MLC Election 2022: दणदणीत आणि खणखणीत विजय, गुलाल कुणाचा? वाचा कोण कोण निवडून आलं? कुणाला किती मते मिळाली

| Updated on: Jun 20, 2022 | 9:58 PM

MLC Election 2022: विधान परिषदेच्या दहा जागांसाठी ही निवडणूक पार पडली. भाजपने पाचवा उमेदवार दिल्याने या निवडणुकीची चुरस वाढली. या निवडणुकीत काँग्रेसचे भाई जगताप आणि भाजपचे प्रसाद लाड यांच्यात थेट लढत होती.

MLC Election 2022: दणदणीत आणि खणखणीत विजय, गुलाल कुणाचा? वाचा कोण कोण निवडून आलं? कुणाला किती मते मिळाली
आघाडीने उट्टं काढलं, दणदणीत आणि खणखणीत विजय
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: विधान परिषदेचे निकाल जाहीर झाले आहेत. या निकालात महाविकास आघाडीने आतापर्यंत पाच जागा जिंकल्या आहेत. तर (mahavikas aghadi) भाजपचे (bjp) पाचपैकी चार उमदेवार आतापर्यंत विजयी झाले आहेत. भाजपचे पाचवे उमेदवार प्रसाद लाड आणि काँग्रेसचे(congress) भाई जगताप यांच्यात विजयासाठीचा जोरदार संघर्ष सुरू आहे. या निवडणुकीत मोठा विजय प्राप्त करण्यासाठी महाविकास आघाडीने रणनीती आखली होती. तर राज्यसभा निवडणुकीची पुनरावृत्ती करण्यासाठी भाजपनेही फिल्डिंग लावली होती. या निवडणुकीत महाविकास आघाडीची 21 मते फुटल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे महाविकास आघाडीसाठी हा मोठा झटका असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, आघाडीतील कोणत्या उमेदवारांची मते फुटली हे अद्याप कळू शकलं नाही. काँग्रेसची दोन मते फुटल्याची तेवढी चर्चा आहे.

विधान परिषदेच्या दहा जागांसाठी ही निवडणूक पार पडली. भाजपने पाचवा उमेदवार दिल्याने या निवडणुकीची चुरस वाढली. या निवडणुकीत काँग्रेसचे भाई जगताप आणि भाजपचे प्रसाद लाड यांच्यात थेट लढत होती. या दोन्ही नेत्यांची मदार अपक्षांच्या अतिरिक्त मतांवर होती. तर आघाडी आणि भाजपचे सर्व उमेदवार सेफ होते. आज सकाळी मतदान प्रक्रिया पार पडली. त्यानंतर सायंकाळी 7 वाजून 18 मिनिटांनी मतमोजणीस सुरूवात झाली. त्यानंतर अवघ्या दोन तासात निवडणुकीचे निकाल हाती आले.

हे सुद्धा वाचा

विजयी उमेदवार आणि त्यांना मिळालेली मते

भाजप उमेदवार

1) प्रवीण दरेकर-26
2) राम शिंदे- 26
3) श्रीकांत भारतीय-26
4) उमा खापरे -26

शिवसेना

1) सचिन अहिर-26
2) आमशा पाडवी- 26

काँग्रेस

1) चंद्रकांत हंडोरे – 26
2) भाई जगताप –

राष्ट्रवादी

1) रामराजे नाईक निंबाळकर- 26
2) एकनाथ खडसे- 27

दोन मते बाद

मतमोजणीच्या वेळी राष्ट्रवादी आणि भाजपचं प्रत्येकी एक एक मत बाद झालं. भाजपच्या उमा खापरे आणि राष्ट्रवादीचे रामराजे नाईक निंबाळकर यांच्या मत पत्रिकेत खाडाखोड करण्यात आल्याने ही दोन्ही मते बाद करण्यात आली आहेत.

मतमोजणीला उशिराने सुरुवात

दरम्यान, दुपारी 4 वाजता मतदान करण्याची वेळ संपली. तोपर्यंत सर्वच्या सर्व 285 आमदारांनी मतदान केलं होतं. त्यानंतर सायंकाळी 5 वाजता मतमोजणीस सुरुवात होणार होती. मात्र, भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांनी आपली मतपत्रिका मतपेटीत टाकण्यासाठी सहायकाकडे दिली. त्यावर काँग्रेसने आक्षेप घेतला होता. याबाबत काँग्रेसने रिटर्निंग ऑफिसरकडे तक्रार केली. तर आजारी आमदारांसोबत सहायक घेऊन जाण्याची परवानगी घेण्यात आल्याचं पत्रं भाजपने रिटर्निंग ऑफिसरकडे सादर केलं. त्यानंतर काँग्रेसचा आक्षेप फेटाळून लावण्यात आला. त्यानंतर काँग्रेसने दिल्लीत केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. निवडणूक आयोगाने मात्र, आयोगाने काँग्रेसची ही तक्रार फेटाळून लावत मतमोजणीला परवानगी दिली होती. त्यानंतर दोन तासाने म्हणजे 7 वाजून 18 मिनिटांनी मतमोजणीस सुरुवात झाली होती.

कोटा कितीचा?

या निवडणुकीत विजयी होण्यासाठी सर्वच पक्षांना निवडणूक आयोगाने 26 मतांचा कोटा ठरवून दिला होता. मात्र, राजकीय पक्षांनी आपआपल्या सोयीनुसार मतांचा कोटा ठरवला होता. भाजपने आपल्या चार उमेदवारांसाठी 29 मतांचा कोटा ठरवला होता. राष्ट्रवादीनेही आपल्या उमेदवारांसाठी 29 मतांचा कोटा ठरवला होता. तर शिवसेनेकडून पहिल्या उमेदवाराला 35 आणि दुसऱ्या उमेदवारासाठी 29 मतांचा कोटा ठेवल्याचं सांगितलं जात होतं. काँग्रेसनेही आपल्या दोन्ही उमेदवारांसाठी 29 मतांचा कोटा ठरवला होता.

कुणाकडे किती बळ

विधानसभेत एकूण 285 आमदार आहेत. विजयासाठी प्रत्येक उमेदवाराला निवडणूक आयोगाने 26 मतांचा कोटा दिला होता. शिवसेनेकडे 55 मते होती. राष्ट्रवादीकडे 51,काँग्रेसकडे 44, भाजपकडे 106 आणि अपक्ष व इतरांची मिळून 29 मते होती. या 29 मतांमधील 6 अपक्षांची मते भाजपची होती. बविआची तीन मते कुणाकडे जाणार हे गुलदस्त्यात होतं. तर मनसेनेही आपले पत्ते खोललेले नव्हते. म्हणजे 29 मतांपैकी भाजपचे 6, बविआची तीन आणि मनसेचं एक मत अशी 10 मते आघाडीच्या बाजूची नव्हती. उरलेली 17 मते आघाडीची हक्काची होती. यातील काही अपक्ष शिवसेनेकडे तर काही राष्ट्रवादीकडे होते.