Maharashtra News Live Update : पुन्हा दिशा सॅलियनवरून राणेंचा आरोपांचा प्रहार, तर शिवसेनेचे प्रत्युत्तराचे बाण

| Updated on: Feb 19, 2022 | 10:40 PM

Maharashtra News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या एका क्लिकवर

Maharashtra News Live Update : पुन्हा दिशा सॅलियनवरून राणेंचा आरोपांचा प्रहार, तर शिवसेनेचे प्रत्युत्तराचे बाण
Follow us on

मुंबई : महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना आणि वाचकांना छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti) यांच्या जयंतीच्या शुभेच्छा! आज शनिवार 19 फेब्रुवारी 2022. आज आपण राजकारणासह (Politics) सामाजिक आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर घेणार आहोत. कोरोना संसर्गामुळे गेल्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली नव्हती. मात्र, यंदा कोरोना संसर्गाचं प्रमाण कमी झाल्यानं स्वराज्य संस्थापक शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. राज्यात आज देखील राजकीय घडामोडी वाढण्याची शक्यता आहे. महाविकास विरुद्ध भाजप असा सामना पाहायला मिळू शकतो.   उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) आणि गोवा, पंजाब, मणिपूर, उत्तराखंड राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमुळं देशातील राजकीय वातावरणं तापलेलं आहे.  उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक (Uttar Pradesh Assembly Elections) एकूण 7 टप्प्यात होणार आहे. त्यापैकी दोन टप्पे पूर्ण झाले आहेत. पंजाबमध्ये उद्या मतदान होतं आहे. उत्तर प्रदेशमध्ये तिसऱ्या टप्प्यातील मतदान उद्या पार पडेल.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 19 Feb 2022 10:08 PM (IST)

    मावळचे आमदार सुनील शेळके यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसकडून मोठी जबाबदारी

    -खडकवासला, कर्जत आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे प्रभारी म्हणून जबाबदारी सोपविण्यात आलीय

    -आगामी महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस कडून मोठी जबाबदारी

  • 19 Feb 2022 07:12 PM (IST)

    विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस Live

    ही फक्त जयंती नाही

    या राजाने लढायला शिकवलं

    शत्रू कितीही मोठा असूद्या तुमचा विजय होतो

    या लढाईत सामान्य मानसाचा विजय होईल

    या चांगल्या सोहळ्यात बोलवल्याबद्दल मेटेंचे आभार

    महाराजांचे सोहळे अडवतात, त्यांना महाराजच शासन करतील

  • 19 Feb 2022 06:39 PM (IST)

    शरद पवार Live

    आज बारामतीत अनेक विकास कामं झालीत,

    मात्र याचा बाहेर गेलो तर त्याचा त्रास मला होतो,

    कारण वकील भेटलेत तर आम्हालाही कोर्टाची इमारत बारामतीसारखी झाली पाहिजे अशी मागणी करतात

    आज ज्या वास्तू दर्जेदार झाल्यात की मुख्यमंत्री असो की कुणालाही त्या वास्तूत जायला काहीच वाटणार नाही,

  • 19 Feb 2022 06:02 PM (IST)

    अजित पवार live

    एककाळ असा होता पंचायत समिती सभापतीला आमदारांपेक्षा जास्त महत्व होते,

    – मंडल आयोगाची अंमलबजावणी झाल्यानंतर ठराविक घटकाला संधी मिळायला लागली,

    – विलासराव देशमुख हे सरपंच पदापासून मुख्यमंत्री पदापर्यंत गेलेत

  • 19 Feb 2022 05:59 PM (IST)

    अजित पवारांचे मुश्रीफांनी केले कौतुक

    अजित दादा तुम्ही पूर्वी जन्मी आर्किटेक तर नसाल ना, मुश्रीफ यांच्याकडून अजितदादांचे कौतुक

  • 19 Feb 2022 04:27 PM (IST)

    भाजप-सेना पुन्हा आमनेसामने

    कांदिवलीत भाजप-शिवसेना आमनेसामने

    महापौरांच्या कार्यक्रमात गोंधळ

    दोन्ही बाजुने जोरदार घोषणाबाजी

  • 19 Feb 2022 03:44 PM (IST)

    शिवसेना आमदार रमेश बोरणारे यांच्यावर गुन्हा दाखल

    भावजईला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

    रमेश बोरणारे यांनी सख्या चुलत भावजईला केली होती मारहाण

    दोन दिवसांपूर्वी घडला होता प्रकार

    भावजईने समोर येऊन केली होती पोलिसात तक्रार

  • 19 Feb 2022 01:17 PM (IST)

    अटक करण्यासाठी राज्य सरकारच्या हालचाली, मी झुकणार नाही : मोहित कंबोज

    महाराष्ट्र सरकारने कोणत्या ही केस करून अटक करण्साची हालचाल सुरू केल्यात, घाबरत नाही, मी झुकणार नाही – मोहीत खंबोज भारतीय यांनी टीव्ट करत राज्य सरकारला संकेत दिले.

  • 19 Feb 2022 01:06 PM (IST)

    राज ठाकरे यांच्या हस्ते गोरेगावमधील शाखेचं उद्घाटन 

    राज ठाकरे यांच्या हस्ते गोरेगावमधील शाखेचं उद्घाटन

    कार्यक्रमाचं स्टेज कोसळलं

    365 दिवस शिवजयंती साजरी व्हावी

    तिथीनुसार शिवजयंती जल्लोषात साजरी व्हावी

  • 19 Feb 2022 12:32 PM (IST)

    प्रविण दरेकरांच्या गाडीला महिन्यात तिसरा अपघात, मुख्यमंत्र्याकडे चौकशीची मागणी करणार

    प्रविण दरेकर यांच्या गाडीला अपघात

    प्रविण दरेकरांच्या गाडीला महिन्यातील तिसरा अपघात

    मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी करणार

    मालेगाव, खंडाळा आणि आज हा तिसरा अपघात झालाय

    तीन अपघातांमुळं संंशय मनात येतो

    अपघात का झाला, कसा झाला याची चौकशी करण्याची मागणी करण्याचं पत्र लिहिणार आहे

    तीन अपघात एकाच प्रकराचे असल्यानं मनात किंतु परंतु निर्माण जाले.

  • 19 Feb 2022 11:41 AM (IST)

    राज्याचं दरडोई उत्पन्न, बेकारी वर कोणी बोलत नाही

    मी मराठा आहे

    मला राजकारण शिकवू नये

    कुणाला पोटावर मारलं आहे

    तो खासदार विकासाचं काही बोलत नाही

    राज्याचं दरडोई उत्पन्न, बेकारी वर कोणी बोलत नाही

    1966 साली मुंबईत मराठी माणसं किती होती? आता किती आहेत

    मराठी माणसासाठीं कोणते प्रकल्प आणले

    कुणाच्या आजारपणावर बोलणार नाही

    दुसरा कुणी असता तर राजीनामा दिला असता

    शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं असेल तर लोककल्याणकारी काम करा

    मुख्यमंत्री मंत्रालयात जात नाहीत, कॅबिनेटमध्ये जात नाहीत, सभागृहात जात नाहीत

    गुणवत्ता पात्रता नसतानाही सव्वा दोन वर्ष काढली, हे बाळासाहेंबामुळं मिळालं

    आम्हाला त्यांनी घडवलं, आमच्याकडून बघून त्यांना आनंद व्हायचं

  • 19 Feb 2022 11:36 AM (IST)

    सुशांतसिंह राजपूत याची हत्या झाली, त्याच्या घराचे सीसीटीव्ही कुठं गायब झाले?

    8 जूनला दिशा  सालियानची बलात्कार करुन हत्या झाली, पण आत्महत्या झाल्याचं सांगण्यात आलं

    दिशा सालियानचा पोस्ट मॉर्टम रिपोर्ट का आला नाही

    दिशा सालियान ज्या इमारतीत राहायची तिथल्या रजिस्टरची पानं का नाहीत

    सुशातंसिंहला ज्यावेळी ते प्रकरण कळलं त्यावेळी त्याच्या घरात बाचाबाची झाली

    त्यातून सुशांतसिंह राजपूत याची हत्या झाली

    त्या इमारतीचे सीसीटीव्ही गायब कसे झाले

    13 जूनला रात्री सीसीटीव्ही कॅमेरे नव्हते

    ठराविक माणसाची रुग्णवाहिका कशी आली? रुग्णालयात कसं नेलं, पुरावे कुणी नष्ट केले त्यांची चौकशी होणार

    त्याप्रकरणातील अधिकारी सर्व उघडं करतील

    आपलं ऐकलं नाही त्यांना ठार मारायचं,

    मुंबईत आलेल्या तरुण कलाकाराची हत्या का झाली?

    रमेश मोरेची हत्या कुणी केली आणि का केली?

     

  • 19 Feb 2022 11:29 AM (IST)

    माझ्या घरात एक इंचही नवं बांधकाम केलेलं नाही: नारायण राणे

    नारायण राणे लाईव्ह

    पत्रकार मित्रांनी मी काल दिल्लीला होतो. घरासंदर्भात नोटीस आल्यानं सर्वांचे फोन होता.  मात्र, आज तुम्हाला वास्तववादी चित्र सांगावं यासाठी आलोय

    या घरात मी 2009 मध्ये आलो, आता इथ 13 वर्ष राहतोय

    जगात नाव असणाऱ्या आर्किटेक्टनं ही इमारत बांधली

    ही इमारत बांधल्यानंतर 1991 च्या रुलप्रमाणं इमारत बांधण्यात आली. त्यानंतर ताबा देण्यात आला. यासंदर्भातील गोष्टी महापालिकेनं दिलेल्या होत्या.

    कायदेशीर काम केलं आहे. त्यानंतर एक इंचही बांधकाम मी केलेलं नाही.

    या घरात आठ माणसं आम्ही राहतो

    या घरात कोणताही व्यवसाय करत नाही, ही निवासी इमारत आहे

    100 टक्के कायदेशीर इमारत असताना तक्रार करायला लावण्याचं काम केलं

    काही लोकांना तक्रार करायला लावल्या जातात

    2015 ते 2017 दरम्यानही नोटीस पाठवली जायची

    बाळासाहेबांनी मराठी माणसासाठी शिवसेना काढली

    मात्र, आता प्रमुख मराठी माणसाच्या मुळावर आलीय

  • 19 Feb 2022 11:04 AM (IST)

    नारायण राणे यांची थोड्यात वेळात पत्रकार परिषद

    नारायण राणे यांची थोड्यात वेळात पत्रकार परिषद

    शिवसेनेला उत्तर देण्याची शक्यता

    मुंबई महापालिकेनं दिलेल्या नोटीसला राणे काय उत्तर देणार याकडे लक्ष

     

  • 19 Feb 2022 09:08 AM (IST)

    जालना जिल्ह्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षा केंद्रांच्या संख्येत वाढ

    कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने जालना जिल्ह्यात परीक्षा केंद्रामध्ये वाढ केली आहे. आता दहावी आणि बारावीसाठी दोनशेच्या जवळ परीक्षाकेंद्रे वाढणार आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरला असला तरी, परीक्षा केंद्रावरील गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. जालन्यात आता दहावीसाठी 100 मुख्य केंद्रे 268 उपकेंद्रे असणार आहेत तर बारावीसाठी 75 मुख्य केंद्रे 138 उपकेंद्र राहणार आहेत.

  • 19 Feb 2022 08:08 AM (IST)

    अजित पवार आणि आदित्य ठाकरे शिवनेरी गडावर थोड्याच वेळात पोहोचणार

    उपमुख्यमंत्री अजित पवार , पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे शिवनेरी गडावर किल्ल्यावर येणार हेलिकॉप्टरने,

    9 वाजून 5 मिनीटांनी होणार आगमन,

    पुणे ग्रामीण पोलिसांच्या बीडीडीएस पथकानं केली हेलिपँडची पाहणी,

    मॉंटी या श्वानानं केली तपासणी,

  • 19 Feb 2022 06:41 AM (IST)

    पंतप्रधान नरेंद्र मोदी 6 मार्च रोजी पुणे दौऱ्यावर येणार

    पुणे शहरातील महत्त्वाच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी 6 मार्च रोजी पुणे दौऱ्यावर येणार

    या दौऱ्यात बुहूप्रतिक्षीत मेट्रोच्या फुगेवाडी ते पिंपरी आणि वनाज ते गरवारे महाविद्यालय या दोन टप्प्यांचे उद्घाटन होण्याची शक्यता

    त्याचबरोबर नदी काठ सुधार प्रकल्प, एक हजार घरांची लॉटरी, ईबसेसचे लोकार्पण यासह इतर कार्यक्रमांचे उद्घाटन व भूमिपूजन मोदी यांच्या हस्ते होणार

  • 19 Feb 2022 06:21 AM (IST)

    सोलापुरात शिवजन्मोत्सवासाठी हजारोंच्या संख्येने युवकांची उपस्थिती

    – सोलापुरात शिवजन्मोत्सवासाठी हजारोंच्या संख्येने युवकांची उपस्थिती

    – शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ युवकांचा जल्लोष

    – कोणत्याही परवानगी शिवाय हजारो युवक शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवासाठी उपस्थित

    – युवकांनी रात्री बारा वाजता साजरा केला शिवजन्मोत्सव

    – युवकांचा जमाव कमी करण्याची पोलिसांची झाली कसरत

    – गुलाल उधळत केला शिवजन्मोत्सव साजरा