डॉ. दाभोलकरांच्या हत्येप्रकरणातील सचिन अंदुरे, शरद कळसकर आहेत तरी कोण?

| Updated on: May 10, 2024 | 12:31 PM

Who Are Sharad Kalskar and Sachin Andure : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणात 11 वर्षानंतर निकाल लागला. पाचपैकी तीन आरोपींना सीबीआयच्या विशेष न्यायालयाने निर्दोष मुक्त केले तर दोन आरोपींना, शरद कळसकर, सचिन अंदुरे यांना जन्मठेप ठोठावली.

डॉ. दाभोलकरांच्या हत्येप्रकरणातील सचिन अंदुरे, शरद कळसकर आहेत तरी कोण?
हत्येप्रकरणाती अंदुरे, कळसकर कोण
Follow us on

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर विवेकवाद्यांवर हल्ले झाले. दाभोलकर खून खटल्याचा निकाल 11 वर्षांनी लागला. पुणे येथील सीबीआयच्या विशेष न्यायालयाने पाचपैकी तीन आरोपींची निर्दोष मुक्तता केली. तर शरद कळसकर, सचिन अंदुरे या दोघांना जन्मठेप ठोठावली. कोण आहेत हे दोघे? कोणत्या जिल्ह्यातील आहेत, हे काय काम करत होते, याविषयी अनेकांच्या मनात प्रश्न आहेत. यापूर्वीच्या ट्रायलमध्ये या सर्व माहितीची गोळाबेरीज झाली आहे. या निकालानिमित्तानं या दोघांच्या माहितीची ही उजळणी…

दबा धरुन केला गोळीबार

डॉ. नरेंद्र दाभोलकर हे सकाळी फिरायला जात असतं. यासंबंधीची सर्व रेकी आरोपींनी केलेली होती. 20 ऑगस्ट 2013 रोजी त्यांनी हत्या घडवून आणली. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिराच्या मागच्या बाजूला असलेल्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावरुन ते मॉर्निंग वॉकसाठी निघाले होते. यावेळी आरोपी दबा धरुन बसलेले होते. दुचाकीवरुन येत त्यांनी दाभोलकरांवर गोळीबार केला. त्यात डॉ. दाभोलकरांचा जागीच मृत्यू झाला. गोळीबारानंतर दोन्ही आरोपी दुचाकीवरुन पळून जाण्यात यशस्वी ठरले. यानंतर राज्यभरात आम्ही सारे दाभोलकर या सामाजिक चळवळीतून हजारो कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. त्यावेळेच्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सरकारवर मोठा दबाव निर्माण झाला होता. पुणे पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली.

हे सुद्धा वाचा

सचिन अंदुरे कोण?

शरद कळसकरचा हा जवळचा मित्र आहे. तो नालासोपारा स्फोटक प्रकरणात कळसकर सोबत होता. सचिनचे आई-वडिल हयात नाहीत. त्याला अटक झाली त्यावेळी तो छत्रपती संभाजीनगरमध्ये राहत होता. येथील राजाबाजार कुवारफल्ली येथे एका भाड्याच्या घरात त्याचे बिऱ्हाड होते. पत्नी आणि एका मुलीसह तो राहत होता. निराला बाजारातील एका कपड्याच्या दुकानात तो काम करत होता. एटीएसने त्याला अटक केली होती.

शरद कळसकर कोण आहे

शरद कळसकर हा सुद्धा छत्रपती संभाजीनगरमधील आहे. केसापूर येथील तो रहिवाशी आहे. छत्रपती संभाजीनगरमधील विवेकानंद महाविद्यालयात त्यानं बारावीपर्यंतचं शिक्षण घेतलं. त्यानंतर शिक्षणाला रामराम ठोकला. त्यानंतर तो कोल्हापूरला काम करणार असल्याचे सांगून त्याने घर सोडलं होतं. त्याच्या वडिलांकडे सहा एकर शेती आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या केल्याची कबुली शरदने यापूर्वीच दिली आहे.