कल्याण, कुर्ला, कोलाबा या ठिकाणी सर्वात कमी मतदान, निवडणूक आयोगाने काय म्हटलं

| Updated on: Sep 28, 2024 | 4:26 PM

Maharashtra election : केंद्रीय निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेतली. ज्यामध्ये त्यांनी राज्यातील निवडणुकीसाठीची तयारी कशा प्रकारे केली गेली आहे. याबाबत माहिती देण्यात आली. निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त यांनी याबाबत माहिती दिली. राज्यात लवकरच निवडणुकीच्या घोषणा होणार आहेत.

कल्याण, कुर्ला, कोलाबा या ठिकाणी सर्वात कमी मतदान, निवडणूक आयोगाने काय म्हटलं
Follow us on

निवडणूक आयोगाचे एक पथक महाराष्ट्र दौऱ्यावर आहे राज्यात लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून तयारीचा आढावा घेतला जाणार आहे. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत राज्यातील सर्वात कमी मतदान होणाऱ्या मतदारसंघातील मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. आयोगाने म्हटले की, जास्तीत जास्त लोकांनी मतदानासाठी बाहेर यावं. अपंगासाठी एक अॅप तयार केलं आहे. त्यांना मतदान करायचं असेल तर त्यांना व्हिलचेअर आणि स्वयंसेवकांची गरज पडली तर त्यात नोंदवायचं आहे. आम्ही त्यांना मदत करू.

‘मतदान करून घेण्यासाठी आम्हाला जिथे जायचं असेल तिथे आम्ही जाऊ. मागच्यावेळी आम्ही जंगलापर्यंत गेलो होतो. अंदमानमध्ये गेल्यावेळी आदिवासींची पहिल्यांदाच मतदान झालं. नंदूरबारमध्ये काही भागात मतदान करून घेणं टफ आहे. त्यांच्यासाठी हेलिकॉप्टर घेऊन जाऊ. त्यांना मतदान केंद्रापर्यंत आणू. त्यांना सर्व सुविधा देऊ.’

काही पोलिंग स्टेशनमध्ये मतदान जास्त नव्हतं. त्यांना मतदान करण्यासाठी बाहेर आणू. महाराष्ट्रात कुलाबा ४०, कल्याण ४१, कुर्ला ४४ या ठिकाणी सर्वात कमी मतदान होतं. त्यांनी सर्वांनी मतदान करावं. जम्मू काश्मीरशी तुलना केली तर. दोडा ७२ टक्के, पुंछ ७४ टक्के. बस्तर ६० टक्के आणि गडचिरोली ७३ टक्के मतदान होतं. गडचिरोलीमध्ये एवढं मतदान होत असेल तर कुलाबा, कल्याण आणि पुण्यातही एवढं मतदान होऊ शकतं. असं ही निवडणूक आयोगाच्या आयुक्तांनी म्हटले आहे.

‘महाराष्ट्रात एकूण ५९ कोटी मतदार आहेत. ज्यामध्ये पहिल्यांदाच मतदान करणारे १९.४८ लाख मतदार आहेत. १ लाख १८६ पोलिंग स्टेशन महाराष्ट्रात आहेत. ९ लाख नवीन महिला मतदार आहेत. महाराष्ट्रात महिला मतदार वाढवण्यात आम्ही यशस्वी आहे. शहरी विभागात १०० टक्के बुथवर सीसीटीव्ही लावण्यात येणार आहे. ग्रामीण भागात ५० टक्के बुथवर सीसीटीव्ही लावण्यात येणार आहे. ३५० बुथ असे असतील की ते फक्त तरुण मॅनेज करतील. म्हणजे जे लोक आता लोक नव्याने ज्वॉईन झाले आहेत ते मॅनेज करतील.’

‘महाराष्ट्रात तीन प्रमुख आदिवासी समूह आहेत. मतदान केंद्रावर व्हिलचेअरची व्यवस्था करण्यात येणार. प्रत्येक बुथवर एक रॅम्प असेल. पिण्याचे पाणी, वीज आणि टॉयलेटची व्यवस्था करणार आहोत. ज्या ठिकाणी रांगा लागतील त्याच्यामध्ये बँच आणि खुर्ची ठेवणार आहोत. मतदारांना बसण्यासाठीची व्यवस्था असेल. सिनीअर सिटीजनवर आमचं लक्ष असेल.’ असं ही निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार यांनी म्हटले आहे.