प्रकाश आंबेडकर नाराज की खूश होणार? महाविकास आघाडीचा प्रस्ताव काय? वाचा बैठकीतली इनसाईड स्टोरी

| Updated on: Mar 06, 2024 | 8:24 PM

महाविकास आघाडीतल्या घडामोडींकडे सध्या राज्याचं बारीक लक्ष आहे. एकीकडे महायुतीच्या जागावाटपासाठी जोरदार हालचाली सुरु आहेत. तर दुसरीकडे विरोधकांचं जागावाटप अंतिम टप्प्यात आलं आहे. या जागावाटपात आता फक्त प्रकाश आंबेडकर यांची भूमिका महत्त्वाची असणार आहे.

प्रकाश आंबेडकर नाराज की खूश होणार? महाविकास आघाडीचा प्रस्ताव काय? वाचा बैठकीतली इनसाईड स्टोरी
Follow us on

दिनेश दुखंडे, Tv9 प्रतिनिधी, मुंबई | 6 मार्च 2024 : महाविकास आघाडीने वंचित बहुजन आघाडीला 3 जागांचा प्रस्ताव दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वंचितला काँग्रेस एक, ठाकरे गट एक जागा देणार आहे. मविआची दोन जागांशिवाय आणखी एक जागा देण्याची तयारी आहे. तसेच वंचित बहुजन आघाडीसोबत न आल्यास महाविकास आघाडीचा 23, 15 आणि 10 फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर काय निर्णय घेतात? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. महाविकास आघाडीसाठी वंचितने सोबत येणं महत्त्वाचं आहे. पण प्रकाश आंबेडकर यांचा प्रस्ताव किंवा मविआचा प्रस्ताव आंबेडकरांना मान्य न झाल्यास ते सर्वच जागांवर निवडणूक लढवू शकतात. त्याचा फटका मविआलादेखील बसू शकतो. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिकेकडे सध्या राज्याचं लक्ष लागलं आहे.

महाविकास आघाडीचं आगामी लोकसभा निवडणुकीसाठीचं जागावाटप अंतिम टप्प्यात आहे. वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीकडून महाराष्ट्रातल्या 48 लोकसभा मतदारसंघांपैकी 3 लोकसभा मतदारसंघ सोडण्याचा प्रस्ताव आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज महाविकास आघाडीची मुंबईत बैठक पार पडली. या बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर प्रकाश आंबेडकर उपस्थित होते. जवळपास 4 तास बैठक चालली. त्या बैठकीत स्वत: प्रकाश आंबेडकर होते.

मविआच्या आजच्या बैठकीत काय घडलं?

महाविकास आघाडीच्या आजच्या बैठकीत अवांतर चर्चा झाली. विविध विचारांची देवाणघेवाण झाली. महाविकास आघाडीकडून तीन जागांचा प्रस्ताल प्रकाश आंबेडकर यांना देण्यात आला आहे. ते तीन मतदारसंघ कोणते हे वंचितने ठरवायचं आहे. दुसरीकडे मविआच्या या प्रस्तावावर कुणाकडूनही प्रतिक्रिया समोर आलेली नाही. प्रकाश आंबेडकर आज बैठकीतून बाहेर पडले तेव्हा त्यांनी फार प्रतिक्रिया दिली नाही. अजून चर्चा व्हायची आहे, असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं. त्यांनी ठोस प्रतिक्रिया देणं टाळलं.

महाविकास आघाडीकडून वंचितला सोबत घेण्याची भूमिका आहे. ठाकरे गट आणि काँग्रेस प्रत्येकी एक जागा वंचितसाठी सोडण्याच्या तयारीत आहे. पण तरीही वंचित सोबत नाही आली तर मविआचा ठरलेल्या फॉर्मुला निश्चित केला जाणार आहे. यानुसार ठाकरे गट 23, काँग्रेस 15, राष्ट्रवादी शरद पवार गट 10 असं समीकरण असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे सांगलीची जागा ठाकरे गट लढणार असल्याचं निश्चित झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यासाठी ठाकरे गट महाराष्ट्र डबल केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. चंद्रहार पाटील यांचा दोन दिवसांत पक्षप्रवेश केला जाण्याची शक्यता आहे.