पुणे : महात्मा गांधी जयंतीनिमित्त २ ऑक्टोबर रोजी भारतीय जनता पार्टीतर्फे राज्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रावसाहेब पाटील दानवे यांच्यासह पक्षाचे केंद्रीय व प्रदेश पदाधिकारी विविध ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमांत सहभागी होणार आहेत.
२ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधींचे विचार सामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी खादी प्रसारासाठी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. तसेच स्वच्छताविषयक आणि आत्मनिर्भर संकल्पनेच्या प्रसारासाठी विविध उपक्रम आयोजित केले जाणार आहेत.
प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील हे पुणे येथील कार्यक्रमांत सहभागी होतील. प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्या उपस्थितीत कोथरूड ( पुणे ) येथे स्वच्छतागृहांचे सफाई अभियान, खादी दुकानांना भेट , फिरत्या वाचनालयाचे लोकार्पण असे विविध कार्यक्रम होणार आहेत.
-माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे हे नागपूर
-केंद्रीय रस्ते बांधणी मंत्री नितीन गडकरी नगर
-रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे- जालना
-राष्ट्रीय सचिव विनोद तावडे, पंकजा मुंडे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आ.आशिष शेलार- मुंबई येथे,
-राष्ट्रीय सचिव विजयाताई रहाटकर औरंगाबाद
-प्रदेश उपाध्यक्ष संजय कुटे हे शेगाव
-सुरेश हाळवणकर कोल्हापूर
-प्रदेश सरचिटणीस आ. देवयानी फरांदे नाशिक
सुजितसिंह ठाकूर उस्मानाबाद
आ. रवींद्र चव्हाण पालघर येथे या कार्यक्रमांत सहभागी होणार आहेत.
याशिवाय पक्षाचे प्रदेश स्तरावरील अनेक पदाधिकारी, खासदार, आमदार व अन्य लोकप्रतिनिधी या कार्यक्रमांत सहभागी होतील, असे श्री. भांडारी यांनी पत्रकात नमूद केले आहे.
(maharashtra BJP organizes various programs on Gandhi Jayanti)
हे ही वाचा :
आनंदराव अडसूळ यांना दुसऱ्या रुग्णालयात हलवलं, ईडीच्या धाडीनंतर 4 दिवसांपासून उपचार
‘जलयुक्त शिवार’मुळे मराठवाड्यात महापूर, पर्यावरण तज्ज्ञांचा दावा, फडणवीसांच्या योजनेवर पुन्हा प्रश्न