मुंबई : येत्या 18 जानेवारी रोजी राज्यातील 95 नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुका, 2 जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचा सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. तसेच सांगली-मिरज-कुपवाडा महानगरपालिकेच्या पोटनिवडणुकांसाठीही मतदान होत आहे. त्यामुळे सदर क्षेत्रातील मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी संबंधित मतदारसंघात सावर्जनिक सुट्टी देण्याचे सामान्य प्रशासन विभागाने जाहीर केले आहे.
मतदारांना त्यांच्या मतदानापासून वंचित राहू नये यासाठी ही सावर्जनिक सुट्टी नमूद करण्यात आलेल्या मतदारसंघाच्या क्षेत्रातील जे मतदार कामासाठी त्या त्या मतदार संघांच्या बाहेर असतील त्यांना देखील लागू राहणार आहे. त्याचप्रमाणे केंद्र शासनाची शासकीय कार्यालये, निम शासकीय कार्यालये, सावर्जनिक उपक्रम, बॅंका इत्यादींना ही सावर्जनिक सुट्टी लागू राहणार आहे.
राज्यातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, नाशिक, धुळे, अहमदनगर, जळगाव, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांतील 95 नगरपंचायतींकरिता निवडणुका होत आहेत. भंडारा व गोंदिया जिल्हा परिषदेच्या प्रत्येकी 7 पंचायत समित्या आणि सांगली-मिरज-कुपवाडा या एका महानगरपालिकेच्या पोट निवडणुकांकरिता ही सावर्जनिक सुट्टी असेल, असं सामान्य प्रशासन विभागाने जाहीर केलं आहे.
मागासवर्ग प्रवर्गाच्या निवडणुकांच्या जागा आता अनारक्षित करून त्या सर्वसाधारण प्रवर्गातून भरण्यासाठी 18 जानेवारी रोजी मतदान होईल. उर्वरित सर्व जागांसाठी पूर्वनियोजनाप्रमाणे 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान होईल. परंतु मतमोजणी मात्र सर्व ठिकाणी एकाच दिवशी 22 डिसेंबर ऐवजी 19 जानेवारी 2022 रोजी होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली. राज्यातील 106 नगरपंचायती, भंडारा व गोंदिया जिल्हा परिषद आणि त्यांअंतर्गतच्या 15 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सर्व जागांकरिता 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान होणार होते. त्याचबरोबर चार महानगरपालिकांतील 4 रिक्तपदांच्या आणि 4 हजार 554 ग्रामपंचायतींतील 7 हजार 130 रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठीदेखील 21 डिसेंबर रोजी मतदान होणार होते.
Maharashtra News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज फक्त TV9 Marathi वरhttps://t.co/GtnBm124ak#BREAKING | #BreakingNews | #NewsUpdate
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 14, 2022
संबंधित बातम्या:
Budget 2022 Date : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तारखा जाहीर, 1 फेब्रुवारीला बजेट सादर होणार
प्रश्न विचारणं सोपं असतं, त्याला अक्कल लागत नाही; मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला
NEET UG Counselling 2021 : नीट यूजी समुपदेशन कार्यक्रम जाहीर, केंद्रीय आरोग्य मंत्र्यांची घोषणा