Maharashtra Vidhan Sabha Live : भास्कर जाधवांची अखेर बिनशर्त माफी, देवेंद्र फडणवीस यांचं हक्कभगांचं चॅलेंजही स्वीकारलं

| Updated on: Dec 24, 2021 | 8:48 AM

Maharashtra Assembly Winter Session 2021 Live : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन (Maharashtra Assembly Winter Session 2021) आजपासून सुरु होत आहे. हिवाळी अधिवेशन 28 डिसेंबर 2021 रोजी संपणार आहे. दरवर्षी हिवाळी अधिवेशन नागपूरला घेण्यात येते. मात्र, यावेळी हे मुंबईत होणार आहे.

Maharashtra Vidhan Sabha Live :  भास्कर जाधवांची अखेर बिनशर्त माफी, देवेंद्र फडणवीस यांचं हक्कभगांचं चॅलेंजही स्वीकारलं
Maharashtra Assembly Session live
Follow us on

Maharashtra Assembly Winter Session 2021 Live :  राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन (Maharashtra Assembly Winter Session 2021) आजपासून सुरु होत आहे. हिवाळी अधिवेशन 28 डिसेंबर 2021 रोजी संपणार आहे. दरवर्षी हिवाळी अधिवेशन नागपूरला घेण्यात येते. मात्र, यावेळी हे मुंबईत होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) देखील विधिमंडळ अधिवेशनात उपस्थित असतील. विधिमंडळ अधिवेशनापूर्वी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) हे ठाकरे सरकारवर हल्लाबोल करण्याची शक्यता आहे.

Live TV: महाराष्ट्र विधानसभा अधिवेशन लाईव्ह (Maharashtra Vidhan Sabha Live )

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 22 Dec 2021 04:57 PM (IST)

    Varsha Gaikwad : वर्षा गायकवाड बाईट

    सध्या जी बातमी चालू आहे ती चुकीची आहे. सध्या ओमायक्रॉंचे रुग्ण वाढत आहेत त्याचं देखील निरीक्षण सुरू आहे त्यामुळेच आम्ही ऑनलाइन शिक्षण चालू ठेवलं आहे.

    हायब्रिड शिक्षण पद्धती सुरुच राहणार.
    ऑनलाईन-ऑफलाईन दोन्ही माध्यमातून शिक्षण सुरुच.

    ओमायक्रॉनमुळे शाळा बंद करण्याचा निर्णय नाही.

    एखाद्या ठिकाणी जास्त रुग्ण आढळले तर कायकरायचे हे स्थानिक प्रशासन ठरवेल…

    शक्ती कायद्यावर चर्चा होऊन तो २ दिवसांत मंजुर होईल.शक्ती कायदा पुढच्या खालच्या आणि वरच्या सभागृहात पुढील 2 दिवसांत मंजूर होईल. राज्यपाल देखील त्यावर सही करतील अशी आम्हाला आशा आहे

  • 22 Dec 2021 03:58 PM (IST)

    जितेंद्र आव्हाड ऑन मुख्यमंत्री

    कुणाच्या तरी आजारपणावर टीका करणे ही प्रगल्भता नाही

    जेव्हा गरज लागेल तेव्हा मुख्यमंत्री विधानभवनात येतील

    आपला बाप आजारी असताना आपण चर्चा करतो का?ती आपली संस्कृती नाही ना?

    कुणी वैयक्तिक टीका करत असेल तर मी बोलणार नाही

    शरद पवार साहेबांनी लागू केलेले आरक्षण आता रद्द होण्याची वेळ आलीय

    केंद्राने सांगितले इमेरिकल डाटा बरोबर आहे पण नंतर सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर हा डेटा बरोबर नाही असे म्हटले

    महाराष्ट्रला एक न्याय आणि मध्य प्रदेशला एक न्याय

    पण असो देर आये दुरुस्ती आई


  • 22 Dec 2021 03:39 PM (IST)

    मुंबई

    – भाजप मुख्यमंत्री यांच्या अनुपस्थितीवर प्रश्न उपस्थित करत आहेत, एकही कॅबिनेट त्यांनी चुकवली नही

    – प्रधानमंत्री संसदेत चालू आहे ते किती वेळ उपस्थित होते?

    – मंत्र्यांच्या कार्यालयात सही उद्धव साहेब करत न्हवते देवेंद्र साहेब पण तेच करत आहेत

    – सगळे फाईल वाचून मुख्यमंत्री क्लीअर करत आहेत

    – भाजप abvp ला भडकावून आत्मदाहानाचा काम करत होते

    – देशाचा आरक्षण संपवण्याचं काम भाजप करत आहे

    – विरोधी पक्षनेते यांनी affidevit सादर केला

    – फर्जीवाडा करून काही सदस्य निवडून येत आहेत

    – दरेकर साहेब यांचा फर्जीवाडा सामोर येईल

    – सामोर फर्जीवाडा सामोर अनार आहे

    – मुंबई बँकेतलं काम मी सामोर अनार आहे

    – मुंबई बँकेत ते 100 कोटी कधी भरत आहेत हे बघायचं आहे

    – कारवाई साठी पाठपुरावठा करणं माझं काम आहे

    – भरती घोटाळा सामोर आल्यावर हळू हळू

    – हा घोटाळा सुरुवातीपासून सुरु आहे

    – याचा सूत्रधार कौस्थूभ दवसे हा आहे

    – जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल

  • 22 Dec 2021 03:39 PM (IST)

    नवाब मलिक ऑन ओबीसी

    ओबीसीचे आरक्षण हे मंडळ आयोगाची अमल बजावणी झाल्यानंतर करण्यात आली

    भाजपची विद्यार्थी संघटना मंडळ आयोगा विरुध्द भडकवत होते

    हे लोकबसभेत सांगतात 97 टक्के डाटा बरोबर आहे.

    राज्यानंतर आता देशभर ओबीसी आरक्षण धोक्यात आले आहे हे आता भाजपवाल्याना कळले आहे

    आयोगाला ज्या निधीची गरज होती तो पुरवणी मागण्यात दिली आहे. लवकरच तो निधी वितरित होईल

    ऑन परीक्षा घोटाळा

    राज्यात इ प्रोर्टलच्या माध्यमातून एक कारभार मागच्या सरकारच्या काळात सुरू झाला

    आता भरती घोटाळा समोर आल्यानंतर हळूहळू तपास सुरू असताना 2018 ची प्रकरणे समोर आली आहे

    या सर्व घोटाक्याचा सूत्रधार कौस्तुभ धवसे आहे

    व्यापम सारखा मोठा घोटाळा या राज्यात झालेला आहे

    2016 -17 पासून हा घोटाळा सुरू आहे

    काही लोकांच्या मनात भीती आहे म्हणून हा तपास सीबीआयकडे वळवून तपास बंद करण्याचा प्रयत्न सुरू आहे

  • 22 Dec 2021 03:21 PM (IST)

    मुंबई

    एकनाथ शिंदे कर्नाटक सरकारच्या निषेध मांडत आहेत

    एकनाथ शिंदे यांनी केलेल्या निवेदनाशी आम्ही सहमत आहोत : प्रवीण दरेकर

  • 22 Dec 2021 03:18 PM (IST)

    जितेंद्र आव्हाड बाईट

    – 2016 साली पनवेलच्या हद्दीच्या बाहेर mmrda ची स्कीम होती त्याच्या अंतर्गत ही स्कीम होती

    – हसतंगाराला उशीर झाला

    – mmrda कडून म्हाडा कडे काहीच आलेलं नाही

    – विधान परिषदेत मी स्पष्ट सांगितलं कि म्हाडा कडे काहीच नाही आणि ती देण्याची आमची मानसिकता नाही

    – जितकी घरं देऊ शकू ती मुंबईत देऊ

  • 22 Dec 2021 02:24 PM (IST)

    Bhaskar Jadhav: भास्कर जाधवांनी बिनशर्त माफी मागत, देवेंद्र फडणवीस यांचं हक्कभगांचं चॅलेंज स्वीकारलं

    भास्कर जाधवांनी बिनशर्त माफी मागत, देवेंद्र फडणवीस यांचं हक्कभगांचं चॅलेंज स्वीकारलं आहे. त्यावेळेले माननीय विरोधी पक्षनेते जे बोललो ते मी बोललो आणि अंगविक्षेप केला, माझ्या बोलण्याच्या वेळी नकळत हातवारे होतात. मी नक्कल केली मात्र,  असंसदीय शब्द उच्चारलेले नाहीत. सुधीर मुनगंटीवार विलास काका उंडाळकर यांच्याबद्दल काय बोलले होते. त्यांनी माफी मागितली होती. अध्यक्ष महोदय तुमच्या सूचनेनुसार मी बिनशर्त माफी मागत आहे,  असं भास्कर जाधव म्हणाले. तर, देवेंद्र फडणवीस हक्कभंग आणणार असतील तर मी तयार आहे, असं भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे.

  • 22 Dec 2021 01:56 PM (IST)

    Pravin Darekar : आरोग्य विभागाच्या परिक्षेबाबत सरकारला विचारणा केली पण अत्यंत तकलादू उत्तर देण्यात आले: प्रविण दरेकर

    आरोग्य विभागाच्या परिक्षेबाबत सरकारला विचारणा केली पण अत्यंत तकलादू उत्तर देण्यात आले

    न्यासा कंपनीचे समर्थन करणारे उत्तर देण्यात आले

    न्यासा ब्लॅक लिस्ट असताना तिला पात्र करून काम दिले गेले

    अनेक अधिकारी दलालाना अटक केली तरी सरकार म्हणतेय आम्हाला माहिती द्या

    उत्तर द्यायचे नसेल तर तुम्ही त्या दलालांना पाठीशी घालण्याचे काम करत आहात

    हा जो घोटाळा झाला त्यात अनेक लोकांचा सहभाग आहे

    त्याचे धागेदोरे मंत्रालयापर्यत पोहोचले आहे

  • 22 Dec 2021 01:52 PM (IST)

    Prithviraj Chavan : अध्यक्ष निवडीची प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने व्हावी : पृथ्वीराज चव्हाण

    आज सभागृहात अध्यक्ष निवडीत बदल सुचवलेले आहेत

    खुल्या मतदानाने निवड प्रक्रिया व्हावी असा प्रस्ताव नियम समितीने पारित केला आहे

    त्याचा अहवाल मांडण्यात आला

    विधिमंडळाचे अधिवेशन पाच दिवसाचे असल्याने एक दिवसात निर्णय द्यावा असे ठरले

    उद्या त्यावर निर्णय होईल

    अध्यक्ष निवडीची प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने व्हावी

    परीक्षा घोटाळ्याची चौकशी झालीच पाहिजे दोषींवर कारवाई झाली पाहिजे

  • 22 Dec 2021 01:35 PM (IST)

    Devendra Fadnavis Bhaskar Jadhav: नितीन राऊत यांच्याकडून 15 लाखांचा उल्लेख, देवेंद्र फडणवीस आक्रमक

    नितीन राऊत यांनी 15 लाखांचा उल्लेख केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक भूमिका घेतली.  फडणवीस यांनी  राऊत यांनी माफी मागावी, असं म्हटलं. तर, यावरुन देवेंद्र फडणवीस आक्रमक झाले. त्यानंतर शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी या वादात उडी घेतली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस आक्रमक झाले. भास्कर जाधव यांना सस्पेंड करा, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली.

  • 22 Dec 2021 01:08 PM (IST)

    गट क आणि गट ड भरतीत जे घडलं ते नैतिक नव्हतं : राजेश टोपे

    कोरोना काळात आरोग्य विभागाची भरती होणं आवश्यक होतं. या सगळ्या जागा भराव्यात अशी माझी भूमिका आहे. गट क आणि गट ड भरतीत जे घडलं ते नैतिक नव्हतं. कुंपणानं शेत खालल्याचं समोर आलंय. ते दुरुस्त करणार आहे. जनतेच्या हितासाठी आरोग्य भरती करणं चुकीचं नाही. जे लोक या प्रकरणी दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात कोणतीही अडचण नाही, असं राजेश टोपे म्हणाले. जे दोषी असतील त्या कोणालाही पाठिशी घालण्याचं काम महाविकास आघाडी सरकार करणार नाही. गट क आणि गट डच्या तपासाचं काम पोलीस करत आहेत. गट क संदर्भात सध्या कोणतीही अडचण नाही, अशी माहिती आहे. गट ड संदर्भात अडचणी समोर आल्या आहेत. पोलीस तपासात बाबी समोर आल्यानंतर त्यासंदर्भात योग्य निर्णय घेऊ, असं राजेश टोपे म्हणाले.

  • 22 Dec 2021 01:02 PM (IST)

    गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडून शक्ती विधेयक विधानसभेत सादर

    गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडून शक्ती विधेयक विधानसभेत सादर करण्यात येत आहे. दिलीप वळसे पाटील शक्ती विधेयकातील तरतूदी विधानसभेत सादर करत आहेत.

  • 22 Dec 2021 12:45 PM (IST)

    नानाभाऊ दहावर्ष भाजमध्ये राहिले, आम्ही संस्कार दिले त्याचा वापर तर करा: सुधीर मुनगंटीवार

    सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीचा नियम बदलण्यावरील चर्चेत मतदारांशी बेईमानी हा शब्द वापरला, त्यावर नाना पटोले यांनी आक्षेप घेतला.  नानाभाऊ दहावर्ष भाजमध्ये राहिले, आम्ही संस्कार दिले त्याचा वापर तर करा, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

  • 22 Dec 2021 12:18 PM (IST)

    आरोग्य भरती परीक्षेचं काम न्यासालाच का? त्यांनी पेपर फोडण्यापासून सर्व काम केली: देवेंद्र फडणवीस

    अध्यक्ष महोदय मोठ्या प्रमाणात घोटाळे झाले आहेत. न्यासा कंपनीला 21 जानेवारी 2021 ला अपात्र ठरवलं गेलं. त्यानंतर 4 मार्च 2021 ला हायकोर्टाच्या निर्णयानं पात्र केलं. मात्र, चार कंपन्या डावलून न्यासाला काम दिलं. त्यानंतर आरोग्य भरतीमध्ये घोटाळा झाला. म्हाडा भरतीत घोटाळा झाला. टीईटी मध्ये घोटाळा झाला. या सरकारच्या काळात एकही परीक्षा घोटाळ्याशिवाय होत नाही. हे सगळे घोटाळे या ठिकाणी चालले आहेत. 25 आणि 26 सप्टेंबरला परीक्षा घेतली. न्यासानं या परीक्षेत पेपर फोडण्यापासून सर्व गोष्टी फोडण्यापर्यंत सर्व काम केली आहेत, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

  • 22 Dec 2021 12:09 PM (IST)

    पीक विमा कंपन्यांकडून महाराष्ट्राल्या शेतकऱ्यांना 2450 कोटी रुपयांचं पेमेंट केलं : दादा भुसे

    चालू वर्षात जे काही नियम आहेत त्यानुसार पीक विमा कंपन्यांना 2300 कोटी दिलेले आहेत. नियमांचा वापर करुन महाराष्ट्राल्या शेतकऱ्यांना 2450 कोटी रुपयांचं पेमेंट केलं आहे, असं उत्तर दादा भुसे यांनी विधानसभेत दिलं.

  • 22 Dec 2021 11:51 AM (IST)

    हे पहिलं चहापान आहे जिथं ज्यांनी आमंत्रण दिलं तेच गैर हजर होते : सुधीर मुनगंटीवार

    वीज बिलाची सूट यांनी काढली, कृषी पंपाच्या बाबत देखील चुकीचा निर्णय घेतला यामुळे शेतकऱ्यांचं खासकरून मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर अन्यया होतो आहे.

    हे पहिलं चहापान आहे जिथं ज्यांनी आमंत्रण दिलं तेच गैर हजर होते

    हजारो वर्षांपासून चार्ज दुसऱ्याकडे देण्याची पद्दत आहे आता यांनी ठरवलं आहे मीच ठरवेल ते धोरण आणि मीचं बांधेन तोरण असं सुरू आहे

    त्यांनी तत्काळ अजित पवार, आदित्य ठाकरे असोत यांना तत्काळ चार्ज द्यावा आपल्या सहकाऱ्यांवर विश्वास ठेवायला हवा

  • 22 Dec 2021 11:16 AM (IST)

    शक्ती विधेयकाला केंद्राचही सहकार्य मिळेल: निलमताई गोऱ्हे

    विधानपरिषदेच्या उपसभापती निलमताई गोऱ्हे यांनी विधिमंडळात शक्ती विधेयकावर संयुक्त समिती नेमण्यात आली होती. शक्ती विधेयकात आमच्या अपेक्षा पूर्ण झाल्याचं त्यामध्ये दिसेल. महिलांवरील हल्ले, अत्याचार यावर कारवाई करणारं विधेयक तयार करण्यात आलेलं आहे. सर्वांकडून विधेयक पास करण्यात यश मिळेल. केंद्र सरकारकडून देखील शक्ती विधेयक लागू करण्यास सहकार्य मिळेल, असं निलमताई गोऱ्हे म्हणाल्या.

  • 22 Dec 2021 10:56 AM (IST)

    Prasad Lad | राज्याचा कारभार आधांतरी, मुख्यमंत्र्यांना आदित्य किंवा अजितदादांना चार्ज द्यावा : लाड

    Prasad Lad | राज्याचा कारभार आधांतरीत, मुख्यमंत्र्यांना आदित्य किंवा अजितदादांना चार्ज द्यावा : लाड

  • 22 Dec 2021 10:55 AM (IST)

    Chandrakant Patil | मुख्यमंत्र्यांनी या वयात हट्ट करू नये, कोणाला तरी चार्ज द्यावा : चंद्रकांत पाटील

    Chandrakant Patil | मुख्यमंत्र्यांनी या वयात हट्ट करू नये, कोणाला तरी चार्ज द्यावा : चंद्रकांत पाटील

  • 22 Dec 2021 10:48 AM (IST)

    ईडीला सर्व माहिती, कागदपत्रं दिली आहेत – रविंद्र वायकर

    ईडीला सर्व माहिती, कागदपत्रं दिली आहेत – रविंद्र वायकर
    ईडीच्या सर्व प्रश्नांवर स्पष्टीकरण दिलेलं आहे.

  • 22 Dec 2021 10:46 AM (IST)

    विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन

    विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन
    कर्नाटकातील घटनेचा दोन्ही सभागृहात निषेध ठराव मांडणार.

    सभागृहात उपस्थित राहण्याबाबत बजावला व्हीप

  • 22 Dec 2021 10:39 AM (IST)

    मुख्यमंत्री अधिवेशनात येतील – आदित्य ठाकरे

    मुख्यमंत्री अधिवेशनात येतील – आदित्य ठाकरे

    आपल्या वेळेनुसार अधिवेशनात येणार.

    मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची तब्यत ठीक आहे

  • 22 Dec 2021 10:38 AM (IST)

    विधानभवन परिसरातील शिवरायांच्या पुतळ्यास अभिवादन

    विधानभवन परिसरातील शिवरायांच्या पुतळ्यास अभिवादन
    सत्ताधारी आमदारांकडून शिवरायांच्या पुतळ्यास अभिवादन
    कर्नाटकातील घटनेचा दोन्ही सभागृहात निषेध ठराव मांडणार.

  • 22 Dec 2021 10:34 AM (IST)

    राज्यात कोणतंही विकासकाम होत नाही – प्रवीण दरेकर

    सरकार हरवलय काय ? प्रवीण दरेकर
    प्रवीण दरेकरांची मविआ सरकारवर टीका
    राज्यात कोणतंही विकासकाम होत नाही

  • 22 Dec 2021 10:31 AM (IST)

    राज्याचा कारभार अस्थिर – प्रसाद लाड

    राज्याचा कारभार अस्थिर – प्रसाद लाड
    मुख्यमंत्र्यांनी आता आराम करावा
    ‘विषय खूप आहेत , पण सरकार बोलत नाही’

  • 22 Dec 2021 10:10 AM (IST)

    मुख्यमंत्र्यांचा आदित्य ठाकरेंवरही विश्वास नाही: चंद्रकांत पाटील

    मुख्यमंत्री आजारी असल्यानं गैरहजर असणं स्वाभाविक आहे. त्यामुळं मुख्यमंत्र्यांनी चार्ज दुसऱ्याकडे द्यायला हवा.काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून चार्ज परत मिळणार नाही, अशी शक्यता असल्यानं किमान तो आदित्य ठाकरेंकडे तरी चार्ज द्यावा, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आदित्य ठाकरेंवरही मुख्यमंत्र्याचा विश्वास नाही वाटतं, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

  • 22 Dec 2021 09:22 AM (IST)

    विधिमंडळ अधिवेशनापूर्वी महाविकास आघाडीची बैठक

    विधिमंडळ अधिवेशनापूर्वी महाविकास आघाडीची बैठक होणार आहे. या बैठकीत महाविकास आघाडी सरकारचे घटक पक्ष विरोधी भाजपला कसं रोखायचं यासंदर्भात चर्चा करु शकतात. भाजपला कसं रोखायचं यासंदर्भातील रणनिती सत्ताधाऱ्यांकडून ठरवली जाण्याची शक्यता आहे.

  • 22 Dec 2021 09:13 AM (IST)

    शेतकऱ्यांची नुकसान भरपाई, मराठा आणि ओबीसी राजकीय आरक्षण, महिला सुरक्षा, नोकर भरती गोंधळावरुन विरोधक आक्रमक होणार

    शेतकऱ्यांची नुकसान भरपाई, मराठा आणि ओबीसी राजकीय आरक्षण, महिला सुरक्षा, नोकर भरती गोंधळ, आरोग्य भरती गोंधळ, महावितरणकडून करण्यात येणारी सक्तीची वसुली या प्रश्नावर विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे.