लढून पडू… मुंबईतील ‘या’ 5 जागा कुणालाच नको; महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांची नकार घंटा

| Updated on: Sep 12, 2024 | 5:59 PM

महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईतील विधानसभेच्या 5 जागा कुणालाही नकोशा आहेत. मुंबईत विधानसभेच्या 36 जागा आहेत. यापैकी 5 जागांवर महाविकास आघाडीतील एकाही पक्षाने दावा केलेला नाही.

लढून पडू... मुंबईतील या 5 जागा कुणालाच नको; महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांची नकार घंटा
महाविकास आघाडी
Image Credit source: ANI
Follow us on

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत जोरदार खलबतं सुरु आहेत. महाविकास आघाडीचा सध्या मुंबईतील जागांसाठीचा फॉर्म्युला निश्चित होतोय. कारण मुंबईत विधानसभेच्या एकूण 36 जागा आहेत. या जागांबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये चर्चा सुरु आहे. पण शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसचा अनेक जागांवर दावा आहे. तसेच शरद पवार गटाचा देखील काही जागांवर दावा आहे. त्यामुळे काही जागांवर तिढा वाढल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. असं असताना देखील काही जागा अशा आहेत ज्यांच्यावर महाविकास आघाडीतील तीनही पक्षांपैकी एकाही पक्षाने दावा केलेला नाही. त्या मतदारसंघांमध्ये सध्याच्या घडीला भाजपचे आमदार आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीच्या घटकपक्षांना या जागांवर निवडणूक लढवली तर आपला पराभव होईल, अशी भीती सतावत असेल का? असा प्रश्न निर्माण होतोय. त्यामुळे महाविकास आघाडीकडून संबंधित जागा कोणाच्या कोट्यात जातात ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.

‘या’ 5 जागांवर कुणाचाच दावा नाही

महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईतील विधानसभेच्या 5 जागा कुणालाही नकोशा आहेत. मुंबईत विधानसभेच्या 36 जागा आहेत. यापैकी 5 जागांवर महाविकास आघाडीतील एकाही पक्षाने दावा केलेला नाही. मलबार हिल, विलेपार्ले या जागांवर अजून कुणीही दावा केलेला नाही. या ठिकाणी भाजपचे आमदार आहेत. तसेच चारकोप, बोरीवली आणि मुलुंडच्या जागेवरही मविआत कोणत्याच पक्षाने दावा केलेला नाही. पाचही जागांवर भाजपचेच आमदार आहेत. त्यामुळे मविआच्या घटक पक्षांना या ठिकाणी जिंकण्याची खात्री नाही का? असा प्रश्न उपस्थित होतोय.

शरद पवार गट मुंबईतील 7 जागांसाठी आग्रही

दरम्यान, मुंबईतील 7 जागांसाठी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आग्रही आहे. अणुशक्ती नगर, कुर्ला, वर्सोवा, अंधेरी पश्चिम, दहिसर, घाटकोपर पूर्व, घाटकोपर पश्चिम या जागांसाठी शरद पवार गट प्रचंड आग्रही आहे. असं असलं तरीही मुंबईतील 20 जागांवर शिवसेना ठाकरे गट तर काँग्रेस 18 जागांवर ठाम आहे. काँग्रेसच्या कोट्यातील धारावीसाठी ठाकरे गट आग्रही आहे. तर ठाकरे गटाच्या कोट्यातील भायखळाच्या जागेसाठी काँग्रेस आग्रही आहे. त्यामुळे जागांची आदलाबदल होऊ शकते.