मुंबई – देशात सध्या एकच वाघ आहे आणि तो म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी..(PM Narendra Modi) त्यामुळे सारखं सारखं वाघ म्हणवून, घेऊ नका, असं सांगत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis)यांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray)आजच्या सभेत सडकून टीका केली आहे. यावेळी मुंबईत लंकादहन होणारच , मुंबई महापालिकेवर भाजपाचा भगवा फडकणारच असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. वाघाचे फोटो काढले म्हणजे वाघ होता येत नाही, अशा शब्दांत त्यांनी मुख्यमंत्र्यांवर शरसंधान साधले. तुम्ही कोणता संघर्ष केलात, तुम्ही कुठल्या आंदोलनात गेलात, असा प्रश्न त्यांनी उद्धव ठाकरेंना विचारला आहे. कोविडच्या काळातही तुम्ही मैदानावर न्वहतात, होतात ते फेसबुकवर होतात. आम्ही अलाईव्ह होतो, असे सांगत त्यांनी जोरदार टीकास्त्र सोडलंय.
उद्धव ठाकरेंच्या बाबरीच्या ढाच्याला हाच देवेंद्र फडणवीस खाली आणेल, असे सांगत त्यांनी उद्धव ठाकरेंना थेट आव्हान दिले. आपल्या पाठीत खंजीर खुपसून उद्धव ठाकरे सत्तेत आले, अशी टोलेबाजीही फडणवीसांनी केली.
शिवसेनेनं भाजपाच्या नाववर मते घेतली, संसार आमच्याशी केला आणि संपत्ती घेूऊन न सांगता, विधीवत घटस्फोट न करता तुम्ही पळून गेलात, विधीवत घटस्फोट तरी घ्यायचात, असे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली.
उद्धव ठाकरेंनी काल भाषणात शिवसेनेचं हिंदुत्व भाजपासोबत असताना गधाधारी होतं असं सांगितलं होतं,. तर ते खरंच आहे, तुमचं हिंदुत्व गधाधारीच आहे, गदाधारी नाहीये, अशी टीका फडणवीसांनी केली. तुम्ही काल म्हणालात लाथ मारलीत, लाथ गाढवच मारतात असे सांगत त्यांनी जोरदा टीका केली आहे.
यांच्याकडे काही बोलण्यासरखे नसले की मुंबईला वेगळे करायचे आहे, असा मुद्दा शिवसेना उपस्थित करते, अशी टीका देवेंद्र यांनी केली. कुणाच्या बापाची हिंमत आहे, मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळी करायची असे ते म्हणाले. मुंबई वेगळी करायची आहे पण ती तुमच्या भ्रष्टाचारापासून, अत्याचारापासून असे सांगत त्यांनी शिवसेनेवर सडकून टीका केली.
हिंदूह्रद्यसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी हा विचार केला असेल, की त्यांच्या मुलाच्या राज्यात हनुमानचालिसा हा राजद्रोह असेल आणि औजंगजेबाच्या समाधीवर जाणे, हा राजशिष्टाचार होईल. औरंगजेबाने जेव्हा संभाजीराजेंना मारले तेव्हा तो काय म्हणत होता, तो म्हणत होता धर्म बदल. संभाजीराजेंनी सांगितले जीव गेला गेला तरी चालेल पण धर्म, स्वराज्य देणार नाही. ओवेसी त्या ठिकाणी जातो, तुम्ही पाहत राहता. कुत्ताभीना पेशाब करेगा औरंगजेबके पहचानपर, अब तो भगवा हलरायेगा पुरे हिंदुस्थानपर, असं सांगत भाजपाने हिंदुत्वाची कास सोडले नसल्याचे त्यांनी सांगितले.