राज्यातील एकूण 288 मतदारसंघातील मतदानाची प्रक्रिया पार पडली आहे. राज्यातील मतदारांनी त्यांचा मतदानाचा हक्क बजावला आहे. सर्व उमेदवारांचं भवितव्य हे मतपेटीत कैद झालं आहे. त्यामुळे आता सर्व राजकीय पक्ष, उमेदवार, कार्यकर्ते आणि जनतेला 23 नोव्हेंबरची प्रतिक्षा लागून आहे. राज्यात कुणाचं सरकार येणार? कोणत्या मतदारसंघातून कोण विजयी होणार? हे 23 नोव्हेंबरला स्पष्ट होणार आहे. मात्र त्याआधी मतदान पार पडल्यानंतर आता विविध संस्थेचे एक्झिट पोल समोर आले आहेत. या विविध संस्थांच्या एक्झिट पोलमध्ये कोणत्या पक्षाचं सरकार येईल? कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील? याबाबत काय अंदाज वर्तवण्यात आला आहे, हे जाणून घेऊयात.
मविआ अर्थात महाविकास आघाडीतील काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट हे 3 पक्ष आहेत. तर महायुतीत भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचा समावेश आहे. आतापर्यंत इलेक्टोरल एज, पोल डायरी, चाणक्य स्ट्रेटेजीस, मॅट्रिझ आणि पी मॉक्यू यांचे एक्झिट पोल समोर आले आहेत. या पोलनुसार कोणत्या पक्षाचे किती उमेदवार जिंकण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, हे जाणून घेऊयात.
इलेक्टोरल एजच्या एक्झिट पोलनुसार, मविआला सत्ता स्थापनेची सर्वाधिक संधी आहे. या पोलमध्ये मविआला 150 तर महायुतीला 118 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर मविआमध्ये काँग्रेस आणि महायुतीत भाजपला सर्वाधिक जागा मिळण्याचा अंदाज आहे.
इलेक्टोरल एज पक्षनिहाय अंदाज
महायुती – 118
मविआ -150
पोल डायरीच्या एक्झीट पोलनुसार, महायुतीचं सरकार येण्याचा अंदाज आहे. महायुतीला 122 ते186 उमेदवार विजयी होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर मविआचे 69 ते 121 पर्यंत जागा येण्याचा अंदाज आहे.
पोल डायरीच्या पोलनुसार पक्षनिहाय आकडे
महायुती – 122 ते186
मविआ 69-121
इतर 12 ते 29
मॅट्रिझ एक्झीट पोलच्या अंदाजानुसार, राज्यात महायुतीचं सरकार येणार आहे. महायुतील सहज मॅजिक फिगर गाठेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यानुसार महायुतीला 150 ते 170 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर मविआच्या 110 ते 130 उमेदवार जिंकण्याची शक्यता या एक्झीट पोलमधून वर्तवण्यात आली आहे.
महायुती – 150 ते 170
मविआ – 110 ते 130
इतर 8-10