मुंबईतील ‘बीकेसी’मध्ये इंडिया आघाडी करणार शक्तिप्रदर्शन, पण राहुल गांधी नसणार

| Updated on: May 17, 2024 | 11:02 AM

maha vikas aghadi mumbai rally: इंडिया आघाडीच्या प्रचाराची सांगता सभा शुक्रवारी संध्याकाळी सहा वाजता होत आहे. या सभेला काँग्रेस नेते राहुल गांधी नसणार आहे. त्यामुळे सध्या हा चर्चेचा विषय ठरला आहे. राहुल गांधी रायबरेली लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवत आहे.

मुंबईतील ‘बीकेसी’मध्ये इंडिया आघाडी करणार शक्तिप्रदर्शन, पण राहुल गांधी नसणार
rahul gandhi
Follow us on

लोकसभा निवडणुकीच्या राज्यातील शेवटच्या टप्प्यातील मतदान २० मे रोजी होत आहे. त्या प्रचाराची सांगता शनिवारी संध्याकाळी होणार आहे. त्यापूर्वी शुक्रवारी महायुती आणि महाविकास आघाडीकडून मुंबईत शक्तीप्रदर्शन करण्यात येणार आहे. इंडिया आघाडीचा भाग असलेल्या महाविकास आघाडीने शक्तीप्रदर्शनाची जय्यत तयारी केली आहे. परंतु यामध्ये महाविकास आघाडीतील महत्वाचे नेते असलेले राहुल गांधी उपस्थित राहणार नाही. मुंबईतील बीकेसी मैदानावर संध्याकाळी सहा वाजता होणाऱ्या या सभेत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष अन् ज्येष्ठ नेते शरद पवार, शिवसेना उबाठाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उपस्थित राहणार आहे.

राहुल गांधी का नसणार?

इंडिया आघाडीच्या प्रचाराची सांगता सभा शुक्रवारी संध्याकाळी सहा वाजता होत आहे. या सभेला काँग्रेस नेते राहुल गांधी नसणार आहे. त्यामुळे सध्या हा चर्चेचा विषय ठरला आहे. राहुल गांधी रायबरेली लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवत आहे. रायबरेली लोकसभा मतदार संघामध्ये २० मे रोजी मतदान होत आहे. त्यामुळे राहुल गांधी त्या मतदार संघात असणार आहे. ते मुंबईतील सभेला येणार नाही.

इंडिया आघाडीने भारत जोडोमध्ये केले होते शक्तीप्रदर्शन

राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेची सांगता मुंबईत झाली होती. या यात्रेची सांगता १७ मार्च रोजी शिवाजी पार्कवर झाली होती. त्यावेळी झालेल्या सभेला इंडिया आघाडीमधील सर्व नेते उपस्थित होते. राज्यातील महाविकास आघाडीच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा प्रारंभ तो म्हटला जात होतो. परंतु प्राचाराच्या सांगता समारंभात राहुल गांधी नाही. ती सभा शिवाजी पार्कवर झाली होती. परंतु आता शिवाजी पार्क मोदी यांच्या सभेसाठी बुक झाल्यामुळे महाविकास आघाडीला बीकेसी मैदानावर सभा घ्यावी लागत आहे.

हे सुद्धा वाचा

प्रचाराचा शेवटचा टप्पा असल्यामुळे महाविकास आघाडीने पूर्ण जोर लावला आहे. मुंबईतील सहा जागांवर महाविकास आघाडीने लक्ष केंद्रीत केले आहे. यामुळे मुंबईत नेमके काय होणार? हे चार जून रोजीच स्पष्ट होणार आहे.