कोल्हापूर – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी स्थापन झालेली महाराष्ट्र क्रांती सेना विधानसभा आणि लोकसभा निवडणुका लढवणार, पक्षाध्यक्ष सुरेश पाटील यांची घोषणा
………
नक्षली कनेक्शन प्रकरण – वरावर राव यांना श्वसनाचा त्रास, पुण्यातील ससून हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल
………
सोलापूर : जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना आजपासून स्थानिक ड्रेसकोडसोबत ब्लेझरची सक्ती, प्रार्थनेवेळी आणि परिपाठ सुरु करताना ड्रेसकोडसह ब्लेझर घालणे सक्तीचे, जिल्ह्यातील 13 हजार शिक्षकांवर ड्रेसकोडसह ब्लेझर घालणे बंधनकारक, उल्लंघन केल्यास कारवाई
………
नवी मुंबई : 10 ते 15 वेगवेगळ्या गंभीर गुन्ह्यांमधील फरार आरोपी अरविंद सोडा आणि त्याच्या साथीदारांच्या नवी मुंबई पोलिसांनी मुसक्या आवळल्या, नवी मुंबई पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाची धडक कारवाई
………
मुंबई : ओला-उबेरचं आंदोलन पोलसानी गुंडाळलं, लालबाग ते विधानभवन नियोजित मोर्चा, पोलिसांनी सर्व आंदोलकांना ताब्यात घेऊन आझाद मैदानात नेऊन सोडलं
………
ऐन हिवाळ्यात ठिकठिकाणी पावसाच्या सरी, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरीसह पंढरपुरात जोरदार पाऊस
………
पुणे : नक्षली कनेक्शनसंदर्भात पुणे पोलिस काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांची चौकशी करण्याची शक्यता, कॉम्रेड प्रकाश यांनी आरोपी सुरेंद्र गडलिंग यांना लिहलेल्या पत्रात दिग्विजय सिंह यांचा नंबर असल्याची माहिती
………
नवी दिल्ली : येत्या 22 नोव्हेंबरला दिल्लीत भाजपविरोधी पक्षांची बैठक, 2019 च्या निवडणुकीपूर्वी रणनिती आखण्यासाठी विरोधकांचं पाऊल
………
नवी दिल्ली : यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींकडून माजी पंतप्रधान इंदिरा गांधींना 101 व्या जयंतीनिमित्त आदरांजली
(फोटो – एएनआय)
………
मुंबई : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, तांत्रिक बिघाडामुळे वाहतूक 15 ते 20 मिनिटं उशिराने, कांजुरमार्ग स्थानकात सीएसएमटी-कल्याण लोकलमध्ये बिघाड, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी प्रवाशांचे हाल
………
नागपूर : बुट्टीबोरी परिसरात ‘प्रहार’च्या कार्यकर्त्यांचं पाण्याच्या टाकीवर चढून विरुगिरी आंदोलन, 40 हजार लोकांना रसायनयुक्त पाणी पुरवठा होत असल्याचा आरोप, मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा निर्धार