Maharashtra Assembly Speaker Election: महाविकास आघाडीपाठोपाठ भाजपचा आमदारांना व्हीप; विधानसभा अध्यक्षाची निवडणूक होणार?

| Updated on: Dec 28, 2021 | 10:51 AM

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विधानसभा अध्यक्ष निवडीला घेतलेला आक्षेप आणि अध्यक्षपदाची निवडणूक होणारच अशी महाविकास आघाडीने घेतलेली ठाम भूमिका यामुळे आज काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Maharashtra Assembly Speaker Election: महाविकास आघाडीपाठोपाठ भाजपचा आमदारांना व्हीप; विधानसभा अध्यक्षाची निवडणूक होणार?
महाराष्ट्र विधानसभा
Follow us on

मुंबई: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विधानसभा अध्यक्ष निवडीला घेतलेला आक्षेप आणि अध्यक्षपदाची निवडणूक होणारच अशी महाविकास आघाडीने घेतलेली ठाम भूमिका यामुळे आज काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. त्यातच महाविकास आघाडीने आपल्या सर्वच्या सर्व आमदारांना व्हीप जारी केला आहे. महाविकास आघाडीने व्हीप जारी करताच भाजपनेही आमदारांना व्हीप जारी केल्याने विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा सस्पेन्स अधिकच वाढला आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवड प्रक्रियेला हरकत घेतली आहे. राज्यपालांनी पत्र लिहून ही हरकत घेतली आहे. त्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्र लिहूनच उत्तर दिलं आहे. निवड प्रक्रिया कायदेशीर आहे की नाही हे तपासण्याच्या उद्योगात पडू नये. आपला हस्तक्षेप करण्याचा संबंधच नाही, असं मुख्यमंत्र्यांनी पत्रात म्हटलं होतं. त्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अध्यक्षपदाची निवडणूक उद्या घेणारच असं म्हटलं होतं. त्यानंतर आज महाविकास आघाडीने आमदारांना व्हीप जारी केला आहे. आघाडीच्या आमदारांना व्हीप जारी झाल्यानंतर भाजपनेही आमदारांना व्हीप जारी केला आहे. त्यामुळे अध्यक्षपदाची निवडणूक होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

सकाळी 11 नंतर काय होणार?

दरम्यान, आज सकाळी 11 वाजेपर्यंत महाविकास आघाडीचे नेते राज्यपालांच्या उत्तराची वाट पाहणार आहेत. राज्यपालांचं उत्तर आल्यानंतर आघाडीचे नेते अध्यक्ष निवडीवर निर्णय घेणार आहे. त्यामुळे सकाळी 11 नंतर काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

भाजप कोर्टात जाणार?

दरम्यान, राज्यपालांच्या आक्षेपानंतरही विधानसभेच्या अध्यक्षाची निवड झाल्यास भाजपने आक्रमक भूमिका घेण्याचं ठरवलं आहे. भाजपने या निवडीला थेट कोर्टात आव्हान देण्याचं ठरवल्याचं सूत्रांनी सांगितलं.

राज्यपाल निर्णय घेऊ शकतात

राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या संपूर्ण प्रकरणावर सावध प्रक्रिया व्यक्त केली आहे. राज्यपाल त्यांना वाटेल तो निर्णय घेऊ शकतात, असं दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं आहे.

आक्षेप का?

राज्यात आतापर्यंत गुप्त मतदानाने विधानसभा अध्यक्षाची निवड करण्यात येते. मात्र, ठाकरे सरकारने या नियमात बदल केला. नव्या नियमानुसार गुप्त मतदानाऐवजी आवाजी मतदानाने अध्यक्ष निवडण्याची तरतूद राज्य सरकारने केली. त्याला राज्यपालांनी आक्षेप घेतला आहे. हा बदल घटनाबाह्य असल्याचं राज्यपालांनी म्हटलं आहे.

 

संबंधित बातम्या:

Maharashtra Assembly Speaker Election: अभ्यास आणि विद्वतेचं अजीर्ण होऊ नये, मुख्यमंत्र्यांच्या लेटर बॉम्बनंतर संजय राऊतांचं राज्यपालांवर शरसंधान

विधानसभा अध्यक्षाची निवड आज होणार? अधिवेशनाचा शेवटचा दिवस वादळी ठरण्याची शक्यता, राज्यपालांच्या संमतीशिवाय निवडणूक?

Maharashtra Assembly: शेवटच्या दिवशी तरी मुख्यमंत्री येणार का? राऊत म्हणतात, मुख्यमंत्री जिथून आहेत तिथून नियंत्रण!