लोकसभा निवडणुकीचा महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्यातील प्राचार उद्या १८ मे रोजी संपणार आहे. मुंबईतील सहा जागांसह राज्यातील १३ जागांवर २० मे रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी आज शुक्रवारी मुंबईत प्रचाराचा धडाका असणार आहे. राज्यात प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे एकाच व्यासपीठावर येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत महायुतीची शुक्रवारी संध्याकाळी पाच वाजता सभा होणार आहे. या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित राहणार आहेत. ही सभा शिवाजी पार्कवर होणार आहे.
महायुतीबरोबर महाआघाडीतील बड्या नेत्यांची आज शुक्रवारी सभा होत आहे. या सभेला इंडिया आघाडीचे नेते उपस्थित राहणार आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आपचे नेते अरविंद केजरीवाल उपस्थित राहणार आहेत. ही सभा संध्याकाळी सहा वाजता बीकेसी मैदानावर होणार आहे. या सभेला राहुल गांधी उपस्थित राहणार नाही.
इंडिया आघाडीच्या सभेला काँग्रेस नेते राहुल गांधी नसणार आहे. राहुल गांधी रायबरेली मतदार संघातून निवडणूक लढवत आहे. त्या ठिकाणी २० मे रोजी मतदान आहे. यामुळे या सभेला राहुल गांधी येणार नाही. परंतु १८ मे रोजी इंडिया आघाडी संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोड शोला अजित पवार यांची उपस्थिती नव्हती. त्यांना घशाच्या संसर्ग झाल्यामुळे ते नव्हते. त्यामुळे आज होणाऱ्या सभेला अजित पवार असणार का? हा एक प्रश्न आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर दादर परिसरात वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. दादर परिसरात अनेक ठिकाणी वाहनांसाठी नो पार्किंग झोन असणार आहे. मुख्य मार्गावर वाहतुकीत करण्यात आला आहे. शुक्रवारी दादरमधील अनेक रस्ते गरजेनुसार वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. सावरकर मार्ग, केळुस्कर रोड, केळकर मार्ग या रस्त्यावर पार्किंग करता येणार नाही. सभेसाठी येणाऱ्या वाहनांसाठी देखील विशेष पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज जाहीर सभा शिवतीर्थ येथे होणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त हा ठेवण्यात येणार आहे. दादर आणि माटुंगा परिसरातील तब्बल ३० ठिकाणी नो पार्किंग झोन ठेवण्यात आले आहे. सकाळी १० ते रात्री १० पर्यंत दादर आणि माटुंगा परिसरातील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. शिवाजी पार्कच्या संपूर्ण परिसरात आज सकाळी १० च्या नंतर झिरो पार्किंग करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सुरक्षा व्यवस्था पाहून हा सगळा वाहतुकीच्या बदलाचा निर्णय घेण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज तोफ शिवतीर्थावर धडाडणार आहे. आज महायुतीच मोठं शक्तिप्रदर्शन हे दादरच्या शिवाजी पार्क मैदानात सभेच्या माध्यमातून होणार आहे. आज या शिवतीर्थाच्या व्यासपीठावर नरेंद्र मोदी आणि मनसे प्रमुख राज ठाकरे एकत्र येणार आहेत. त्यामुळे हे दोन नेते आज या सभेत मुंबईकरांना काय आवाहन करणार हे पाहणे महत्वाच आहे. संपूर्ण शिवाजी पार्कत महायुतीमधील विविध पक्षांच्या झेंड्यांनी सजवला गेला आहे. शिवाजी पार्कमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे उभे २० फुटी हॉर्डिंग्स लावण्यात आले आहेत. मुंबईमधील ६ लोकसभा मतदार संघातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी ही सभा आज शिवतीर्थ येथे आयोजित करण्यात आली आहे.