महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी
मंत्री छगन भुजबळ यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे :
नाशिकमध्ये थोड्याच भागात पाऊस झाला, त्यामुळे नाशिककरवरच पाणी संकट दूर झाले नाही
कोकणात रॉकेल अन्नधान्यची मदत सुरू केली आहे
विभागाला तात्काळ मदत करण्याचे ऑर्डर दिलेल्या आहे ,जशी मदत लागेल तशी दिली जाईल
शिवभोजन थाळीद्वारे मदत करणार
कोकणातील सर्व रस्ते पाण्याने वेढले आहे, NDRF ची टीम पोहोचायला देखील वेळ लागला
पुणे :
दिवसभरात २५० पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात २२२ रुग्णांना डिस्चार्ज.
– पुण्यात करोनाबाधीत ०९ रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ०४.
-२२४ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– पुण्यात एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या ४८५२८५.
– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ३०३०.
– एकूण मृत्यू -८७२०.
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- ४७३५३५.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ८४०३.
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गात मुसळधार पावसाचा पहिला बळी. कणकवली-दिगवळे येथे घरावर दरड कोसळून महिलेचा मृत्यू. संगीता जाधव (वय ४२) असं महिलेचे नाव. महिलेचा पती आणि सासरा जखमी. पती प्रकाश जाधव यांची प्रकृती चिंताजनक. कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल. घराशेजारी पाच ते सहा फूट उंचीची दलदल. डोंगराचा भाग खचून दगड, माती व मोठ मोठे वृक्ष आले खाली.
कोल्हापूर :
कोल्हापूर जिल्ह्यात सर्वसामान्य नागरिकांना पेट्रोलचा पुरवठा बंद होणार
वाढती पूर परिस्थिती पाहता जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आदेश
अत्यावश्यक सेवेतील वाहने आपत्ती व्यवस्थापनाचे वाहनांना मिळणार इंधन
पूरपरिस्थिती गंभीर होत असताना लोक विनाकारण बाहेर पडत असल्याने जिल्हा प्रशासनाचा निर्णय
पुढील आदेश येईपर्यंत सरसकट इंधन विक्री न करण्याचे आदेश
राज्यातील मराठा समाजाच्या प्रश्न, मागण्यांबाबत झालेल्या आश्वासन नंतर कार्यवाहीची सद्य परिस्थीती जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व विभागाच्या सचिवांची बैठक बोलावली होती. या बैठकीला विविध विभागाचे सचिव आणि सोबत आमदार विनायक मेटे हे देखील उपस्थित राहनार होते. पण ही बैठक स्थगित करण्यात आली आहे
आंबोली घाटात दरड कोसळली वाहतूक बंद
मुसळधार पावसाचा फटका
दरड बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरू होईल.
दरड बाजूा करण्यास दुपारी 2 वाजण्याची शक्यता
पाणी आल्याने पुन्हा एकदा मुंबई गोवा महामार्ग ठप्प. कणकवली – वागदे येथे सकाळी पाचच्या सुमारास रस्त्यावर पाणी आल्याने महामार्ग बंद झाला.
वाहनांच्या मोठ्या रांगा…
चार तासानंतर आता पाणी ओसरू लागल्याने एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे…
कोल्हापूर जिल्ह्याची पूरस्थिती गंभीर रूप घेतीय. पुणे-बेंगलोर महामार्गालगत असणार्या नद्यांची पाणी पातळी वाढल्याने महामार्गावरची वाहतूक बंद करण्यात आलेली आहे. वाहनांच्या पाच किलोमीटरपर्यंत लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत.