Maharashtra News Live Update : अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभाग आग प्रकरणी चार जणांना अटक

| Updated on: Nov 10, 2021 | 12:02 AM

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

Maharashtra News Live Update : अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभाग आग प्रकरणी चार जणांना अटक
ब्रेकिंग न्यूज लाईव्ह अपडेटस
Follow us on

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 09 Nov 2021 08:25 PM (IST)

    पहिला डोस घेतला तरच मिळणार पेट्रोल, गॅस आणि रेशन, औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

    औरंगाबाद : लसीकरण वाढविण्यासाठी औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

    पहिला डोस घेतला तरच मिळणार पेट्रोल, गॅस आणि रेशन

    पहिला डोसचे प्रमाणपत्र तपासूनच पेट्रोल गॅस आणि रेशन देण्याच्या सूचना

    औरंगाबादेत लसीकरणाला प्रतिसाद मिळत नसल्यामुळे निर्णय

    जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी घेतला मोठा निर्णय

  • 09 Nov 2021 06:57 PM (IST)

    साहित्य संमेलनाच्या संमेलन गीतामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचा उल्लेख नसल्याने मनसे आक्रमक

    नाशिक -94 व्या साहित्य संमेलनाच्या संमेलन गीतामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचा उल्लेख नसल्याने मनसे आक्रमक

    मनसे कार्यलयात सावरकरांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून पदाधिकाऱ्यानी केली घोषणाबाजी

    प्रायश्चित्त म्हणून संमेलन नगरीला स्वातंत्र्यवीर सावरकरांच नाव देण्याची मनसेची मागणी

    स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांना भेटून मागणी करणार असल्याची माहिती

    स्वातंत्र्यवीर सावरकर नाशिकचे भूमीपुत्र असूनदेखील त्यांच्या नावाचा उल्लेख न केल्याने मनसे पदाधिकारी आक्रमक


  • 09 Nov 2021 06:51 PM (IST)

    अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभाग आग प्रकरणी चार जणांना अटक

    अहमदनगर : जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभाग आग प्रकरणी चार जणांना अटक

    सदोष मनुष्यवधाचा गुन्ह्यात आज सायंकाळी चार जणांना अटक

    एक वैद्यकीय अधिकारी आणि तीन परिचारिका यांचा समावेश

    वैद्यकीय अधिकारी विशाखा शिंदे, परिचारिका सपना पठारे, आस्मा शेख आणि चन्ना आनंत यांना अटक

    पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांची कारवाई

  • 09 Nov 2021 06:39 PM (IST)

    सलग दुसऱ्या दिवशी NCB टीमकडून प्रभाकर साईलची CRPF कॅम्प ऑफिसमध्ये चौकशी

    मुंबई : सलग दुसऱ्या दिवशी NCB टीमकडून प्रभाकर साईलची CRPF कॅम्प ऑफिसमध्ये चौकशी

    – जवळपास 7 तासापासून एनसीबीची व्हिजिलेंस टीम करतीये चौकशी

    – एनसीबी टीम प्रभाकर साईलचा जबाब नोंदवत आहे

  • 09 Nov 2021 05:45 PM (IST)

    समीर वानखेडेंच्या आत्यांची नबाब मलिकांविरोधात तक्रार, बदनामीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

    औरंगाबाद : समीर वानखेडेंच्या आत्यांची नबाब मलिकांविरोधात तक्रार

    औरंगाबादच्या मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात केली तक्रार दाखल

    गुंफबाई गंगाधर भालेराव यांनी केली तक्रार दाखल

    नबाब मलिक यांच्यावर बदनामीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

    नबाब मलिक समीर वानखेडेची बदनामी करत असल्याचा केला आरोप

  • 09 Nov 2021 05:16 PM (IST)

    राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी दिली येरवडा कारागृहाला भेट 

    पुणे – राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी दिली येरवडा कारागृहाला भेट

    – येरवडा कारागृहातील महिला कैद्यांना ठेवण्यात येणाऱ्या जागेची तपासणी

    – तसेच सुधारात्मक उपाययोजनांसाठी चाकणकर यांनी दिली भेट

    – यावेळी कारागृह अधिकाऱ्यांना चाकणकर यांनी दिल्यात काही सूचना

  • 09 Nov 2021 05:14 PM (IST)

    चंद्रपूर जिल्ह्यातील एसटी कामगारांवर प्रशासनाची कारवाई, 14 जणांचे निलंबन 

    चंद्रपूर: जिल्ह्यातील संपकरी एसटी कामगारांवर प्रशासनाची कारवाई

    14 संपकरी एसटी कर्मचाऱ्यांचे प्रशासनाने केले निलंबन

    चंद्रपूर जिल्ह्यातील राजूरा आगार-चंद्रपूर आगार आणि विभागीय कार्यशाळा या 3 घटकातील 14 कर्मचाऱ्यांचा समावेश

    दिवाळीआधी राज्यात झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपानंतर चंद्रपुरातूनच झाली होती अनिश्चितकालीन संपाची सुरुवात

    चंद्रपूर जिल्ह्यातील एसटी कर्मचाऱ्यांवरील कारवाईच्या घटनेने कर्मचाऱ्यांमध्ये संताप

    आयुष्यभर शिस्तीत सेवा केल्याचे फळ सरकारने दिल्याचे मत

    एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाची धार कमी करण्यासाठी सरकारने केलेला प्रयत्न असल्याची प्रतिक्रिया

    36 एसटी कर्मचारी हुतात्मे झाले त्यापुढे निलंबन क्षुल्लक असल्याची भावना

  • 09 Nov 2021 04:25 PM (IST)

    सुहास कांदे-भुजबळ वादाची मुख्यमंत्र्यांकडून दखल, मागवले प्रशासकीय कागदपत्र

    नाशिक – सुहास कांदे- भुजबळ वादाची मुख्यमंत्र्यांकडून दखल

    मुख्यमंत्र्यांनी मागवले प्रशासकीय कागदपत्र

    जिल्हा नियोजन अधिकारी यांची वर्षावर हजेरी

    न्यायालयीन प्रकरण सुरू असलेले विषय सोडून बैठक घ्या

    अन्यथा पुन्हा आत्मदहन करण्याचा आमदार कांदे यांचा इशारा

    निकाळजे प्रकरणात पोलीस तपास सुरू

    माझा पोलीस आयुक्तांवर पूर्ण विश्वास – सुहास कांदे

  • 09 Nov 2021 03:25 PM (IST)

    भाजप नेते आशिष शेलारांचे नवाब मलिकांवर गंभीर आरोप

    भाजप नेते आशिष शेलारांचे नवाब मलिकांवर गंभीर आरोप
    सरदार शाहवली खानशी मलिकांचे आर्थिक व्यवहार
    सरदार खान 1993 च्या बॉम्बस्फोटातील आरोपी
    मलिकांनी सरकारकडे जाणारी मालमत्ता स्वतःकडे वळवली

    मलिकांनी कवडीमोड दरात जागा विकत घेतली
    जे बोलत होते ते फटाके भिजले
    त्यांचे चेहरेच घामाने भिजले होते
    फडणवीसांनी मलिकांवर 4 आरोप केले
    त्या 4 पैकी 3 आरोप मलिकांनी कबूल केले

  • 09 Nov 2021 02:25 PM (IST)

    परदेशातील व्यवहारांचा पर्दाफाश करणार  – नवाब मलिक

    परदेशातील व्यवहारांचा पर्दाफाश करणार

    मी उद्या अंडरवर्ल्डसंबंधी हाड्रोजन बॉम्ब फोडणार

    मी हसिना पारकरला ओळखत नाही

    अंडरवर्ल्डशी माझा कोणताही संबंध नाही

    माझी मुलगी उद्या फडणवीसांना नोटीस पाठवणार

     

     

  • 09 Nov 2021 02:18 PM (IST)

    Ashish Shelar PC Live : भाजप नेते आशिष शेलार यांची पत्रकार परिषद

    फडणवीसांनी कोणत्याही तपास यंत्रणांकडे जावं

    त्यांना माहिती देणारे कच्चे खेळाडू

    मी उद्या सकाळी 10 वाजता हायड्रोजन बॉम्ब फोडणार

    फडणवीसांचे अंडरवर्ल्डशी असलेले संबंध उद्या उघड करणार

  • 09 Nov 2021 02:13 PM (IST)

    फडणवीसांचे अंडरवर्ल्डशी संबध – नवाब मलिकांचा हल्लाबोल

    फडणवीसांचे अंडरवर्ल्डशी संबध

    उद्या मी 10 वाजता याबाबत खुलासा करणार

    देवेंद्र फडणवीसांवर घणाघाती आरोप

     

     

  • 09 Nov 2021 01:46 PM (IST)

    पुण्यात उच्चभ्रु सोसायटीतील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

    पुण्यात उच्चभ्रु सोसायटीतील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

    बिबवेवाडी पोलिसांकडून 2 एजंट अटकेत

    बिबवेवाडी येथील उच्चभ्रु सोसायटीत सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा

    बिबवेवाडी पोलिसांनी पर्दाफाश केला

    येथील दोन पिडित महिलांची सुटका करण्यात आली असून वेश्या व्यवसाय चालविणार्‍या दोघांना अटक

  • 09 Nov 2021 01:42 PM (IST)

    लासलगावमध्ये कांद्याच्या बाजार भावात चारशे रुपयांची वाढ

    – कांद्याच्या बाजार भाव चारशे रुपयांची लासलगाव बाजार समितीत वाढ

    – गेल्या दहा दिवसाच्या सुट्ट्यानंतर लासलगाव बाजार समिती कांद्याच्या लिलावाला पुन्हा सुरुवात

    – नाफेडचा बंपर साठा व इराणचा आयात केलेला 70 कंटेनर कांद्यानंतरही बाजार भावात वाढ

    – शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त करत विदेशातील कांदा आयात न करण्याची केली मागणी

    – कांद्याला कमाल 3251 , सर्वसाधारण 2751 ,किमान 1000 रुपये मिळाले प्रतिक्विंटल बाजार भाव

  • 09 Nov 2021 01:09 PM (IST)

    तुम्ही गृहमंत्री होतात, मग त्यावेळी मलिकांवर का कारवाई का केली नाही, फडणवीस म्हणाले…..

    2014 ला तुम्ही गृहमंत्री होता, मग मलिकांनी अंडरवर्ल्डकडून जमीन घेतली हे माहित असूनही तुम्ही कारवाई केली नाही? विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले…..

    2005 नंतर किती गृहमंत्री झाले, मग त्यांनी का कारवाई केली नाही?, असं विचारणार का?
    माझ्याकडे ज्यावेळी माहिती आली त्याचवेळी मी माहिती समोर आणली

  • 09 Nov 2021 01:01 PM (IST)

    1993 ला मुंबईच्या चिंधड्या उडवणाऱ्या आरोपींकडून मलिकांनी जमिनी कशा घेतल्या? : देवेंद्र फडणवीस

    1993 ला मुंबईच्या चिंधड्या उडवणाऱ्या आरोपींकडून मलिकांनी जमिनी कशा घेतल्या
    टाडाच्या आरोपीकडून तत्कालिन मंत्र्याने जमीन घेतलीच कशी
    फक्त एकच नाही तर 4 प्रॉपर्टींमध्ये मलिकांचे थेटअंडरवर्ल्डशई व्यवहार

  • 09 Nov 2021 12:58 PM (IST)

    अंडरवर्ल्डच्या लोकांकडून जमिनी घेतल्या, पवारांना आणि तपास यंत्रणांना पुरावे देणार : फडणवीस

    ‘नवाब का नकाब’, फडणवीसांकडून मलिकांची चिरफाड

    -2003 मध्ये व्यवहार 2005 ला संपला तेव्हा आपण मंत्री, तेव्हा आपल्याला माहित नव्हतं सलीम पटेल कोण आहे? मुंबईच्या गुन्हेगारांकडून जमीन का खरेदी केली? आणि असं काय होतं की एवढी महागडी जमीन तुम्हाला 20 लाखात मिळाली? त्याला कारण या गुन्हेगारांवर टाडा लागला होता. टाडा कायद्यानुसार गुन्हेगारांची सगळी प्रॉपर्टी जप्त होते, त्यामुळेच यांची प्रॉपर्टी जप्त होऊ नये म्हणून तर हा व्यवहार झाला नाही. या व्यवहारात खूप गुंतागुत होईल. यात सरळ अंडरवर्ल्डसोबत संबंध दिसून येतो.

    -1993 आम्ही सामान्यांची चिधडे उडताना पाहिले, आणि हे ज्यांनी केलं त्यांच्यासोबत तुम्ही व्यवहार करता. ही एकच नाही अशा 5 प्रॉपर्टी मला सापडल्या आहेत, ज्यातील 4 प्रॉपर्टीत 100 टक्के अंडरवर्ल्डचा अँगल

    -हे सगळे पुरावे मी तपास संस्थांना देणार, शिवाय राष्ट्रवादीचे अध्य़क्ष शरद पवारांनाही हे पुरावे देणार आहेत, त्यामुळे त्यांनाही कळेल की आपल्या मंत्र्यांनी काय दिवे लावले आहेत

  • 09 Nov 2021 12:37 PM (IST)

    देवेंद्र फडणवीस यांचे नवाब मलिक यांच्यावर बॉम्बगोळे

    मुंबईत बॉम्बस्फोट करणाऱ्यांकडून जमीन का खरेदी केली? फडणवीसांचा मलिकांना सवाल

    सरदार शहाबअली खान 1993 बॉम्बस्फोटमधील आरोपी
    बॉम्ब कुठे ठेवायची याची रेकी झाली होती
    हा राष्ट्रीय सुरक्षेशी जोडलेला प्रश्न
    दाऊदची बहीण हसीना पारकर यांचा ड्रायव्हर आणि बॉडीगार्ड सलीन अली खान

    सरदार शहाब अली खान– 1993 बॉम्बहल्ल्याचा गुन्हेगार, जन्मठेप भोगतो आहे. टायगर मेमनच्या नेतृत्त्वात फायर ट्रेनिंग, स्टॉक एक्स्चेंज, मनपात बॉम्बहल्ल्याची रेकी, टायगर मेमनच्या घरी मिटींगमध्ये सहभागी, अलहुसैनी या टायगरच्या घरी गाडीत आरडीएक्स भरणारा अली खान

    सलीम पटेल– फोटोत दाऊदचा माणूस सांगितला जातो, हसीना पारकरचा ड्रायव्हर, बॉडीगार्ड, फ्रंटमॅन, 2007 मध्ये हसीना पारकरसोबत सलीमला अटक, हसीना पारकरच्या नावाने संपत्ती जमा होत होत्या, तो करणारा सलीम पटेल होता. लँड ग्राबिंगच्या बिझनेसमध्ये प्रमुख सलीम पटेल

    कुर्ल्यात 2.80 एकर म्हणजे जवळपास 1 लाख 23 हजार स्वेअर फीटची जागा, गोवावाला कम्पाऊंड, एलबीएस रोडच्या प्राईम लोकेशनवर ही जमीन, या जमिनीची रजिस्ट्री सॉलिडस कंपनीसोबत झाली, हा व्यवहारात पॉवर ऑफ ऑटर्नी होल़्डर सलीम पटेल, शिवाय, शहा अली खानही यातील विक्रेता, सॉलिडस प्रा. लि. कंपनी ही नवाब मलिक यांच्या कुटुंबाची, जमीन घेणारा आहे फराज मलिक, सॉलिडसमध्ये 2019 मध्ये नबाव मलिकही होते, मात्र मंत्री बनल्यानंतर कंपनीतून राजीनामा दिला.

    याच ठिकाणच्या फोनिक्स मार्केटच्या जमिनीची खरेदी झाली 2053 रुपये स्वे. फीटने झाली. आणि अंडरवल्डच्या लोकांकडून घेतलेली जमीन 3 एकर खरेदी झाली 30 लाखात, त्यातील 20 लाखांचंच पेमेंट झालं. यातील सलीम पटेलला 15 लाख मिळाले आणि 10 लाख शाह वली खान म्हणजेच सरदार खानला मिळाले.

    20 लाखात एलबीएस रोडवर 3 एकर जमीन खरेदी झाली, पॉवर ऑफ अर्टनीमध्ये टेनंट वेगळा, रजिस्ट्रीवेळी वेगळा, किंमत कमी दाखवण्यासाठी हे केलं गेलं, याची किंमत 3.50 कोटी दाखवली. रजिस्ट्री कमी दाखवण्यासाठी हे केलं गेलं. रेडी रेकनर 8500 रु. स्वे.मी, मार्केट रेट 2 स्वेअर फीट, खरेदी झाली 25 रुपये स्वे.फूटने आणि स्टँप ड्युटी भरली 15 रुपये स्वेअर फूटने

    देवेंद्र फडणवीस यांचे नवाब मलिक यांच्यावर बॉम्बगोळे

    शाहवली खान, सलीन पटेलने मलिक कुटुंबाच्या कंपनीला जमीन विकली

    कुर्ल्यातल्या गोवावाला कॉम्प्लेक्समधील जमीन मलिक कुटुंबाला विकली

    अंडरवर्ल्डच्या आरोपींकडून नवाब मलिकांनी कोट्यवधींची जमीन फक्त 20 लाखांना घेतली

  • 09 Nov 2021 11:52 AM (IST)

    साईल प्रभाकरची पुन्हा चौकशी होणार

    साईल प्रभाकरची पुन्हा चौकशी होणार

    साईल अनेक गोष्टी लपवत असल्याची NCB ला शंका

    साईल प्रभाकरची काल 11 तास कसून चौकशी

  • 09 Nov 2021 11:48 AM (IST)

    नागपुरात 1 डिसेंबरपासून कोरोना लसीच्या पहिल्या डोससाठी पैसे मोजावे लागणार

    नागपूरात एक डिसेंबरपासून कोरोना लसीच्या पहिल्या डोज साठी मोजावे लागणार पैसे

    – महानगरपालीकेच्या लसीकरण केंद्रात पहिल्या डोजची
    निःशुल्क सेवा होणार बंद

    – एक डिसेंबरपासून नागपूरात लसीच्या पहिल्या डोजसाठीौ मोजावे लागणार पैसे

    – नागपूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांची माहिती

    – नागपूरात १४ टक्के लोकांनी अद्याप घेतली नाही कोरोना लस

    – झोपडपट्टी आणि काही समुदायांमध्ये लसीबाबत संभ्रम

    – २ लाख ७० हजार लोकांनी आतापर्यंत पहिला डोज घेतला नाही

    – ३० नोव्हेंबर पर्यंत पहिला डोज पूर्ण करण्याचा प्रयत्न

    – नागपूर महानगरपालिकेकडून जनजागृती सुरु

    – नागपूरात १८ वर्षावरील नागरिकांची संख्या १९ लाख ८३ हजार

    – आतापर्यंत १६ लाख ८७ हजार नागपुरकरांनी घेतली कोरोनाची लस

    – आसीनगर झोन, सतरंजीपुरा, गांधीबाग, लकडगंज परिसरात कमी लसीकरण

  • 09 Nov 2021 11:11 AM (IST)

    पुण्यात वाहतुकीला अडथळा ठरणारे शहरातील २३ रिक्षा थांबे बंद

    – वाहतुकीला अडथळा ठरणारे शहरातील २३ रिक्षा थांबे बंद

    – पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेचा निर्णय,

    – मात्र नव्याने १३ रिक्षा थांबे सुरू करण्यास परवानगी,

    – वाहतूक पोलिसांनी शहरातील ५२ रिक्षा थांब्यांची नुकतीच पाहणी केली.

  • 09 Nov 2021 10:05 AM (IST)

    पुण्यातील शिवाजीनगर बसस्थानकात महामंडळ कर्मचाऱ्यांच अर्धनग्न आंदोलन

    पुण्यातील शिवाजीनगर बसस्थानकात महामंडळ कर्मचाऱ्यांच अर्धनग्न आंदोलन,

    आंदोलनस्थळी कर्मचाऱ्यांकडून घोषणाबाजी

    महामंडळाच राज्यशासनात विलीनीकरणाची मागणी

  • 09 Nov 2021 09:52 AM (IST)

    अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभाग आग प्रकरण

    तीन परिचारिका निलंबन प्रकरणी परिचारिका संघटनेचे आंदोलन

    परिचारिका संघटना आक्रमक होत परिचरिकांच निलंबन मागे घेण्याची मागणी,

    परिचरिकांच निलंबन मागे न घेतल्यास सर्वांचं निलंबन करा

    घडलेली घटना दुर्दैवी मात्र यात परिचरिकांचा दोष नसून निलंबन मागे घ्यावं

    आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी तीन डॉक्टर आणि तीन परिचारिका यांच केलं होतं निलंबन

  • 09 Nov 2021 09:46 AM (IST)

    अँटॉप हिलच्या जय महाराष्ट्र नगर झोपडपट्टीत तीन मजली झोपडं कोसळलं

    अँटॉप हिलच्या जय महाराष्ट्र नगर झोपडपट्टीत तीन मजली झोपडं कोसळलं…

    यात काही जण ढीगाऱ्याखाली अडकल्याची माहिती…

    काहींना जवळच्या सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले…

    परिसरात सर्वत्र खळबळ… फायर ब्रिगेड आणि पोलीस घटनास्थळी दाखल…

  • 09 Nov 2021 09:12 AM (IST)

    एस टी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बंदला पिंपरी चिंचवडमध्ये सलग दुसऱ्या दिवशी 100 टक्के प्रतिसाद

    -एस टी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बंदला पिंपरी चिंचवड मध्ये सलग दुसऱ्या दिवशी 100 टक्के प्रतिसाद मिळालाय

    -शहराच्या वल्लभनगर आगारातून आज एक ही बस बाहेर जात नसल्याचे चित्र आहे

    -एखादा दुसरा प्रवासी वगळता बस स्थानकावर चिटपाखरूही नाही

  • 09 Nov 2021 09:06 AM (IST)

    संजय राऊत सपत्निक शरद पवार यांच्या भेटीसाठी ‘सिल्वर ओक’वर

    संजय राऊत सपत्निक शरद पवार यांच्या भेटीसाठी ‘सिल्वर ओक’वर

    सदिच्छा भेट असल्याची माहिती

    दिवाळीनिमित्त शुभेच्छा देण्यासाठी राऊत पवारांच्या निवासस्थानी

    इतरही राजकीय विषयांवर चर्चेची शक्यता

  • 09 Nov 2021 09:01 AM (IST)

    सलग दुसऱ्या दिवशी सोलापुरात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु

    सलग दुसऱ्या दिवशी एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु

    सोलापूर आगारातील एसटी सेवा झाले ठप्प

    350 हुन अधिक फेऱ्या रद्द

    काल संपाची माहिती मिळाल्यामुळे आज बस स्थानकाकडे फिरकले नाहीत

    बस सेवा संप झाल्यामुळे काल झाले होते सोलापूर विभागाचे पंधरा लाखाचे नुकसान,

    तर प्रवाशांचे झाले होते हाल, आज पुन्हा बस सेवा झाली ठप्प

  • 09 Nov 2021 08:22 AM (IST)

    भीमा कोरेगाव चौकशी आयोगासमोर रश्मी शुक्ला यांची साक्ष होणार

    कोरेगाव भीमा चौकशी आयोगासमोर रश्मी शुक्ला यांची साक्ष होणार

    रश्मी शुक्ला पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त

    18 आणि 19 नोव्हेंबरला साक्षीसाठी आयोगा समोर हजर राहण्याचे आदेश

    मुंबईतील सह्याद्री अतिथी गृहात शुक्ला यांची साक्ष नोंदवणार

  • 09 Nov 2021 08:08 AM (IST)

    कोल्हापूर जिल्ह्यातील शासकीय इमारतीत आता होणार सौर ऊर्जेचा वापर

    कोल्हापूर जिल्ह्यातील शासकीय इमारतीत आता होणार सौर ऊर्जेचा वापर

    जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत निर्णय

    जानेवारी अखेर पर्यंत आवश्यक प्रस्ताव देण्याच्या पालकमंत्री सतेज पाटील यांच्या सूचना सौर ऊर्जा यंत्रणा कार्यान्वित करण्याचे नियोजन

    शंभर वर्ष पूर्ण झालेल्या जिल्ह्यातील शाळांनाही विशेष निधी देण्याचा महत्त्वाचा निर्णय

  • 09 Nov 2021 08:02 AM (IST)

    कोल्हापूरच्या राजर्षी शाहू शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नवीन 8 विषयांच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांना मंजुरी

    कोल्हापूरच्या राजर्षी शाहू शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नवीन आठ विषयांच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांना मंजुरी

    राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाचा निर्णय

    या शैक्षणिक वर्षापासून दहा विषयांचे पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू होण्याचा मार्ग मोकळा

    पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी महाविद्यालयात 38 जागा उपलब्ध

    नवीन अभ्यासक्रमाला आलेल्या मंजुरीमुळे सीपीआर च्या आरोग्य सेवेचा दर्जा वाढण्यास होणार मदत

  • 09 Nov 2021 07:56 AM (IST)

    औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या तयारीला आला वेग

    औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या तयारीला आला वेग

    18 नोव्हेंबर पर्यंत प्रभाग रचनेचा आराखडा तयार करण्याचे आदेश

    42 प्रभाग आणि 126 नगरसेवकांचा प्रारूप आराखडा तयार करण्याचे आदेश

    निवडणूक आयोगाने महापालिका प्रशासनाला दिले आदेश

    फेब्रुवारी मार्च मध्ये महापालिका निवडणूक होण्याची शक्यता

  • 09 Nov 2021 07:55 AM (IST)

    पुण्याजवळील पिसोळी दगडे वस्तीमध्ये पहाटे लाकडी सामानाच्या गोडाऊनला आग

    पुण्याजवळील पिसोळी दगडे वस्तीमध्ये पहाटे लाकडी सामानाच्या गोडाऊनला लागली आग,

    आगीचं प्रमाण मोठं असल्यानं 14 अग्निशमन दलाच्या गाड्या पाचारण करण्यात आल्या होत्या,

    आगीत जिवीतहानी नाही,

    आग नियंत्रणात आणली असून कुलिंगचं काम सुरू आहे,

    जखमी कोणीही नाही

  • 09 Nov 2021 07:51 AM (IST)

    पुण्यातील बस डेपो आजपण बंद, आगारात एकही गाडी नाही

    पुण्यातील बस डेपो आजपण बंद

    आगारात एकही गाडी नाही

    प्रवाशांची मोठी तारांबळएसटी कर्मचारी आजही कामावर परतले नाहीत

    पुण्यातील 13 बस डेपोंचे आगार बंद राहणार

  • 09 Nov 2021 07:50 AM (IST)

    30 नोव्हेंबरपर्यंत पुणे जिल्ह्यातील खाजगी शासकीय रुग्णालयाचं फारर ऑडिट पूर्ण करा, जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना

    30 नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यातील खाजगी शासकीय रुग्णालयाचं फारर ऑडिट पूर्ण करा,

    रुग्णालयाच्या त्रुटींबाबत अहवाल सादर न करण्यास केल्यास कारवाई होणार,

    जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या सूचना,

    अहमदनगरमधील रुग्णालयात घडलेल्या घटनेनंतर जिल्ह्याधिकाऱ्यांनी घेतली बैठक,

    30 नोव्हेंबरपर्यंत सगळा अहवाल सादर करा

  • 09 Nov 2021 07:27 AM (IST)

    जागतिक हवामान बदलाचा मराठवाड्यावर होऊ शकतो परिणाम, विभागातील 8 जिल्ह्यांना भीषण दुष्काळाचा इशारा

    जागतिक हवामान बदलाचा मराठवाड्यावर होऊ शकतो परिणाम..

    मराठवाड्यावर दुष्काळाचे संकट तर औरंगाबाद जिल्हाला पुराचा धोका..

    मराठवाडा विभागातील आठ जिल्ह्यांना भीषण दुष्काळाचा इशारा..

    भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाने हवामानबदलाचा राज्यांवर होणारे परिणाम अभ्यासातून आणले समोर..

    औरंगाबादला दुहेरी धोका तर हिंगोली, उस्मानाबाद,नांदेड,बीड,लातूर, परभणी,जालना जिल्ह्यांना दुष्काळाचा धोका..

    27 राज्यांतील 640 जिल्ह्यातील हवामान बदलांचे परिणाम आले अभ्यासण्यात

  • 09 Nov 2021 07:26 AM (IST)

    खड्ड्याने घेतला आईचा बळी मुलांची रस्त्यावर गांधीगिरी

    खड्ड्याने घेतला आईचा बळी मुलांची रस्त्यावर गांधीगिरी

    दारव्हा- यवतमाळ या महामार्ग वरील खड्डे बुजवावे म्हणून गांधीगिरी करीत रस्त्यावर पांढरे पट्टे आखले.

    दारव्हा येथील युवराज दुधे यांची आई त्यांच्या भाऊ सोबत 24 मे 2021 रोजी दुचाकीवरून यवतमाळला येत असताना लाडखेड गाव जवळ असलेल्या खड्ड्यातुन दुचाकी उसळून शोभा दुधे यांचा अपघात होऊन झाला होता मृत्यू…

  • 09 Nov 2021 07:25 AM (IST)

    पुणे विभागात काल एसटीचे 13 डेपो बंद असल्यानं महामंडळाला मोठा फटका

    पुणे विभागात काल एसटीचे 13 डेपो बंद असल्यानं महामंडळाला मोठा फटका,

    1.5 कौटी महसूलावर फेरावं लागलं पाणी

    700 कर्मचारी कालच्या दिवसभरात गेले होते संपावर,

    3 लाख कि.मी संचलन झालं रद्द,

  • 09 Nov 2021 07:25 AM (IST)

    नाशिक महापालिकेच्या रुग्णालयांचे फायर आणि इलेक्ट्रिकल ऑडिट पूर्ण

    नाशिक – महापालिकेच्या रुग्णालयांचे फायर आणि इलेक्ट्रिकल ऑडिट पूर्ण

    सुरक्षिततेच्या दृष्टीने महापालिकेच्या झाकीर हुसेन आणि बिटको रुग्णालयात पर्यायी टाक्या उपलब्ध

    गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात झाकीर हुसेन रुग्णालयात झाली होती गॅस गळती

    22 जणांना गमवावे लागले होते आपले प्राण

    अहमदनगर प्रकरणानंतर नाशिकच्या रुग्णालयाचा मुद्दा पुन्हा चर्चेत

    मात्र वर्षभरात प्रशासनाकडून मनपा च्या हॉस्पिटलचे ऑडिट पूर्ण

  • 09 Nov 2021 07:24 AM (IST)

    नाशिकमधले कोरोना काळात सेवा बजावणारे 983 कोरोना योद्धे वाऱ्यावर

    नाशिक – कोरोना काळात सेवा बजावणारे 983 कोरोना योद्धे वाऱ्यावर

    सानुग्रह अनुदान देण्यास महापालिकेचा नकार

    कोरोना योद्ध्यांच्या बाजूने ना सत्ताधारी ना विरोधक

    इतर वेळेस कोट्यवधींच्या विषयांना तात्काळ मंजुरी

    मात्र सानुग्रह बाबत मात्र प्रशासन-सत्ताधाऱ्यांची चुप्पी।असल्याचा आरोप

    येणाऱ्या महासभेत मुद्दा गाजण्याची शक्यता

  • 09 Nov 2021 07:24 AM (IST)

    नाशिकमध्ये एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच

    नाशिक – एसटी कर्मचारी संप सुरूच

    जिल्ह्याभरात बस च्या 2100 फेऱ्या रद्द

    खाजगी वाहतुकदारांकडून प्रवाशांची लूट

    अव्वाच्या सव्वा भाडे आकारणी

    वाढत्या महागाईत तुटपुंज्या पगारात कस काम करणार

    एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांना सरकारने गांभीर्याने घ्यावे अशी मागणी