नागपूर : महाराष्ट्रात ( Maharashtra) कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर आहेत. केंद्रानं कडक पावलं उचलावी, अशी मागणी करणारे पत्र देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहसचिवांना (Union Home Secretary) लिहिलंय. खार पोलीस स्टेशनसमोर ( Khar Police Station) किरीट सोमय्यांवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. राजकीय दबावामुळे पोलीस हल्लेखोर शिवसैनिकांवर कारवाई करत नाहीत, असा आरोप फडणवीस यांनी केलाय. केंद्र सरकारनं कडक पावलं उचलण्याची फडणवीसांनी पत्राद्वारे मागणी केली आहे. राज्यात कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे. राणा दाम्पत्याला अटक करण्यात आली. भाजप नेते मोहित कंबोज आणि किरीट सोमय्या यांच्यावर यांच्यावरही हल्ले करण्यात आले. त्यामुळं विरोधी पक्षानं ही बाब पत्राच्या माध्यमातून वरिष्ठांना कळविली आहे. त्यामुळं केंद्र सरकार कोणती पाऊलं उचलते, हे पाहावं लागेल.