PHOTO | कोळी बांधवांचा नारळी पौर्णिमा सण आज उत्साहात संपन्न
नारळी पौर्णिमा हा कोळी बांधवांचा अतिशय महत्त्वाचा सण आहे. दर्याला नारळ सोडून कोळी बांधव मासेमारीला पुन्हा सुरुवात करतात. हा सण मुंबईसह आसपासच्या सर्व परिसरात मोठ्या उत्साहात पार पडला.
1 / 5
नारळी पौर्णिमेनिमित्त पर्यावरण, पर्यटन आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज नारळ विसर्जनाकरिता वरळी कोळीवाड्यात उपस्थित होते. शिवसेना शाखा क्रमांक 159 इथे पोचल्यानंतर ते सायकल चालवित समुद्र किनाऱ्यापर्यंत गेले. वरळी कोळीवाडा समुद्र किनाऱ्यापर्यंत आदित्य ठाकरे सायकलने आले. तेथे त्यांनी विधिवत पूजा अर्चना करून समुद्रात नारळ सोडला.
2 / 5
वर्सोवा येथे दर्याला नारळ अर्पण करुन आज नारळी पौर्णिमा साजरी केली. मुंबईच्या वेसावे म्हणजे वर्सोवा गावात नारळी पौर्णिमेची मोठी धामधूम पाहायला असते. या ठिकाणी 150 वर्षांपासून नारळी पौर्णिमा उत्सव कोळी बांधव साजरा करतात.
3 / 5
आजपासून सुरू झालेला हा उत्सव पुढे गोकुळाष्टमीपर्यंत सुरू रहातो. आज सोन्याच्या नारळ घेऊन वेसावे गावातील 9 गाव एकत्र येत पारंपरिक यात्रेने दर्याला नारळ अर्पण करतात. हिंगला देवी मंदिरापासून ते वर्सोवा किनाऱ्यापर्यंत ही शोभायात्रा निघते. सर्व कोळी बांधव पारंपरिक पद्धतीने वेशभूषा करून शोभायात्रेत सहभागी होतात.
4 / 5
चुनाभट्टी विभागातील आगरी कोळी समाज विकास संघांच्या वतीने चुनाभट्टी येथील मच्छी मार्केट येथे नारळी पौर्णिमा साजरा करण्यात आली यावेळी चुनाभट्टी विभागातील नागरिकांनी नारळ फोडून नारळी पौर्णिमा साजरा केला तसेच मुलींनी वेशभूषा आणि पारंपरिक नृत्य करुन नारळी पौर्णिमा साजरा केली.
5 / 5
मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे मिरवणूक बंद असल्याने यंदा देखील कोळी महासंघाचे अध्यक्ष देवानंद भोईर यांच्या हस्ते अतिशय साध्या पद्धतीने उत्सव साजरा करत कल्याण खाडीत नारळ अपर्ण करण्यात आला. यावेळी जगावर घोंघावणारे करोनाचे संकट दूर करण्याचे साकडे घालण्यात आले.