मुंबई: राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना ब्रेक द चेन अंतर्गत राज्य सरकारनं नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न सुरु केलाय. राज्य सरकारनं ठरवून दिलेल्या 5 स्तरांच्या नियमावलीत आजपासून बदल होणार आहे. प्रत्येक आठवड्याला जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेऊन नियमांत बदल केले जातील, असं सरकारनं आधीच सांगितलं आहे. ज्या जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा पॉझिटिव्हिटी रेट कमी असेल आणि 25 टक्क्यांपेक्षा कमी ऑक्सिजन बेड भरले असतील, अशा जिल्ह्याचा समावेश पहिल्या लेव्हलमध्ये करण्यात आला असून त्यामधील जिल्ह्यांतील निर्बंधाबाबत जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त निर्णय जाहीर करतील. सरकारने जाहीर केलेल्या निर्बंधानुसार अशा जिल्ह्यात अनलॉक केलं जाणार आहे.(Maharashtra 5 level unlock know your district in which level as per corona positivity rate and oxygen bed occupancy)
अहमदनगर , जळगाव , धुळे , पऱभणी , नांदेड ,जालना लातूर अमरातवती , यवतमाळ , वाशिम नागपूर वर्धा चंद्रपूर भंडारा गोदीया
दुस-या लेवलचे निर्बंध कुठल्या जिल्ह्यात ?
नंदुरबार , हिंगोली
मुंबई , मुंबई उपनगर , ठाणे , पालघर , नाशिक – सोलापूर. सांगली , औरंगाबाद , बीड अकोला बुलढाणा , गडचिरोली
रत्नागिरी , रायगड , सिंधुदुर्ग, पुणे , कोल्हापूर , सातारा
पहिली लेवल
सोलापूर
औरंगाबाद
नागपूर
ठाणे
नवी मुंबई
वसई – विरार
पुणे
मुंबई
कल्याण
नाशिक
पिपंरी चिचंवड
?पाच लेव्हल कशा आहेत??
?पहिली लेव्हल : पॉझिटिव्हीटी रेट पाच टक्के, तसेच ऑक्सिजन बेड 25 टक्क्यांपेक्षा कमी व्यापलेले असावेत.
?दुसरी लेव्हल : पॉझिटिव्हीटी रेट 5 टक्के ऑक्सिजन बेड्स 25 ते 40 टक्क्यांदरम्यान व्यापलेले असावेत.
?तिसरी लेव्हल : पॉझिटिव्हीटी रेट 5 ते 10 टक्के असावा. ऑक्सिजन बेड्स हे 40 टक्क्यांपेक्षा जास्त व्यापलेले असतील
?चौथी लेव्हल : पॉझिटिव्हीटी रेट 10 ते 20 टक्के असेल. तसेच येथे ऑक्सिजनचे बेड 60 टक्क्यांच्या वर व्यापलेले असतील तर
?पाचवी लेव्हल : पॉझिटिव्हीटी रेट 20 टक्क्यांच्या वर आणि ऑक्सिजन बेड हे 75 टक्क्यांपेक्षा जास्त प्रमाणात व्यापलेले असतील
दरम्यान, चौथ्या लेव्हलमध्ये असणाऱ्या सातारा, कोल्हापूर, पुणे, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमुळं राज्य सरकारसमोरील चिंता कायम आहे. या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्या जास्त आहे. प्रशासनाला या जिल्ह्यांतील कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. सातारा, कोल्हापूर, रायगड हे जिल्हे रेड झोनमध्ये आहेत. तर, पुणे, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी डेंजर झोनमध्ये आहेत.
LIVE : महत्त्वाच्या घडामोडी https://t.co/JfiSX4XdzA
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 14, 2021
संबंधित बातम्या:
Maharashtra Unlock | महाराष्ट्रात 7 जूनपासून अनलॉक, 5 टप्प्यात लॉकडाऊन हटवणार, मध्यरात्री आदेश जारी
(Maharashtra 5 level unlock know your district in which level as per corona positivity rate and oxygen bed occupancy)