मुंबई, दि. 7 फेब्रुवारी 2024 | महाराष्ट्राच्या राजकारणात काल एक महत्त्वाची घडामोड घडली. बऱ्याच महिन्यांपासून राजकीय जाणकार आणि सर्वसामान्यांच लक्ष लागलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल निर्णय आला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा ? याचा अखेर फैसला झाला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने या बद्दल मंगळवारी संध्याकाळी निर्णय जाहीर केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच नाव आणि चिन्ह अजित पवार गटाला मिळालं आहे. यापुढे अजित पवार गट अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल. शरद पवार गटासाठी हा मोठा झटका आहे. या निकालावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. आता महाराष्ट्र विधिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रतेबद्दलही लवकरच निर्णय येईल. विधानसभा अध्यक्ष निकाल देण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा आधार घेण्याची शक्यता आहे.
रायगड | महाड एमआयडीसीमध्ये एका कंपनीत भीषण आग लागली आहे. आगाीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
पुणे | पुरंदर येथील स्ट्राँगरुममधील ईव्हीएम चोरी प्रकरणी चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे. कंट्रोल युनिट चोरीस गेल्याच्या घटनेची चौकशी करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे. चौकशी अहवाल भारत निवडणूक आयोगास एक आठवड्याच्या आत सादर करण्याचे निर्देश देण्यात आली आहे. पुणे विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली व्दिसदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे. समितीत कोल्हापूरचे पोलीस महानिरीक्षक यांचाही समावेश आहे. अहवाल स्वयंस्पष्ट शिफारशीसह १२ फेब्रुवारी पर्यंत सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
मुंबई | राज्यातील मुस्लिम ओबीसी समाजासाठी संघर्ष करणारे नेते शब्बीर अन्सारी यांची कहाणी पुस्तक रूपाने सर्वांसमोर येणार आहे. त्यांच्या आयुष्याच्या प्रवासा बरोबरच मंडल साठी दिलेला लढा देखील या माध्यमातून सर्वांसमोर येणार आहे. उद्या दिनांक ८ फेब्रुवारी २०२४ रोजी मुंबईतील नरिमन पॉइंट येथील महिला आर्थिक विकास मंडळाच्या हॉल मध्ये हा कार्यक्रम पार पडणार आहे.
पुण्यातील कचरा डेपो बंद करण्याचा मुद्दा पुन्हा एकदा चिघळणार असल्याचं दिसत आहे. फुरसुंगी, उरुळी देवाची येथील कचरा डेपो बंद करण्याची पुन्हा एकदा मागणी करण्यात आली आहे. कचरा डेपो बंद करण्यासाठी 14 फेब्रुवारी रोजी पालिकेसमोर कचरा डेपो हटाव कृती समिती घंटानाद आंदोलन करणार आहे.
शरद पवार यांच्या पक्षाला मिळालेलं नाव 27 फेब्रुवारीपर्यंतच वैध राहणार असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे.
शरद पवार यांच्या पक्षाला नवं नावं मिळालं आहे. नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार असं नाव शरद पवार यांच्या पक्षाचं नाव असणार आहे. निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेलं हे नाव फक्त राज्यसभा निवडणुकीपर्यंत मर्यादीत असणार आहे.
दोन दिवसापूर्वी पुणे जिल्ह्यातील सासवड तहसील कार्यालयातून ईव्हीएम मशीनची चोरी झाली होती. ईव्हीएम मशीन चोरी प्रकरणी निवडणूक आयोगाने मोठी कारवाई केली आहे ईव्हीएम चोरीप्रकरणी तहसीलदार आणि पोलिस उपविभागीय अधिकारी निलंबित केले आहेत. तर जिल्हाधकारी आणि ग्रामीण पोलिस अधिक्षक यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे.
जळगावच्या चाळीसगावात भाजपच्या माजी नगरसेवकावर गोळीबार करण्यात आला आहे. चाळीसगाव शहरातील हनुमान वाडी या ठिकाणी हा गोळीबार झालाय. माजी नगरसेवक महेंद्र उर्फ बाळू मोरे हे आपल्या कार्यालयात बसलेले असताना अज्ञात तरुणांनी त्यांच्यावर गोळीबार केला आहे
मोरे यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. गोळीबाराचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून चार ते पाच अज्ञात तरुणांनी तोंडाला रुमाल बांधून मोरे यांच्यावर गोळीबार केला आहे.
पुणे | ईव्हीएम मशीन चोरी प्रकरणी निवडणूक आयोगाने मोठी कारवाई केली आहे. ईव्हीएम चोरीप्रकरणी तहसीलदार आणि पोलिस उपविभागीय अधिकारी यांना निलंबित केलं आहे. तर जिल्हाधकारी आणि ग्रामीण पोलिस अधिक्षक यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. दोन दिवसापूर्वी पुणे जिल्ह्यातील सासवड तहसील कार्यालयातून ईव्हीएम मशीन चोरी झाली होती.
नवी दिल्ली | केंद्रीय निवडणूक आयोगाने मंगळवारी 6 फेब्रुवारी रोजी अजित पवार यांना राष्ट्रवादी हे नाव आणि घडी हे चिन्ह दिलं. तर शरद पवार गटाला अधिकृत मान्यता दिली. त्यानंतर आता शरद पवार यांच्या गटाकडून निवडणूक आयोगाकडे तीन नावांची मागणी करण्यात आली आहे.
शरद पवार गटाकडून 3 नावांची मागणी
नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरद पवार
नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार
नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदराव पवार
वटवृक्ष या चिन्हासाठी शरद पवार गट अग्रही, सूत्रांची माहिती
नागपूर : निवडणूक आयोगाने शरद पवार यांच्या राष्ट्रवादी गटाचे चिन्ह काढून अजित पवार गटाला दिले. भारतीय निवडणूक आयोग ही भाजपाची स्क्रिप्ट वाचत आहे. त्यानुसार काम करत आहे. यापूर्वीही त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या बाबतीत आणि आता शरद पवार यांच्या पक्षाच्या बाबतीत जे निर्णय घेतलेले आहेत त्यावरून हे स्पष्ट होते, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.
जळगाव : निवडणूक आयोगाच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांना मिळाल्याचा आनंद साजरा करण्यात आला. अजित पवार गट आनंद साजरा करत असताना याच चौकात दुसऱ्या ठिकाणी शरद पवार गटाच्या वतीने निदर्शने करण्यात येत होती. अजित पवार यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह शब्दांचा वापर करण्यात आला. त्यामुळे अजित पवार यांच्याविरुद्ध अपशब्द वापरून घोषणाबाजी करणाऱ्या शरद पवार गटाच्या जिल्हाध्यक्षांसह 18 जणांविरुद्ध रामानंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.
जळगाव : ज्याच्या बाजूने लोक आणि बहुमत असत त्याच्याच बाजूने निकाल हा लागत असतो. अजितदादा यांच्या बाजूने 40 आमदार असल्याने साहजिकच त्यांच्या बाजूने निकाल लागला. विरोधकांचं कामच आहे, जे सुरू आहे त्याच्याविरुद्ध बोलणं आणि जितेंद्र आव्हाड यांनी त्यांचे काम केलं आहे असा टोला मंत्री गुलाबराव पाटील यांनी लगावला.
नागपूर : नागपूर बस स्थानकातील वर्क शॉपमध्ये गावठी बॉम्ब असल्याची माहिती मिळत आहे. पोलीस अधिकारी आणि बॉम्ब शोधक पथक घटना स्थळी दाखल झाले आहे. येथे सापडलेला गावठी बॉम्ब आता difuse करण्यासाठी नेला जात आहे.
उस्मानाबाद : कुर्डुवाडी येथील उद्धव ठाकरे गटाच्या 7 नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. तसेच, आम आदमी पार्टीचे महाराष्ट्र सचिव अजित खोत यांनीही शिवसेना पक्षात प्रवेश केला.
मुंबई : ससून डॉक परिसरात एक संशयास्पद बोट सापडली आहे. अब्दुल्ला शरीफ नावाची ही संशयास्पद बोट आहे. या बोटीमध्ये तमिळनाडूचे तीन रहिवासी आढळून आले. पोलिसांनी ही बोट ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू केली आहे. कुवेतमधून ही बोट आल्याची माहिती मिळत आहे. कुलाबा पोलीसांकडून याची चौकशी सुरू आहे.
राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार प्रहार केला. काँग्रेसकडे ना नेता आहे ना नीती असल्याची टीका त्यांनी केली. काँग्रेस आदिवासी, दलित विरोधी आहे. काँग्रेसने येथे गुलामीची मानसिकता रुजवल्याचा आरोप त्यांनी केला. काँग्रेसवर त्यांनी चौफेर हल्लाबोल केला.
तो गप्प बसत नाही, मग मी कशाला सोडू? मंत्री छगन भुजबळ यांच्यावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी टीका केली. ग्रामीण भागातील ओबीसी बांधवांना माझं विरोध नाही… पण त्याला सुट्टी नाही, तो कोणाचाच नाही, अशी टीका त्यांनी भुजबळांवर केली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या पुणे दौऱ्यावर जात आहेत. विविध विकास कामाचं देवेंद्र फडणवीस उद्घाटन करणार आहेत. आमदार सुनील कांबळे यांच्या मतदारसंघात उद्घाटन होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या आधी विकासकामाच्या उद्घाटनांचा धडाका सुरु होणार आहे.
रत्नागिरीतील गुहागरमधील प्रस्थापित एमआयडीसी रद्द करण्यात आली आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिली. गुहागर तालुकामधील अकरा गावांमधील जमीन एमआयडीसीसाठी भूसंपादन करण्यात आले होते. गुहागर तालुक्यातील देवघर झोबडी पंचक्रोशीतील ग्रामस्थांचा एमआयडीसीला विरोध होता. एमआयडीसी रद्द केल्याचा आदेश जारी करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय एमआयडीसी होणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले.
राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. काँग्रेसचे मोठे पतन झाले आहे. विचार करु शकत नाही, विचारापलिकडे हे अधःपतन झाले आहे, अशी घणाघाती टीका त्यांनी केली. काँग्रेसने ऐकण्याचं धैर्य हरवले आहे. काँग्रेसने लोकशाहीचा गळा घोटला असा आरोप पंतप्रधानांनी केला.
राज्य सरकाने काढलेल्या सगेसोयरे अध्यादेशाविरुद्ध आज चंद्रपूर शहरात ओबीसी, एसबीसी, एससी, एसटी आणि व्हीजे-एनटी समाजाच्यावतीने मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. या मोर्चात मोठ्या प्रमाणात लोकं सामील आहे. गांधी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा निघेल. मोर्चात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासह काँग्रेसचे जिल्ह्यातील सर्वच आमदार सक्रियपणे सहभागी होणार आहेत.
आदित्य ठाकरे यांच्या कल्याण लोकसभा दौऱ्यानंतर आता मनसे प्रमुख राज ठाकरे हे पण कल्याणच्या दौऱ्यावर येत आहेत. 14 किंवा 15 तारखेला राज ठाकरे कल्याण लोकसभेत दौरा करत कार्यकर्ता व पदाधिकाऱ्यांचे बैठक घेणार असल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली.
राष्ट्रवादीच्या नव्या चिन्हाबद्दल आज चार वाजेपर्यंत पर्याय देण्याचे आदेश निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला दिले आहेत. जे कोणतंही चिन्ह मिळेल ते घराघरात पोहचवलं जाईल असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
यशोमती ठाकूर यांनी राष्ट्रवादीच्या निकालावर प्रतिक्रीया दिली आहे. राष्ट्रवादीचं चिन्ह अजित पवारांना देणं लोकशाहीविरोधात असल्याचं मत यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केलं आहे.
घटना तज्ञ उल्हास बापट यांनी राष्ट्रवादीच्या प्रकणावर आपले मत मांडले आहे. ज्यांच्याकडे बहूमत त्यांच्या बाजूनं निकाल देणं चुकीचं असल्याचं ते म्हणाले. निवडणूक आयोगाकडून घटनेची पायमल्ली होत असल्याचेही ते म्हणाले.
राष्ट्रवादी पक्षाच्या नाव आणि चिन्हासाठी शरद पवार गट सुप्रीम कोर्टात आव्हान देणार आहे, मात्र त्याआधीच अजित पवार गटाने कॅव्हेट दाखल केले आहे.
विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. परिक्षेत गैरप्रकार रोखणारे विधेयक मंजूर झाले आहे. कायद्याचे उल्लंघन केल्यास 10 वर्षांची शिक्षा व दंडाची तरतुद करण्यात आली आहे.
जो निर्णय आहे त्यात आश्चर्यकारक गोष्टी दिसून येत आहेत. ते म्हणत आहेत अजित पवार यांची निवड चुकीची आहे. काका मोठ्या मनाचे होते म्हणून त्यांनी तुम्हाला 2019 ला पायाशी घेतलं, उपमुख्यमंत्री केलं. मग निवडणूक आयोग 2019 वर का जात आहे? 30 तारखेला सही केली असेल तर ती पार्टी विरोधी कारवाई झाली असती. निवडणूक आयोग कठपुतली आहे. निवडणूक आयोगाला आम्ही पर्याय दिला. पक्ष वाढवण्यात कोण होतं? आम्ही पर्याय दिल्याचं पत्र आमच्याकडे आहे. आयोग खोटं बोलतंय किंवा विसरभोळा आहे, असं आव्हाड म्हणावे.
“निवडणूक आयोगाने निकालात घोटाळे केले आहेत. आयोग खोटं बोलतंय. निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्राची थट्टा केली जाते. पवारांची राजकीय हत्या करण्यासाठी कट रचला जातोय”, असा गंभीर आरोप शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने अजित पवार यांना पक्ष आणि चिन्ह दिल्यानंतर आज लोकसभा आणि राज्यसभा सचिवालयात राष्ट्रवादी काँग्रेस पत्र देणार आहे. आज दुपारी पत्र देण्याची शक्यता आहे. लोकसभेत ओम बिर्ला यांना सुनील तटकरे यांच्या वतीने पत्र देण्यात येणार आहे. पत्रात केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाचा उल्लेख असेल.अजित पवार यांच्या गटाला अधिकृत पक्ष म्हणून मान्यता द्यावी अशी पत्रात मागणी करण्यात येणार आहे.
कालच्या निकालामुळे लोकशाहीचं अधःपतन झालं आहे. शिवाय घटनेची पायमल्ली झाली आहे. सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाचा निर्णय रद्द केला पाहिजे. शिवाय कोर्टाने पक्षांतरबंदी कायद्यात स्पष्टता आणली पाहिजे. ज्याच्याकडे बहुमत त्याच्या बाजूने निकाल देणं चुकीचं आहे. कालच्या निकालाचा विधानसभा अध्यक्षांवर परिणाम होत नाही, मात्र ते काय निकाल देतील ते आपल्याला माहित आहे, अशी प्रतिक्रिया घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी दिली आहे.
लासलगाव (नाशिक)- बांगलादेशाने द्राक्षांच्या आयात शुल्कात भरमसाठ वाढ केली. त्यामुळे द्राक्षांचे बाजारभाव कोसळले आहेत. द्राक्षांना मातीमोल दहा ते पंधरा रुपये किलो इतका बाजारभाव मिळतोय. या बाजारभावातून उत्पादन खर्च निघणं कठीण झाल्याने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचा संताप अनावर झाला आहे. दोन एकरावरील द्राक्ष बागेतील द्राक्ष वेली उपटून फेकून देत शेतकऱ्यांनी द्राक्षांचं शेत भुईसपाट केलं आहे. निफाड तालुक्यातील लासलगावजवळील निमगाव वाकडा इथली ही घटना आहे.
धुळे- धुळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात येत आहे. शहरातील महात्मा गांधी पुतळ्याजवळ हे आंदोलन करण्यात येत आहे. नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या बॅनरला चप्पल मारत हे आंदोलन करण्यात येत आहे. शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून काळ्याफिती लावून निवडणूक आयोगाच्या विरोधात घोषणाबाजी केली जात आहे.
आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणात अजून एक आरोपी ठाणे क्राईम ब्रँचच्या ताब्यात… विकी गणोत्रा याला ठाणे क्राईम ब्रँचने ताब्यात घेतल्याची पोलीस सूत्रांची माहिती
शरद पवार यांचा मुक्काम दिल्लीतच असणार.. दोन दिवस शरद पवार दिल्लीतच थांबणार… शुक्रवारी महाराष्ट्रात परतण्याची शक्यता… आज उद्या दिल्लीत थांबूनच पवार बैठका घेणार… पवारांसह सुप्रिया सुळे जितेंद्र आव्हाड आणि इतर पदाधिकारी राजधानी दिल्लीतच असणार
सासवड तहसील कार्यालयातून चोरीला गेलेले ईव्हीएम मशीनचे कंट्रोल युनिट सापडले… पुणे ग्रामीण पोलिसांनी अवघ्या २४ तासात २ चोरट्यांनी या प्रकरणी केली अटक… पोलिसांनी या दोन्ही आरोपींना कंट्रोल युनिट सह जेजुरीमधून केली अटक… नेमकी त्यांनी ही चोरी कशासाठी केली याचा तपास सुरू आहे…
सर्व ठरलेल्या प्रमाणे सूड बुद्धीचं राजकारण सुरू आहे आधी ठाकरे यांची शिवसेना शिंदे यांना दिली. आता आमचा पक्ष अजित पवार यांना दिला. मात्र सर्वांना माहीत आहे पक्ष कोणी स्थापन केला… आमचा पक्ष शरद पवार आहे सूड बुद्धीने हा निर्णय घेण्यात आला…असं वक्तव्य अनिल देशमुख यांनी केलं आहे .
राज्यसभेच्या 6 व्या जागेसाठी श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या नावाचा विचार व्हावा अशी आमची भूमिका आहे.
मोदी शहांचा महाराष्ट्रावर राग आहे. महाराष्ट्रावर सूड उगवण्यासाठीच मोदी, शहा हे राज्यातील पक्ष फोडत आहेत. भ्रष्टाचार करा, पक्ष फोडा हीच मोदींची गॅरंटी आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
जखमी वाघ घातक, अधिक धोकादायक असतो, हे फुटीर गट आणि भाजपने जाणलं पाहिजे, अशा शब्दात रोहित पवार यांनी अजित पवार गटाला इशारा दिला.
राष्ट्रवादी काँग्रेसची आज राजधानी दिल्लीत बैठक होणार आहे. प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत संध्याकाळी चार वाजता राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात होणार बैठक . खासदार सुनील तटकरे यांच्यासह राष्ट्रीय स्तरावरचे पदाधिकारी बैठकीला उपस्थित राहणार. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर राजधानी दिल्लीत ही पहिलीच बैठक आहे.
ईडीचा धाक दाखवून व्यावसाईकाकडून खंडणी उकळण्याचा प्रयत्न, आरोपी हिरेन भगतच्या अटकेनंतर पोलिसांची तपासाची चक्र फिरली.
गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दया नायक यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे तपास. हिरेन भगत व्यतिरिक्त आणखी दोन हँडलर्स पोलिसांच्या रडारवर आहेत. भगतच्या घरी एकूण तीन बंदूक सापडल्या.
आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाजाने रास्तारोको करत बुलढाणा- अजिंठा रस्ता रोखून धरला आहे. यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.
निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शरद पवार यांची वकिलांची चर्चा केली. कपिल सिब्बल , अभिषेक मनू सिंघवी यांच्यासोबत फोनवरून चर्चा झाली. आज शरद पवार गट सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावणार आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली जाणार आहे.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ९ फेब्रुवारीला वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्त वांद्र्यातील कलानगर परिसरात जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे. मातोश्री समोरच वाढदिवसाचा बॅनर लावला आहे. बॅनरच्या माध्यमातून ठाकरे गटाला पुन्हा डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. बॅनरवर एकनाथ शिंदे यांचा श्रीमान लोकनाथ असा उल्लेख बॅनरवर करण्यात आला आहे. श्रीमान ही पदवी बाळासाहेबांना कार्यकर्त्यांनी बहाल केली होती. तीच आत्ता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिल्याने हा बॅनर अनेकांचं लक्ष वेधतोय. वेस्टर्न एक्सप्रेस हायवे ते सायन कलानगरपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे फलक लावण्यात आले आहेत. विभाग क्रमांक सातचे विभाग प्रमुख कुणाल सरमळकर यांनी हे बॅनर लावले आहेत.
अमरावतीच्या सुपर स्पेशालिटी वैद्यकीय अधिक्षकांच्या दिव्यांग प्रमाणपत्राची चौकशी होणार आहे. वैद्यकीय अधीक्षक डॉ.अमोल नरोटे यांच्याकडे असलेले 50 टक्के दिव्यांग प्रमाणपत्र बोगस असल्याचा आरोप आहे. तर बोगस प्रमाणपत्राचे आधारे डॉ.नरोटे यांना पदोन्नती मिळाल्याचा आरोप करण्यात आला आहे. डॉ.नरोटे 50 टक्के पायाने अपंग असून एका कार्यक्रमात तुफान नृत्य करतांना त्यांचे व्हीडिओ व्हायरल झाले होते. डॉ. नरोटे पायाने अपंग असूनही त्यांनी जोरात नृत्य केल्याने ते अपंग कसे हा सवाल उपस्थित होत आहे. डॉ.अमोल नरोटे यांच्या दिव्यांग प्रमाणपत्राची चौकशी करण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आरोग्य विभागाला पत्र लिहिण्यात आलं आहे.
आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणात अपडेट समोर आली आहे. कल्याण पूर्वेतील भाजप पदाधिकारी आणि कार्यकार्त्यांची गुप्त बैठक होत आहे. बैठकीत आमदार गणपत गायकवाड यांच्या पाठी ठाम पणे उभे राहण्याचा कार्यकर्त्यांचा निर्णय आहे. तसेच पक्षाचे राबवण्यात येणाऱ्या कार्यक्रमांच्या बॅनर र शिंदे गटाच्या नेत्यांचा फोटो न लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांची भेट पदाधिकारी आणि कार्यकर्ते घेऊन आपले म्हणणं मांडणार आहेत.
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने शोधल्या तब्बल 18 हजार ऑडिओ क्लिप. शरद मोहोळच्या मोबाईल मधून सापडल्या या सर्व क्लिप. या प्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तब्बल 18 हजार 827 ऑडिओ क्लिपपैकी 10 हजार 500 ऑडिओ क्लिप तपासल्या. त्यामध्ये सहा ऑडिओ क्लिप संशयास्पद आढळून आल्या आहेत. शरद मोहोळ याच्या खून प्रकरणी गुन्हे शाखेने अभिजित अरुण मानकर याला अटक.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग या लोकसभा मतदार संघासाठी भाजपकडून मोर्चेबांधणी. रत्नागिरी जिल्ह्यात 15 फेब्रुवारी रोजी होणार बूथ कार्यकर्ता संमेलन. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि इतर प्रमुख पदाधिकारी नेते राहणार हजर.
अजितदादांनी कोल्हेंना दिलेलं ‘चॅलेंज पूर्ण करण्यासाठी सुनेत्रा पवारही मैदानात. पार्थ पवारांसह सुनेत्रा पवार शिरुर लोकसभा मतदारसंघात उतल्यानं खासदार कोल्हेंची डोकेदुखी वाढणार. सुनेत्रा पवारांनी शिरूर लोकसभा मतदारसंघातील वाघोलीत घेतल्यात भेटीगाठी. जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य अर्चना कटके व माजी उपसरपंच शांताराम कटके यांच्या निवासस्थानी दिली सदिच्छा भेट. हळदी कुंकवाच्या कार्यक्रमांना सुनेत्रा पवार हजर राहत आहेत.
निवडणूक आयोगाच्या निकालानंतर आज शरद पवार गटाची पुण्यात बैठक. बैठकीला शहरातील शरद पवार गटातील सर्व पदाधिकारी उपस्थित रहाणार. निकालानंतर पुढील दिशा काय असणार यावर बैठकीत होणार चर्चा. शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या अध्यक्षतेखाली होणार बैठक.