन्ड वेलफेअर असोसिएशनचे पदाधिकारी राज ठाकरेंची भेट घेणार आहेत. यावेळी त्यांच्या शिष्टमंडळाकडून हा व्यवसाय सुरु करा, या मागणीसह इतरही मागणी केली जाणार आहे.
राज ठाकरेंना आतापर्यंत कोण कोण भेटलं?
संबंधित बातम्या :
PHOTO : राज ठाकरे पहिल्यांदाच राजभवनावर, राज्यपाल कोश्यारींसोबत विविध मुद्द्यांवर चर्चा