महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी
कांदिवली येथे लागलेल्या आगीत दोन महिलांचा मृत्यू
एका महिलेचे वय 89 वर्षे तर दुसऱ्या महिलेचे वय 45 वर्षे
मुंबई : कांदिवली पश्चिम येथे लागलेल्या भीषण आगीत एकाचा मृत्यू
मुंबईतील कांदिवली पश्चिम मथुरादास रोडवर असलेल्या हंसा हेरिटेज या निवासी इमारतीच्या 14व्या मजल्यावर अचानक आग लागली.
आगीत सुमारे 7 जण अडकले होते, सध्या एकाचा मृत्यू झाल्याची बातमी येत आहे
आठच्या सुमारास आग लागली होती आग. घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या 8 गाड्यांच्या मदतीने 2 तासांच्या अथक परिश्रमानंतर आग विझवण्यात आली.
घटनास्थळी पोहोचलेल्या मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले की, आग लागली तेव्हा काही लोक आत अडकले होते, त्यापैकी काही जखमी झाले आणि एक मृत्यू झाला.
मुंबई : अनिल देशमुख आर्थर रोड कारागृहात दाखल
मनी लाँड्रिंग प्रकरणी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना 19 नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आलीय
कोर्टाने 9 दिवसांची ईडी कोठडीची मागणी फेटाळलीय
कांदिवली पश्चिम भागात हंसा हेरिटेज या निवासी इमारतीला अचानक आग लागली.
अग्निशमन दल आणि पोलिसांच्या पथकाने इमारतीत अडकलेल्या लोकांना बाहेर काढले.
मागील एका तापासून अग्निशमन दल आग विझविण्याचा प्रयत्न करत आहे
मुंबई : कांदिवली पश्चिम येथील मथुरादास रोडवरील परम गोल्ड शॉपच्या इमारतीला भीषण आग
घटनास्थळी कांदिवली पोलीस तसेच अग्निशमन दलाच्या 4 गाड्या दाखल
मदत व बचाव कार्य युद्धपातळीवर सुरु
मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख अजूनही सेशन कोर्टातच
त्यांची आरटीपीसीआर रिपोर्ट अजूनही आलेला नाही
आरटीपीसीआर रिपोर्ट आल्यानंतर निश्चित होणार त्यांना कुठ ठेवलं जाणार
रिपोर्ट येण्यास उशिर होणार असल्याची सूत्रांची माहिती
पीएमएलए कोर्टाने अनिल देशमुख यांना न्यायलयीन कोठड़ीत पाठविण्याचा दिला आहे आदेश
नागपूर कोरोना अपडेट
नागपुरात आज 3 नवीन कोरोना रुग्णांची नोंद
शून्य मृत्यू , तर एकाने केली कोरोनावर मात
एकूण टेस्टिंग – 1872
एकूण रुग्णसंख्या – 493470
एकूण बरं होणाऱ्यांची संख्या – 483322
एकूण मृत्यूसंख्या – 10121
सिंधुदुर्ग : जिल्ह्यात आज पुन्हा पावसाची हजेरी
सलग पाचव्या दिवशी गडगडाटासह जोरदार पाऊस
सलग पडणाऱ्या पावसामुळे भातशेतीचे नुकसान होण्याची शक्यता
शेतकरी हवालदील
नागपूर -नागपूरचे महापौर दया शंकर तिवारी यांनी पाठवलं मुख्यमंत्र्यांना पत्र
छट पूजा सार्वजनिक रित्या साजरी करण्याची परवानगी देण्यात यावी या साठी लिहिलं पत्र
आर्यन खान प्रकरणातील साक्षीदार विजय पागरे यांनी टीव्ही 9 मराठीशी संवाद साधला. गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून मी सुनिल पाटलांच्या संपर्कात आहे. माझे त्याच्याकडे काही पैसे आहेत. ते घेण्यासाठी मी त्याच्या मागे होतो. 27 सप्टेंबर रोजी वाशीला दोन रुम बुक होते. यावेळी एका रुमध्ये भानुशाली आणि एक जाडी मुलगी आली. तर दुसऱ्या रुममध्ये किरण गोसावी, मी आणि सुनिल असे आम्ही तिघे होतो. भानुशाली आमच्या रुममध्ये आल्यानंतर त्याने सुनिल यांना भाऊ बडा गेम हो गया. असे सांगितले. तसेच आपल्याला लवकरात लवकर अहमदाबादला निघायचं आहे, असं सांगितले. नंतर ते केपी गोसावी, सुनिल आणि एक ड्रायव्हर असे तिघे अहमदाबादला निघाले.
कल्याण : पोलिसांनी छटपूजेची परवानगी नाकारली
कल्याणमध्ये गणेश घाट आणि कोळशे वाडीमध्ये मोठ्या प्रमाणात साजरी होते छटपूजा
हजारोंच्या संख्येने उत्तर भारतीय समाज छटपूजेसाठी जमा होतो
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाकारली परवानगी
कल्याण डीसीपी सचिन गुंजाळ यांची माहिती
नगर जिल्हा रुग्णालय ICU विभागाला आग
आगीत 10 रुग्णांचा होरपळून मृत्यू, 1 गंभीर जखमी,
जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांची माहिती
ICU विभागात एकूण 17 रुग्ण उपचार घेत होते
सर्व रुग्ण हे कोरोनाबधित होते
घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ
अहमदनगरमधून मोठी बातमी येतीय. नगरच्या सरकारी रुग्णालयात मोठी आग लागलेली आहे. या आगीत 4 ते 5 रुग्ण दगावल्याची माहिती कळतीय.
जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या आयसीयू विभागाला लागली आग
अनिल देशमुखांच्या ईडी प्रकरणातही पाटीलचं नाव आहे. माझ्या माणसाची एनसीबीच्या अधिकाऱ्याशी चर्चा करून द्या असं पाटीलने सॅमला सांगितलं. माझ्या माणसाचं नाव किरण गोसावी असल्याचं सांगितलं. पाटीलने सॅमला गोसावीचा नंबरही पाठवला आणि किरण गोसावीच सर्व कारवाई करणार असल्याचं सांगितलं
सुनील पाटीलने १ तारखेला सॅम डिसोजाला व्हॉट्सअॅप केलं होतं. चॅट नंतर व्हॉट्सअॅप कॉल केला. माझ्याकडे २७ लोकांची लीड आहे. मुंबईत क्रुझ पार्टी होणार आहे. त्यात ड्रग्जचं सेवन होणार आहे. माझी एनसीबीच्या एखाद्या अधिकाऱ्याशी चर्चा करून द्या, असं पाटीलने सॅमला सांगितलं. त्यानंतर सॅमने व्ही व्ही सिंग या अधिकाऱ्याशी बोलणं करून दिलं.
सुनील पाटील बदल्यांचं रॅकेट चालवत होता. तोच पैसा घ्यायचा आणि संबंधित मंत्र्यांना द्यायचा. त्यांचं राज्यभरात रॅकेट होतं. सरकार बदलल्यानंतर ते भूमिगत झाले. सरकार आल्यानंतर पुन्हा सक्रिय झाले. मोठमोठ्या हॉटेलमध्ये त्यांच्या पार्ट्या चालतात.
एक फोटो संपूर्ण देशात चर्चेचा विषय राहिला. सर्व मीडियात हा फोटो दाखवला. किरण गोसावी हा आर्यन खानसोबत सेल्फी घेत असल्याचा फोटो आहे. गोसावी आर्यन खानला घेऊन जात असल्याचाही फोटो व्हायरल झाला.
या संपूर्ण प्रकरणाचा मास्टर माइंड आहे सुनील पाटील. सुनील पाटील हा एनसीपीचा कार्यकर्ता आहे. सुनील पाटील हे धुळ्याचे आहेत. गेल्या २० वर्षापासून त्यांचा राष्ट्रवादीशी संबंध राहिला आहे. केवळ संबंधच राहिले नाही तर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे चिरंजीव ऋषिकेश देशमुख यांचे जिगरी दोस्त आहेत. आर आर पाटील यांचे निकटवर्तीय होते. राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांशी सुनील पाटील यांचे घरगुती संबंध असल्याचा दावा भाजप पदाधिकारी मोहित कंभोज यांनी केला आहे.
दारव्हा तालुक्यातील डोल्हारी येथे विजेच्या शॉक लागून आजी -आजोबासह नातवाचा मृत्यू
मारोतराव सुरदसे पत्नी मनकर्णाबाई सुरदसे आणि नातू सुमित सुरदसे अशी मृतांची नावं
इंदूरहून मुंबईकडे येणारा ट्रक मुंबई-नाशिक महामार्गावर 50 फूट दरीत पडला.
कसारा घाटाजवळ हा अपघात झाला ट्रक बटाट्याने भरला होता
ट्रकमधील २ जण गंभीर जखमी झाले आहेत
ब्रेक फेल झाल्याने ट्रक रेलिंग तोडून खड्ड्यात पडला
केंद्र सरकारच्या वतीने सुरू असलेली पंतप्रधान गरीब कल्याण योजना लवकरच बंद होणार आहे.. येत्या 30 नोव्हेंबरपासून ही योजना बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्यामुळ या योजनेअंतर्गत गरिबांना मोफत रेशन मिळणार नाहीय, गेल्यावर्षी कोरोनाच्या काळापासून गरीब कुटुंबांना मोफत रेशन दिले जात होतं. त्यानंतर ही योजना नोव्हेंबर महिन्यापर्यंत सुरू ठेवली जाणार होते त्यानुसार आता पुढील महिन्यापासून ही योजना बंद केली जाणार आहे.
नाशिक – शहरात लक्ष्मी पूजनाच्या दिवशी 600 कार तर 3000 हजार दुचाकींचा झाली विक्री
वाहन विक्रेत्यांची दिवाळी झाली गोड
कोरोनामुळे आर्थिक चणचण भासत असल्याने नागरिकांनी वाहन खरेदी करण्याकडे फिरवली होती पाठ
मात्र यावर्षी वाहन विक्रेत्यांना चांगला दिलासा
नाशिक – निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी भाजपचा 234 कोटींचा रस्ते धमाका
शहरातील प्रभागांमध्य 120 कोटींचे रस्ते खडीकरण,डांबरीकरण तर 114 कोटींचे रस्ते काँक्रीटीकरणच्या निविदा महापालिकेने जारी केल्या आहेत.
रस्त्यांची दुरवस्था असतानाही मात्र अगोदर न काम करता आता आगामी महापालिका निवडणुका लक्षात घेऊन हा काम करण्याचा डाव असल्याच विरोधकांचा आरोप
नवाब मलिकांनी एजन्सीजच्या कामकाजात पडू नये
वानखेडेंकडून तपास काढला का नाही यात त्यांनी का पडावं
राज्यातल वातावरण गढूळ झालं आहे त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व पक्षांची बैठक घ्यावी
– या सगळ्याची सुरुवात नवाब मलिकांनी केली. फार काळ आम्ही शांत बसलो तर आम्हालाही हे मान्य आहे असा त्याचा अर्थ निघतो, म्हणून आम्ही बोललो
– ॲान पवार पेट्रोल डिझेल- नाचता येईना अंगण वाकडे.. राज्याने काय खर्च केला ? १४ राज्यांनी कमी केलंय.. आता तुम्ही कमी करा .. प्रत्येक वेळी केंद्र केंद्र का म्हणता
– नवाब मलिकांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे बहुतेक. सत्तेत आहात तर ट्विटच्या माध्यमातून मागणी कशाला ?
– एसटीला तूट आत्ता आली का ? आमच्या ५ वर्षात कधी संप झाला नाही. तूट आली तर त्या सरकारने मदत करायची असते
चिपी विमानतळावर मुख्यमंत्र्यांनी भाषण करताना कान टोचण्याची वेळ नारायण राणे यांनीच आणलीय. चिपी विमानतळाची जमीन तुम्ही हडप करायला निघाला होतात, त्याचा भांडाफोड शिवसेनेने केला आहे !
सोलापूर- दोन दिवसात चार एसटी बसेसवर दगडफेक
सोलापूर-पुणे महामार्गावर वेगळ्या ठिकाणी जाणाऱ्या चार एसटी बसेस व अज्ञात इसमाने केली दगडफेक
सोलापूर- भोर, पिंपरी-चिंचवड -सोलापूर, गाणगापूर- कोल्हापूर, अक्कलकोट- करमाळा या एसटी बसवर दगडफेक
वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये एसटी प्रशासनाकडून गुन्हा दाखल
दादरा नगर हवेली पराभवामुळे पेट्रोल डिझेलचे दर केले कमी
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा भाजपवर आरोप
राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष अंबादास खैरे यांनी केला आरोप
भविष्यातील पराभव दिसू लागल्याने पेट्रोल डिझेल चे दर कमी केल्याचा आरोप
भाजप-राष्ट्रवादी मध्ये पेट्रोल डिझेल दर कमी झाल्यानंतर पुन्हा वाकयुद्ध
भाजपाचा खरा चेहरा जनते समोर आणणार- राष्ट्रवादीचा इशारा
नागपूर महापालिकेत आगामी निवडणुकी नंतर महिलाराजची शक्यता
महिला नगरसेवकांच्या जागा वाढणार
156 पैकी 78 राखीव महिला नगर सेविका असतील तर खुल्या प्रवर्गातून येणाऱ्या इतर याप्रमाणे 85 पर्यंत जाणार संख्या
नागपूर महापालिका निवडणुकीचे वारे वाहायला लागले
इच्छुकांमध्ये सगळ्याच पक्षात महिलांची संख्या मोठी
राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी एका कार्यक्रमात कव्वाली गात केले सर्वांना मंत्रमुग्ध
राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हात एका कार्यक्रमाला उपस्थित दिली या कार्यक्रमादरम्यान गुलाबराव पाटील यांनी ‘चढता सूरज धीरे धीरे’ ही कव्वाली गात सर्वांना मंत्रमुग्ध केले.
एकीकडे कायम नेते मंडळी हे आपल्या राजकीय जीवनात व्यस्त असतात मात्र अशातही वेळ काढत मंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्यातील कलाकार जागृत करून सर्वांचे लक्ष वेधले
राजधानी नवी दिल्लीत आजही प्रदूषणाची समस्या कायम असणार आहे. आज पहाटे नवी दिल्लीतल्या अनेक भागांमध्ये AQI म्हणजेच एअर क्वलिटी इंडेक्स 420 पेक्षा जास्त पाहायला मिळालाय. आग्र्यात ताज महाल परिसरात सर्वात जास्त म्हणजेच 525 AQI तर दिल्ली एनसीआर मध्ये 450 पेक्षाही जास्त AQI ची नोंद झाली आहे.. दिवाळीत पारंपरिक फटाक्यांची मोठ्या प्रमाणात आतषबाजी झाल्यामुळे नवी दिल्ली मध्ये प्रदुषण वाढलं असून अजून दोन दिवस असंच वातावरण राहण्याची शक्यता आहे
गोव्यातील मायनिंगवर असलेल्या बंदी विरोधात चळवळ सुरू करणारे गोवा मायनिंग पीपल्स फ्रंटचे पुती गावकर हे लवकरच आम आदमी पक्षात प्रवेश करणार आहेत यापूर्वी त्यांनी अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली असून विद्यमान मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या साकेलीम विधानसभा मतदारसंघातून सावंत यांच्या विरोधात गावकर हे विधानसभा निवडणूक लढण्याची शक्यता आहे त्यामुळे गोवा विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार मिळाला आहे
देशातील काँग्रेसशासित राज्यांनी पेट्रोल डिझेलचे दर कमी करावेत यासाठी आता सोनिया गांधी यांनी हस्तक्षेप करण्याची मागणी भाजपने केली आहे. भाजपचे प्रवक्ते गौरव भाटिया यांनी ही मागणी केली. महाराष्ट्र आणि राजस्थान या दोन्ही राज्यात सर्वात जास्त कर लागू आहेत. त्याचबरोबर नवी दिल्ली आणि पश्चिम बंगाल सरकारनेही कर कमी करावा, अशी मागणी भाजपकडून करण्यात आली आहे.