मुंबई: गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांना आयसीयूत दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असून त्या उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहेत, अशी माहिती लतादीदींवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी ही माहिती दिली आहे. ब्रीच कँडी रुग्णालयाबाहेर (Breach candy hospital) पत्रकार परिषद घेऊन डॉ. प्रतीत समदानी यांनी ही माहिती दिली. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) हे उपस्थित होते. लता मंगेशकर यांची आज अचानक तब्येत बिघडली होती. त्यांना श्वसनास त्रास होत असल्याने व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचंही डॉक्टरांकडून सांगितलं जात होतं. त्यामुळे लतादीदींच्या चाहत्यांनीही रुग्णालयाच्या दिशेने धाव घेतली होती. मीडियाच्या प्रतिनिधींनीही ब्रीच कँडीत धाव घेतली होती. त्यातच मनसे अध्यक्ष राज ठाकरेही ब्रीच कँडीला दाखल झाले होते. त्यामुळे लतादीदींच्या प्रकृतीबाबत अधिकच चिंता व्यक्त केली जात होती. मात्र, काही वेळी पूर्वी डॉक्टरांनी मीडियाशी संवाद साधला आणि लतादीदींची प्रकृती स्थिर असून त्या उपचाराला प्रतिसाद देत असल्याचं सांगितलं.
ब्रीच कँडिचे डॉक्टर प्रतीत समदानी यांनी पत्रकार परिषद घेऊन लता दीदींच्या प्रकृतीची माहिती दिली. लतादीदी ब्रीच कँडित अॅडमिट आहेत. त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं आहे. त्यांची ट्रीटमेंट सुरू आहे. त्या प्रोसेजरला टॉलरेट करत आहेत, असं समदानी यांनी सांगितलं. त्यानंतर डॉक्टर तात्काळ निघून गेले. त्यांनी मीडियाच्या कोणत्याही प्रश्नांची उत्तरे देणं टाळलं.
दरम्यान, लतादीदींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळताच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रुग्णालयात धाव घेतली. राज यांनी रुग्णालयात जाऊन डॉक्टरांची भेट घेऊन लतादीदींच्या प्रकृतीची माहिती घेतली. तसेच मंगेशकर कुटुंबीयांसोबत संवाद साधून लतादीदींच्या प्रकृतीबाबतची माहिती घेतली. गेल्या सव्वा तासापासून राज ठाकरे हे रुग्णालयातच आहेत. काही वेळा पूर्वी राज ठाकरे रुग्णालयाच्याच खाली आले होते. त्यामुळे ते मीडियाशी संवाद साधतील असे वाटत होते. मात्र त्यांनी मीडियाशी संवाद साधला नाही. त्याऐवजी डॉक्टरांनी अगदी मोजक्याच शब्दात मीडियाशी संवाद साधून त्यांच्या प्रकृतीची माहिती दिली.
दरम्यान, आज सकाळी लता मंगेशकर यांची प्रकृती अचानक बिघडली होती. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यामुळे त्यांना तात्काळ आयसीयूत दाखल करून व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं होतं. त्यामुळे चाहत्यांची चिंता वाढली होती.
संबंधित बातम्या: